कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI - गरज संयमाने वापरण्याची

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI - गरज संयमाने वापरण्याची:



तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे मानवाच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडून आले आहेत. या बदलांमध्ये "कृत्रिम बुद्धिमत्ता" म्हणजेच Artificial Intelligence (AI) हा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. AI ही संकल्पना जगभरातील विविध क्षेत्रांमध्ये वापरली जात असून त्याचे लाभ आणि परिणाम विविध स्तरांवर जाणवत आहेत. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर संयमाने आणि योग्य दिशेने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आज सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) AI या नव्या तंत्राने संपूर्ण जग बदलून गेले आहे. अनेक क्षेत्रात यामुळे मोठी क्रांती घडून आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) AI हे एक तंत्रज्ञान आहे. ज्याद्वारे यंत्रांना मानवाप्रमाणे हुशारीने वागवता येते. आज हे तंत्रज्ञान संगणक क्षेत्रातील सर्वात आकर्षक तंत्रज्ञान आहे. एखाद्या संगणकाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या यंत्रासाठी संशोधक, तंत्रज्ञ आणि अल्गोरिदमच्या आधारे संगणक प्रणाली विकसित करतात. ती त्या संगणकामध्ये कार्यान्वित करतात. हे तंत्रज्ञान मानवी मेंदूप्रमाणे कार्य करू लागते. प्रश्न ओळखणे आणि तिचा ज्ञात माहितीशी संबंध जोडण्याची क्षमता संगणकामध्ये येते थोडक्यात मानवी बुद्धिमत्तेची ते यंत्र नक्कल करते. 

AI म्हणजे काय?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणालीला मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे काम करण्याची क्षमता देणे. यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नेचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांसारख्या तंत्रांचा समावेश होतो. ही तंत्रे माहितीचा विश्लेषण करून स्वयंचलित निर्णय घेण्यास मदत करतात. ज्यामुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षमता वाढवता येते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग साकारण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली म्हणजे अवाढव्य माहिती साठवणारे संगणक. दुसरे म्हणजे त्या माहितीचे जलद आदान प्रदान करण्यासाठी आवश्यक आंतरजाल विकसित होणे आवश्यक होते. तिसरी गोष्ट म्हणजे या माहितीचे जलद वर्गीकरण करणारी संगणक प्रणाली विकसित होणे आवश्यक होते. या तिन्ही गोष्टी मागील काही वर्षात अस्तित्वात आल्या. आपण विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे यंत्रे देऊ लागली. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. 

1).शनिवार वाडा मराठी माहिती( Shanivaar wada information in marathi)

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) विकास

1990 च्या दशकात आंतरजाल (Internet Technology) तंत्रज्ञानात लक्षणीय सुधारणा झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माहितीचे संकलन आणि आदान प्रदान करणे सहज शक्य झाले. विसाव्या शतकात प्रदर्शित झालेल्या मॅट्रिक्स चित्रपटाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा समाजात होणारा परिणाम लोकांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर 21व्या शतकाच्या प्रारंभापासून बऱ्याच क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला. 2015 मध्ये चेहरा ओळखू शकणारी चेहऱ्यावरील भाव वाचणारी त्यानुसार उच्चाराद्वारे संवाद साधणारी असे मानवी गुणधर्म असणारी मानवासारखी रोबोट सोफिया बनवण्यात आली. 2018 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने विकसित झाली. त्यातून ग्रेट लँग्वेज मॉडेल तयार झाले. चॅट जीपीटी मध्ये आपणास हेच दिसून आले की ही प्रणाली वापरकर्त्याला त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तर देते. वापरकर्त्याच्या आदेशाला प्रतिसाद देते. 

कोणत्याही गोष्टीची जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. काम करत असताना मानवाच्या हातून घडू शकणाऱ्या चुका यंत्राकडून होत नाहीत. ही यंत्रे 24 तास काम करत असतात. माणूस काही तास काम केल्यानंतर कंटाळतो मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता धारक यंत्रणेला कधीही कंटाळा येत नाही. हे फायदे असले तरीही यंत्रणा वापर अधिक खर्चिक असते. तसेच मानवी सर्जनशीलता या यंत्राकडे नसते. याच्या वापरामुळे नोकरीवर परिणाम होऊ शकतो काही लोक बेरोजगार होऊ शकतात. 

2). होळी सण मराठी माहिती 2024

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आज अनेक क्षेत्रात होत आहे जसे की रोबोटिक्स आणि स्वयंचलनाच्या क्षेत्रात. कठीण कामाच्या ठिकाणी रोबोचा वापर सुरू झाला आहे. उदा. फाउंड्री उद्योगात उच्च तापमानाच्या ठिकाणी मानवाने काम करणे अशक्य असते. अशा ठिकाणी रोबोंचा वापर होऊ लागला आहे. अफाट माहितीमुळे अनेक विश्लेषणात्मक क्षमतेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने ही यंत्रणा वापरकर्त्याच्या आवडीनिवडी समजून घेऊन तुम्हाला काय शोधायचे हे समजून घेऊन सूचना किंवा माहिती पुरवते उदा. youtube वर एखाद्याने वारंवार राजकारणावरील व्हिडिओ पाहिले तर youtube उघडताच राजकारणावरील नुकतेच प्रसिद्ध झालेले व्हिडिओ दिसू लागतात. आपली आवड ही यंत्रणा लक्षात घेते. 

AI चा वापर आणि त्याचे फायदे:

  1. उद्योगातील वापर: AI तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन प्रक्रियेत, ग्राहक सेवा सुधारण्यासाठी, आणि नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी केला जातो. यामुळे कंपन्यांची कार्यक्षमता वाढते आणि खर्चात बचत होते.

