गुरूचरित्र ग्रंथ मराठी माहिती



गुरुचरित्र ग्रंथ मराठी माहिती:

श्री गुरु चरित्र हे १४व्या-१५व्या शतकातील कवी श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेले श्री नृसिंह सरस्वती (उर्फ नरसिंह सरस्वती) यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे.

हे पुस्तक श्री नरसिंह सरस्वती यांचे जीवन, त्यांचे तत्वज्ञान आणि संबंधित कथांवर आधारित आहे. हा ग्रंथ लिहिण्यासाठी  14-15 व्या शतकातील मराठी भाषा वापरली आहे.  हे पुस्तक सिद्ध (जे श्री नरसिंह सरस्वती यांचे शिष्य आहेत) आणि सिद्धाचे ऐकणारे नामधारक यांच्यातील संभाषण म्हणून लिहिले आहे.

गुरु चरित्र 3 भागात विभागलेले आहे: ज्ञान कांड (ज्ञान), कर्म कांड (काम) आणि भक्ती कांड (भक्ती). यात ५३ अध्याय आहेत. ज्यामध्ये ५३ व्या अध्यायाला ‘गुरुचरित्र अवतरणिका’ असेही म्हणतात. हा ग्रंथाचा सारांश आहे.

हे पुस्तक कर्नाटकातील कडगंची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावात लिहिलेले असावे असे मानले जाते.  

श्रीगुरु चरित्राची सुरुवात नामधारक नावाच्या पात्राच्या कथेने होते. जो सामान्य माणूस आहे. सांसारिक ओझ्याखाली दबलेला आहे.  नामधारक सांसारिक वेदनांनी त्रस्त होतो आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी गुरूच्या शोधात निघतो. प्रवासादरम्यान त्याला स्वप्नात प्रथम योगी दिसतो. तोच योगी जेव्हा तो उठतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष पाहून आश्चर्यचकित होतो. योगी स्वतःला सिद्ध श्री नृसिह सरस्वती यांचे शिष्य म्हणून ओळख करून देतात. हा तो मुद्दा आहे जिथे नामधारक सिद्धाला त्याला पवित्र गुरुचरित्र सांगण्यास सांगतो.

प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सिद्ध आणि नामधारक एखाद्या प्रश्नावर विचारावर किंवा मागील अध्यायातील एखाद्या घटनेवर संभाषण करतात.  अशा प्रकारे अध्याय एकतर कथा किंवा घटना-चमत्कार किंवा पवित्र दत्त अवताराच्या जीवनातील चरित्राचा उलगडा करतात.

गुरुचरित्रातील अध्यायांचे विश्लेषण:

श्री गुरु चरित्रात एकूण ५३ अध्याय आहेत.

१ ते २४ अध्याय 'ज्ञान कांड' म्हणून मानले जातात.

२५ ते ३७ अध्याय 'कर्मकांड' मानले जातात.

३८ ते ५३ अध्याय ‘भक्तीकांड’ मानले जातात.

चौथा अध्याय भगवान दत्तात्रेयांचा जन्म साजरा करतो.  यावरून दत्त अवतारांच्या चरित्राचा अध्याय सुरू होतो.

अध्याय ५ ते १० मध्ये भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा उल्लेख आहे.  या अध्यायांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म, प्रवास आणि चमत्कार यांचे वर्णन आहे. तथापि श्रीगुरु चरित्र श्रीपाद श्रीवल्लभ यांचे संक्षिप्त विवरण सादर करते.  श्रीपाद श्रीवल्लभ यांचे अधिक व्यापक चरित्र ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत’ या १७व्या शतकातील आणखी एका ग्रंथात सादर केले आहे.

अध्याय ११ मधून श्री नृसिंह सरस्वतींच्या जीवनाचे वर्णन केले आहे. नृसिंह सरस्वती यांचा जन्म महाराष्ट्रातील विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे झाला आहे आणि लहानपणीच त्यांनी संन्यासी जीवनशैली अंगीकारली. संपूर्ण भारतातील पवित्र स्थळी प्रवास केला.  काशी येथे नृसिंह सरस्वतीने कृष्ण सरस्वती यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले आणि म्हणून ते नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले.

अध्याय १३ पासून गुरु चरित्र श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करते. त्यांनी अगणित चमत्कार केले. धर्म आणि कर्माचा धार्मिक मार्ग शिकवला.  अध्याय २३ मध्ये एका महत्त्वाच्या घटनेचे वर्णन केले आहे – गाणगापूर येथील मठाची स्थापना.

२५, २६,२७ या अध्यायात वेदांचे सार अगदी अचूकपणे मांडले आहे.

