होळी सण मराठी माहिती 2024


होळीचा सण ज्याला रंगांचा सण म्हणूनही ओळखले जाते. हा भारत आणि जगभरातील सर्वात उत्साही आणि आनंददायी उत्सवांपैकी एक आहे. प्राचीन हिंदू पौराणिक कथांमध्ये रुजलेली होळी वाईटावर चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूचे आगमन दर्शवते. हा लेख होळी या प्रिय सणाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि महत्त्व याबद्दल माहिती देतो.

होळी 2024 मध्ये कधी आहे:

यावर्षी होळी रविवार दिनांक 24 मार्च 2024 ला आहे तर धुलीवंदन सोमवार दिनांक 25 मार्चला असणार आहे.होलिका दहन मुहूर्ताचा शुभ मुहूर्त ११.१३P.M ते २५ मार्च ला १२:४४ पर्यंत आहे. ज्याचा कालावधी 1 तास 32 मिनिटे आहे. 

होळीच्या पौराणिक कथा व महत्त्व:

हिंदू पौराणिक कथेनुसार राधा अत्यंत गोरी होती आणि भगवान कृष्णाचा रंग गडद होता. त्यामुळे राधा आपल्याला स्वीकारेल की नाही या भीतीपोटी श्रीकृष्णाने यशोदेला विचारले की राधा इतकी गोरी आणि मी का इतका काळा आहे. त्यावेळी यशोदेने श्रीकृष्णाला गमतीने सुचवले की रंगाचा हा भेद लपवण्यासाठी राधाच्या चेहऱ्याला रंग लाव. कृष्णाने आईच्या सल्ल्याप्रमाणे राधाच्या चेहऱ्यावर गुलाल लावला आणि अशाप्रकारे होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली.

शिव आणि कामदेव - हा सण भगवान शिव आणि कामदेव यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे.

ऋतूंचा बदल - होळी हा ऋतूंचा बदल दर्शवतो. हिवाळा संपुन वसंत ऋतुचे आगमन हा नवीन ऋतूचा बदल दर्शवतो.

होळी कशी साजरी केली जाते: 

होळी हा सण हिंदूंचा महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे. आणि हा वसंत ऋतूत साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी शेणी, लाकडे, गवत हे मंत्र उच्चारण करून जाळतात आणि जळालेल्या होळीभोवती बोंबा मारुन प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. कोकणात याला शिमगा असेही म्हणतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते त्याला धुळवड असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला लावली जाते आणि त्यामध्ये लोळण घेतले जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते. होळी नंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा दिवस साजरा केला जातो

शेतीचे महत्व:

पौराणिक कथेनुसार कृष्ण आणि बलराम या देवतांचे स्मरण आणि पूजा शेतकरी वर्गात केले जाते. होळीच्या दिवशी नवीन आलेले पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची प्रथा आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व:



होळीचा सण होलिका, ढुंढा, पुतना यासारख्या लहान मुलांना त्रास देणाऱ्या राक्षसीनींच्या दहनाच्या कथा सांगतो. एका पौराणिक कथे नुसार हिरण्यकश्यपु नावाचा खूप बलवान राक्षस राजा होता. हिरण्यकश्यपु चा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णुचा भक्त  असतो. परंतु हिरण्यकश्यपु भगवान विष्णु व देवतांची घृणा करत असतो. आपला पुत्र भगवान विष्णूचा भक्त आहे हे हिरण्यकश्यपुला पसंत नसते. हिरण्यकश्यपु वेगवेगळे प्रकार करून भक्त प्रल्हादाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. तरीसुद्धा भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचे नामस्मरण करणे सोडून देत नाही. त्यामुळे कंटाळून हिरण्यकश्यपु आपली बहीण होलीका जिला वरदान मिळालेले असते. की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते. तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. तिला हिरण्यकश्यपु सांगतो की तू फक्त प्रल्हादाला घेऊन आगीच्या चितेवर बस तसे होलीका करते. पण भक्त प्रल्हाद विष्णूच्या नामस्मरणात लिन झालेला असतो. आणि थोड्याच वेळात होलीका जळायला लागते तेव्हा एक आकाशवाणी होते  तेव्हा तिला आठवते की वरदानात असेही सांगितले होते ज्यावेळी ती वरदानाच दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून खाक होईल. भक्त प्रल्हादाला अग्नी काही करू शकला नाही कारण तो विष्णूच्या नामस्मरणात लिन झालेला असतो. पण ती होलिका त्या अग्नीत जळून भस्म होते. त्यामुळे दुष्ट प्रवृत्ती व वाईटावर चांगल्याचे प्रतीक म्हणून होळी हा सण साजरा केला जातो. होळी हा सण राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन करणारा सण आहे. राधा, कृष्ण आणि गोपिकांनी रंग उधळून रंगाचा उत्सव साजरा केला होता. होळी कृष्णाने साजरी केल्याचा उल्लेख गर्गसंहिता या ग्रंथात केलेला आढळतो. वाईट गोष्टींची आहुती आणि रंगाचा सण म्हणजेच होळी. मराठी महिन्यातील शेवट फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा ला येणारा सण म्हणजे होळी. होळीचा उगम हिंदू पौराणिक कथांमधील विविध दंतकथांमध्ये आढळतो. विशेषत: प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपुची कथा आणि भगवान कृष्णाच्या खेळकर कृत्ये.  वडिलांच्या विरोधाला न जुमानता प्रल्हादची भगवान विष्णूप्रती असलेली भक्ती, द्वेषावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे.  राधा आणि गोपींसोबत कृष्णाच्या रंगीबेरंगी खोड्यांची दंतकथा सणाचा उत्साह आणि सौहार्द वाढवते.

होळी कोणी सुरु केली:

 होलिका दहन हा हिंदू पौराणिक कथांतील होलिका आणि प्रल्हाद यांच्या कथेवर आधारित उत्सव आहे. बुंदेलखंडमधील झाशीच्या एरिच येथून या उत्सवाची सुरुवात झाली. ही एकेकाळी हिरण्यकश्यपुची राजधानी होती.

होळीचा सण किती वर्ष जुना आहे?

होळीचा उगम प्राचीन भारतात बहुधा चौथ्या शतकात किंवा त्यापूर्वी झाला असे मानले जाते. हा सण अनेक हिंदू दंतकथा आणि पौराणिक कथांशी जोडलेला आहे. त्यापैकी सर्वात लोकप्रिय प्रल्हाद आणि होलिकाची कथा आहे.

होळीला घ्यावयाची काळजी:

केमिकलच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे असे केमिकल वापरलेले कलर वापरू नये. नैसर्गिक कलर वापरावे उदाहरणार्थ. गुलाल. केमिकल च्या रंगामुळे आपले शारीरिक नुकसान होऊ शकते. जबरदस्ती एकमेकांना कलर लावू नये त्यामुळे सणाला भांडणे होऊन गालबोट लागण्याची शक्यता असते. होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा.

होळीच्या सणांमध्ये आपण पाण्याने भरले फुगे एकमेकांना मारत असतो त्यामुळे आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. 

कचरा व्यवस्थापन:

उत्सवाचा कचरा प्लास्टिक वगैरे यांची योग्य विल्हेवाट लावा. ज्यामुळे आपले वातावरण परिसर आणि पर्यायाने निसर्गाची हानी होणार नाही याकडे लक्ष द्या.

परंपरा आणि विधी:
होळीचा सण सामान्यतः हिंदू चंद्र महिन्यात फाल्गुनच्या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सुरू होतो. होळीच्या आदल्या रात्री समुदाय होलिका दहनासाठी एकत्र जमतात. होलिका दहन (बोनफायर) म्हणजे दुष्ट आत्म्यांच्या दहनाचे प्रतीक आहे. दुसऱ्या दिवशी आनंदाने लोक होळीमध्ये सहभागी होतात. एकमेकांना रंगीत पावडर आणि पाणी लावतात.  हशा, संगीत आणि पारंपारिक पदार्थांच्या सुगंधाने हा सण बहरून जातो.