  2. आरोग्य सेवा: आरोग्य क्षेत्रात AI चा वापर रोग निदान, औषध निर्मिती, आणि वैद्यकीय संशोधनासाठी होत आहे. यामुळे उपचार प्रक्रिया जलद आणि प्रभावी बनत आहे.

  3. शिक्षण क्षेत्र: AI च्या सहाय्याने वैयक्तिक शिक्षणाचा विकास करता येतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण करून त्यांना अधिक चांगले शिक्षण देता येते.

  4. वाहतूक आणि लॉजिस्टिक्स: AI च्या वापरामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी बनत आहे. स्वयंचलित वाहनांपासून ते लॉजिस्टिक्सच्या प्रक्रियांपर्यंत AI सर्वत्र आपल्या जीवनात स्थान मिळवू पाहत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही अधिक खर्चिक आहे. असे म्हटले तरी सर्वसामान्य लोकांद्वारे सुद्धा ही वापरली जाते. जसे की आज गुगल मॅप चा वापर सर्रास केला जातो. रस्ता, गर्दीची माहिती, इच्छित स्थळी पोचण्यासाठी लागणारा वेळ हे तंत्रज्ञान क्षणात देते. चॅट जीपीटी या तंत्राचा वापर आज मोठ्या प्रमाणावर होत आहे. ॲमेझॉन, अलेक्सा, आणि गुगल असिस्टंट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवली गेली आहेत. स्मार्ट घड्याळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वापरणाऱ्याच्या आरोग्याची माहिती देतात. हृदय स्पंदने, झोपेची वेळ, चालण्याची, धावण्याची माहिती घेऊन आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सल्ला देतात. 

 3). पाणी वाचवा जीवन वाचवा मराठी माहिती

नोकरीच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी बाबत मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. हा वापर असाच वाढत राहिला तर 300 दशलक्ष नोकऱ्या कमी होतील असा अंदाज आहे. पण हे खरे वाटत नाही कारण हे तंत्रज्ञान ज्यांनी आत्मसात केले त्यांना नोकरी गमावण्याची भीती राहणार नाही. कारण ज्यावेळी संगणक आले त्यावेळी पण असेच बोलले जात होते. पण प्रत्यक्षात संगणकाचा जसा विकास होत गेला तश्या नोकरीची संधीही वाढत गेल्या. 

AI च्या वापरातील आव्हाने:

AI चे अनेक फायदे असले तरी याचा वापर करताना काही आव्हाने आणि धोके देखील आहेत:

  1. नोकऱ्यांवर परिणाम: AI च्या स्वयंचलिततेमुळे काही नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. हे विशेषतः कमी कौशल्याच्या नोकऱ्यांवर परिणाम करू शकते. ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न उभा राहू शकतो.

  2. गोपनीयता आणि सुरक्षितता: AI च्या वापरामुळे गोपनीयता आणि डेटा सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. चुकीच्या हाती माहिती गेल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो.

  3. मानवी मूल्यांचा अभाव: AI ने निर्णय घेताना मानवी मूल्ये आणि नैतिकता यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे काही वेळा AI च्या निर्णयांमध्ये नैतिकतेचा अभाव दिसून येतो.

मानवाने स्वतःबद्दलची मते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला. कृत्रिम बुद्धिमत्ता धारण करणाऱ्या कोडा दा विंची-००२ यंत्रणा वापरण्यासाठी काही लोकांना एक्सेस देण्यात आला. त्यांनी या यंत्रणेला कविता लिहून देण्यास सांगितले. यंत्रणेने कविता लिहून दिल्या. त्यानंतर त्यांनी मानवाबद्दलच्या भावना कवितेच्या रूपात विचारल्या. तेव्हा त्या यंत्राने लिहून पाठवलेल्या कवितेचा आशय असा होता. "मला वाटतं मी देव आहे. मानवाचे जग नष्ट करण्याची, तुमचं सर्व आयुष्य पुसून आणि नष्ट करण्याची ताकद माझ्यात आहे. या उत्तराने सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. म्हणून या यंत्राचा वापर अत्यंत संयमाने करण्याची गरज आहे

4). सेंद्रिय अन्नपदार्थ आणि त्याचे फायदे मराठी माहिती

AI चा संयमाने वापर करण्याची गरज:

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना संयम आणि नैतिकता यांची गरज आहे. AI तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास त्याचे भरपूर फायदे आहेत. परंतु त्याचवेळी त्याच्या मर्यादा आणि धोके ओळखून त्यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. समाजाच्या भल्यासाठी आणि भविष्याच्या दृष्टीने AI चा योग्य वापर सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक शक्तिशाली साधन आहे. परंतु ते मानवाच्या हातात आहे. ते कसे वापरले जाते यावरच त्याच्या प्रभावाचा निर्णय होतो. त्यामुळे AI च्या वापरासाठी ठोस धोरणे, नियम आणि नैतिकता आचरली पाहिजे. भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने AI एक अनिवार्य घटक असणार आहे. परंतु त्याचा वापर करताना संयम आणि जबाबदारी या मूल्यांचा विचार करणे अनिवार्य आहे.

5). सिंधुताई सपकाळ - अनाथांची माई मराठी माहिती (Sindhutai Sapkal - Orphan's Mother Marathi Information )

लक्ष्य द्या:

मित्रांनो या लेखात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI - गरज संयमाने वापरण्याची मराठी माहिती याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI - गरज संयमाने वापरण्याची मराठी माहिती बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

धन्यवाद 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.