अध्याय ३१, ३२ आणि ३६ अनुक्रमे स्त्री, विधवा आणि ब्राह्मण यांच्या आचारसंहितेबद्दल विस्तृतपणे सांगतात.

रुद्राक्ष, भस्म (पवित्र राख), अश्वत् वृक्ष, कर्म, पापे आणि प्रायश्चित्त यांच्याशी संबंधित कथा देखील श्रीगुरूंनीच स्पष्ट केल्या आहेत.

अध्याय ५१ मध्ये श्रीगुरु नृसिंह सरस्वती यांचा अवतार संपवल्याचे वर्णन आहे.

अध्याय ५३ हा सर्व अध्यायांचा सारांश आहे. ज्याला ‘गुरु चरित्र अवतरनिका’ म्हणून ओळखले जाते.

अंतःकरण असता पवित्र|      सदाकाळ वाचावे गुरुचरित्र|

गुरुचरित्र ग्रंथ मराठी माहिती:

गुरुचरित्र हा मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक ग्रंथ आहे. या ग्रंथाला पवित्र वेद समजतात. हा ग्रंथ १४ ते १५ व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहिला. गुरुचरित्राचे एकूण ५२ अध्याय आहेत. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. तसेच या ग्रंथामध्ये ७३८५ ऒव्या आहेत. ज्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड व भक्ती कांड अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही गोष्टींसाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे सुंदर विवेचन या ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त सांप्रदायकांनी त्याला वेदांची मान्यता दिली आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो. सिद्ध व नामधारी यांच्या संवादातून श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तयार झाला आहे. या सदर्भात एक पौराणिक कथा आहे ती अशी की गंगाधराचा पुत्र सरस्वती संसाराचा त्याग करून मनशांती मिळवण्यासाठी गाणगापूरकडे निघाला खूप थकल्यानंतर तो एका वृक्षा खाली झोपला तेव्हा त्याला स्वप्नात एक दिव्य तेज मूर्तीचे दर्शन झाले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच मूर्ती त्याला प्रत्यक्ष योग्या च्या रूपात भेटली. दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. 

गुरुचरित्र वाचन फायदे: 

या ग्रंथाचे पारायण केल्याने मनुष्य दुःख मुक्त होतो. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आजार नष्ट होतात. एकंदरीत या ग्रंथाच्या पारायणा ने एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते. आणि आनंद व प्रसन्नता निर्माण होते. गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष, वास्तुदोष नाहीसे होतात. लग्न, शिक्षण, करियर, आरोग्य यासारख्या विविध समस्या वर गुरुचरित्र रामबाण उपाय असल्याचे सांगतात. 

दत्त नामजप फायदे: 

दत्ताचे नामजप दररोज केल्याने वाईट शक्तींचा त्रास कमी होतो. व आपल्याला शक्ती मिळते. तसेच आपल्या पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण आनंदी राहते. दत्ता म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रूपांचे एकत्व. औदुंबर वस्ती, जवळ श्वान व धेनू हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भूत, प्रेत, पिशाच्च दत्तात्रयांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाही. यांच्या उपायाने पूर्वजांचे त्रास नाहीशी होतात. 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा महामंत्र: 

या मंत्रामध्ये पहिला दिगंबर म्हणजे मी.मी म्हणजे देह नाही मी म्हणजे आत्मा शुद्ध अहंम तो साक्षी आहे निर्विकार आहे आनंद रूप आहे. 

दुसऱ्या दिगंबराने दर्शवले आहे की आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसत आहे ते केवळ भासणारे आहे. ते सर्व भगवंत व परब्रम्ह आहे. 

श्रीपाद वल्लभ म्हणजे भगवंताचे सगुण रूपाला हाक मारली आहे. 

चौथ्या दिगंबरा या शब्दात प्रार्थना आहे माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा माझा देहरूपी भ्रम नाहीसा करा आणि मला आपले स्वरूप प्राप्त होऊ द्या. 

अशा या महामंत्राचे अर्थ आपल्याला बऱ्याच गोष्टींची अनुभूती देतात. 

||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ                        दिगंबरा|| 

श्री गुरुचरित्र पारायण पद्धती: 

ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे असे या ग्रंथातच दिले आहे. हा ग्रंथ सात दिवसांत किंवा तीन दिवसात पूर्ण करावा असा नियम आहे. 