होळीच्या धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त होळी ही जगभरातील सर्व पार्श्वभूमीच्या लोकांद्वारे साजरी केली जाते.

पर्यटन विकास: 

होळीचे आकर्षण सीमा ओलांडून रंगांचा  आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक पर्यटकांना आकर्षित करते. भारतातील मथुरा, वृंदावन आणि जयपूर सारखी लोकप्रिय स्थळे होळीचा अस्सल अनुभव घेण्यासाठी पाहुण्यांच्या ओघाचा साक्षीदार आहेत. नेपाळ, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडम सारखी आंतरराष्ट्रीय राष्ट्र देखील उत्साही होळी साजरी करतात. सणाचे जागतिक आकर्षण दर्शवितात.

पर्यावरणविषयक विचार:
अलिकडच्या वर्षांत होळीचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  जागरूकता मोहिमा नैसर्गिक, वनस्पती-आधारित रंगांच्या वापरासाठी प्रोत्साहन देतात. आणि आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक कृत्रिम रंगांचा वापर करण्यास परावृत्त करतात.  याशिवाय होळीच्या सणादरम्यान पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.

निष्कर्ष:
होळीचा सण आनंद, एकात्मता आणि सांस्कृतिक वारशाचे सार दर्शवतो. जो लाखो लोकांना त्याच्या उत्साहाने मोहित करतो. आपण होळी साजरी करत असताना आपण तिची परंपरा जपू या. तिचा प्रेम आणि सौहार्दाचा सार्वत्रिक संदेश स्वीकारू या आणि अधिक शाश्वत आणि सर्वसमावेशक होळी साजरा करण्याचा प्रयत्न करूया.  होळीचे रंग आपले जीवन आनंदाने आणि शांततेने रंगवू दे. आपल्याला सामायिक मानवतेच्या बंधा मध्ये एकत्र आणू दे. हा आनंदाचा आणि प्रतिकात्मकपणे नकारात्मकतेपासून दूर जाण्याचा काळ आहे.

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


FAQ


१).होळी कोणी सुरु केली:


होलिका दहन हा हिंदू पौराणिक कथांतील होलिका आणि प्रल्हाद यांच्या कथेवर आधारित उत्सव आहे. बुंदेलखंडमधील झाशीच्या एरिच येथून या उत्सवाची सुरुवात झाली. ही एकेकाळी हिरण्यकश्यपुची राजधानी होती.


२).होळी 2024 मध्ये कधी आहे:

यावर्षी होळी रविवार दिनांक 24 मार्च 2024 ला आहे तर धुलीवंदन सोमवार दिनांक 25 मार्चला असणार आहे.होलिका दहन मुहूर्ताचा शुभ मुहूर्त ११.१३PM ते २५ मार्च लाख १२:४४ पर्यंत आहे. ज्याचा कालावधी 1 तास 32 मिनिटे आहे. 

३.)होळीचा सण किती वर्ष जुना आहे?

होळीचा उगम प्राचीन भारतात बहुधा चौथ्या शतकात किंवा त्यापूर्वी झाला असे मानले जाते. हा सण अनेक हिंदू दंतकथा आणि पौराणिक कथांशी जोडलेला आहे, त्यापैकी सर्वात लोकप्रिय प्रल्हाद आणि होलिकाची कथा आहे.

हे पण वाचा:

पाणी वाचवा जीवन वाचवा मराठी माहिती

एक राष्ट्र एक राशन कार्ड योजना मराठी माहिती

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मराठी माहिती

हृदयविकार कारणे व आयुर्वेदिक उपचार मराठी माहिती

वसुबारस सणाची मराठी माहिती ( Vasubaras information in marathi)

मातृवंदना योजना 2.0 (PMMVY) महाराष्ट्र 2023 मराठी माहिती( Matruvandana Yojana 2.0 (PMMVY) Maharashtra 2023 information in marathi )


लक्ष्य द्या:

मित्रांनो वरील लेखात होळी सण 2024 मराठी याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे होळी सण 2024 मराठी बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

धन्यवाद 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.