सप्ताह पद्धती: 

पहिला दिवस - १ ते ९ अध्याय 

दुसरा दिवस - १० ते २१ अध्याय 

तिसरा दिवस-  २२ ते २९ अध्याय 

चौथा दिवस -३० ते ३५ अध्याय 

पाचवा दिवस- ३६ ते ३८ अध्याय 

सहावा दिवस- ३९ ते ४३ अध्याय 

सातवा दिवस- ४४ ते ५३ अध्याय 

तसेच गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर 

पहिला दिवस- २४ अध्याय 

दुसरा दिवस- ३७ अध्याय 

तिसऱ्या दिवशी- ५३ अध्याय 

योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक हे दत्तात्रय असून श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती हे दत्त अवतार असल्याचे या दोघांच्या चमत्कार पूर्ण कथांचे वर्णन आपल्याला ठायी ठायी आढळते. 

गुरुचरित्र अध्याय व त्यांची फलश्रुती: 

अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
अध्याय ३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
अध्याय ५:- शारीरिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
अध्याय ८:-  बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
अध्याय ११:- वाचंदोष तसेच वेड नाहीसे होते.
अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी पूजा करी जो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासमंध परिहरेल!!
अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात.  सप्तथ सापडतो.
अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
अध्याय ३३:- वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय ३५ :- हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
अध्याय ४८:-  गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
अध्याय ५२ :- श्रद्धेला  चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

गुरूंचे महत्त्व:

गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक दृष्टांत-कथा आहेत. लोक त्याला चमत्कार-कथा समजतात. पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल.

गुरुचरित्र ५३ वा अध्याय अवतरणिका:

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणारविंदाभ्यां नमः ।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।

श्रोते व्हावें सावधान । गुरुचरित्राध्याय बावन्न ।
ऐकोनि नामधारकाचे मन । ब्रह्मानंदीं निमग्न पैं ॥१॥

सेवूनि गुरुचरित्रामृत । नामधारक तटस्थ होत ।
अंगीं घर्मपुलकांकित । रोमांचही ऊठती ॥२॥

कंठ झाला सद्गदित । गात्रें झालीं सकंपित ।
विवर्ण भासे लोकांत । नेत्रीं वहाती प्रेमधारा ॥३॥

समाधिसुखें न बोले । देह अणुमात्र न हाले ।
सात्त्विक अष्‍टभाव उदेले । नामधारक शिष्याचे ॥४॥

देखोनि सिद्ध सुखावती । समाधि लागली यासी म्हणती ।
सावध करावा मागुती लोकोपकाराकारणें ॥५॥

म्हणोनि हस्तें कुरवाळिती । प्रेमभावें आलिंगिती ।
देहावरी ये ये म्हणती । ऐक बाळा शिष्योत्तमा ॥६॥

तूं तरलासी भवसागरीं । रहासी ऐसा समाधिस्थ जरी ।
ज्ञान राहील तुझ्या उदरीं । लोक तरती कैसे मग ॥७॥

याकारणें अंतःकरणीं । दृढता असावी श्रीगुरुचरणीं ।
बाह्य देहाची रहाटणी । शास्त्राधारें करावी ॥८॥

तुवां विचारिलें म्हणोनि । आम्हां आठवली अमृताची वाणी ।
तापत्रयातें करी हानि । ऐशी अनुपम्या प्रगटली ॥९॥

तुजमुळें आम्हां आठवलें । तुवां आम्हां बरवें केलें ।
त्वांही एकाग्रत्वें ऐकिलें । आतां हेंच विस्तारीं ॥१०॥

नामधारका ऐशिया परी । सिद्ध सांगती परोपरी ।
मग तो नेत्रोन्मीलन करी । कर जोडोन उभा ठाके ॥११॥

म्हणे कृपेचें तारुं । तूंचि या विश्वास आधारु ।
भवसागर पैल पारु । तूंचि करिसी श्रीगुरुराया ॥१२॥

ऐसें नामधारक विनवीत । सिद्धाचे चरणीं लागत ।
म्हणे श्रीगुरुचरित्रामृत । अवतरणिका मज सांगा ॥१३॥

  घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।

वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्‍टादशाध्यायांत ॥३६॥

औदुंबराचें करुनि वर्णन । योगिनींस देऊनि वरदान ।
गाणगापुरास आपण । एकोनविंशीं श्रीगुरु गेले ॥३७॥

स्त्रियेचा समंध दवडून । पुत्र दिधले तिजला दोन ।
एक मरतां कथिती ज्ञान । सिद्धरुपें विसाव्यांत ॥३८॥

तेचि कथा एकविंशीं । प्रेत आणिलें औदुंबरापाशीं ।
श्रीगुरु येऊनि तेथे निशीं । पुत्र उठविती कृपाळू ॥३९॥

भिक्षा दरिद्रयाघरीं घेती । त्याची वंध्या महिषी होती ।
तीस करुन दुग्धवंती । बाविसाव्यांत वर दिधला ॥४०॥

तेविसाव्यांत श्रीगुरुस । राजा नेई गाणगापुरास ।
तेथें उद्धरती राक्षस । त्रिविक्रम करी श्रीगुरुनिंदा ॥४१॥

भेटों जाती त्रिविक्रमा । दाविती विश्वरुपमहिमा ।
विप्र लागे गुरुपादपद्मा । चोविसाव्यांत वर देती ॥४२॥

म्लेंच्छांपुढें वेद म्हणती । विप्र ते त्रिविक्रमा छळती ।
त्याला घेऊनि सांगातीं । गुरुपाशीं आला पंचविंशीं ॥४३॥

सव्विसाव्यांत तया ब्राह्मणां । श्रीगुरु सांगती वेदरचना ।
त्यागा म्हणती वादकल्पना । परी ते उन्मत्त नायकती ॥४४॥

सत्ताविशीं आणोनि पतिता । विप्रांसी वेदवाद करितां ।

कुंठित करोनि शापग्रस्ता । ब्रह्मराक्षस त्यां केलें ॥४५॥                                              म्लेंच्छाचा स्फोटक दवडिती । भक्तीस्तव त्याचे नगरा जाती ।

पुढें श्रीपार्वतीं भेटों म्हणती । पन्नासावे अध्यायीं ॥६८॥

एकावन्नबावन्नांत गुरुमूर्ति । देखूनिया क्षितीं पापप्रवृत्ति ।
उपद्रवितील नाना याती । म्हणोनि गुप्तरुपें रहावें ॥६९॥

ऐसा करुनि निर्धार । शिष्यांसी सांगती गुरुवर ।
आजि आम्ही जाऊं पर्वतावर । मल्लिकार्जुनयात्रेसी ॥७०॥

ऐसें ऐकूनि भक्तजन । मनीं होती अतिउद्विग्न ।
शोक करिती आक्रंदोन । श्रीगुरुचरणीं लोळती ॥७१॥

इतुकें पाहुनी गुरुमूर्ति । वरद हस्तें तयां कुरवाळिती ।
मद्भजनीं धरा आसक्ति । मठधामीं राहोनिया ॥७२॥

ऐसें बोधूनि शिष्यांसी । गुरु गेले कर्दळीवनासी ।
नाविकमुखें सांगूनि गोष्‍टीसी । निजानंदीं निमग्न होती ॥७३॥

ऐसें अपार श्रीगुरुचरित्र । अनंत कथा परम पवित्र ।
त्यांतील बावन्न अध्यायमात्र । प्रस्तुत कथिलें तुजलागीं ॥७४॥

सिद्ध म्हणे नामधारका । तुज कथिली अवतरणिका ।
श्रीगुरु गेले वाटती लोकां । गुरु गुप्त असती गाणगापुरीं ॥७५॥

कलियुगीं अधर्म वृद्धि पावले । म्हणोनि श्रीगुरु गुप्त झाले ।
भक्तजनाला जैसे पहिले । तैसेच भेटती अद्यापि ॥७६॥

हे अवतरणिका सिद्धमाला । श्रीगुरु भेटती जपे त्याला ।
जैसा भावार्थ असे आपुला । तैशीं कार्यें संपादिती ॥७७॥

   बावन्न भरोनि रांजणीं । भक्तयाचका तोषविलें ॥९९॥

किंवा सिद्ध हा कल्पतरु । नामधारकें पसरिला करु ।
यांचा करोनि परोपकारु । भक्तांकरितां बहु केला ॥१००॥

किंवा सिद्धमुनि बलाहक । नामधारक शिष्य चातक ।
मुख पसरोनि बिंदु एक । मागतां अपार वर्षला ॥१॥

तेणें भक्तां अभक्तां फुकाचा । सकळां लाभ झाला अमृताचा ।
ह्रदयकोशीं खळजनांचा । पाषाण समयीं पाझरे ॥२॥

श्रीगुरुरायाचे धरुं चरण । सिद्धमुनीतें करुं वंदन ।
नामधारका करुं नमन । ऐसें करीं नारायण ॥३॥

श्रीगुरुरुपी नारायण । विश्वंभरा दीनोद्धारणा ।
आपणा आपुली दावूनि खुणा । गुरुशिष्यरुपें क्रीडसी ॥१०४॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशदध्यायसारे अवतरणिका नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु । शुभं भवतु । ओवीसंख्या ॥१०४॥

श्रीगुरुचरित्रं समाप्तं । एकंदर ओवीसंख्या ॥७३८५॥

         ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु       








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.