शीर्षक:
शनिवार वाड्याचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व जाणून घेणे.
परिचय:
शनिवार वाडा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात स्थित आहे. हा या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा पुरावा म्हणून उभा आहे. हा भव्य किल्ला त्याच्या स्थापत्यकलेसह भूतकाळातला एक आकर्षक प्रवास देतो. ज्यामुळे पर्यटकांना मराठा राजवटीच्या पूर्वीच्या कालखंडात जाण्याची संधी मिळते.
शनिवार वाडा मराठी माहिती (Shanivaar vada information in marathi)
पहिला बाजीराव पेशवा यांनी इ. स. 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजे शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण व पेशव्यांची राजधानी होती. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवार वाड्याची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडा वास्तू कलेत मुघल रचनांचा प्रभाव दर्शवतो. शनिवार वाडा स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्टता दाखवतो. त्यात मराठा कारागिरांनी क्लिष्ट कोरीवकाम आणि उत्कृष्ट रचना केलेली आहे. हा किल्ला मराठा स्थापत्य शैलीचे वैभव आणि अत्याधुनिकता प्रतिबिंबित करतो.
शनिवार वाड्यासमोर पहिल्या बाजीरावांचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे. शनिवार वाड्यात गणेश महाल, रंग महाल, आरसा महाल, हस्तिदंत महाल, दिवानखाना आणि कारंजे अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व मुजिक शो शनिवार वाड्यावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगी मुळे नष्ट झाला आहे. आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असणाऱ्या भिंती व सुरक्षिततेसाठी अनुकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे. शनिवार वाडा हा पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शनिवार वाड्याचे क्षेत्रफळ 626 एकर इतके आहे. हा किल्ला पेशव्यांच्या भव्यतेचा पराक्रमाचा आणि न्याय कारभाराचे प्रतीक म्हणून पाहता येतो. पुढे हा वाडा पेशव्यांच्या यशाचा आणि ऱ्हासाचा साक्षीदार बनला.
हे पण वाचा- तुळशी विवाह मराठी माहिती
पहिला बाजीराव:
पहिला बाजीराव पेशव्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झाला. तर मृत्यू 28 एप्रिल 1740 मध्ये झाला. आपल्या 40 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी मोठ मोठ्या लढाया जिंकल्या त्यांनी त्यांच्या निपुण युद्ध कौशल्याने उत्तर भारतात ही मराठा साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या.
शनिवार वाडा कसा बांधला:
शनिवार वाड्याबद्दल एक कथा सांगितली जाते ती म्हणजे बाजीरावांनी एका सश्याला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिले होते. त्यामुळे त्यांना त्याचे आश्चर्य वाटले मग त्यांनी त्या जागी एक भुईकोट किल्लाच बांधून घेतला तोच हा शनिवार वाडा.
शनिवार वाडा मराठी माहिती (Shanivaar vada information in marathi):
शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. भारत सरकारने शनिवार वाड्याला दिनांक 17 जून इ.सन. 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. ज्या दिवशी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली त्या दिवशी शनिवार होता म्हणून वाड्याला शनिवार वाडा (शनवार वाडा) नाव ठेवण्यात आले. 17 नोव्हेंबर 1817 ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर तेथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्ट सन राहत होता. 1828 मध्ये वाड्यात मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. शनिवार वाड्या संदर्भात अनेक दुर्घटना इतिहासात नोंद आहेत.
शनिवार वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक योद्धा आणि वीर येत असत. तेथे राजकारण चालत असे. तसेच पेशव्यांचा दरबार पण येथेच भरत असे. शनिवार वाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे. आचार्य अत्रेनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणावरून लढवली होती. पुढे येथे सभा होऊ लागल्या. शनिवार वाड्यातील मुख्य प्रवेशद्वारावर दिल्ली दरवाजावर सोळा पाकळ्या असलेल्या कमळाच्या फुलाच्या आकारात तयार केलेले हजारो कारंजे व दिवे प्रसिद्ध आहेत. शनिवार वाड्याची इमारत 21 फुट उंच आहे. आणि चारी बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदी भिंत आहे.
शनिवारवाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरुज आहेत. या नऊ बुरुजावर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यापैकी पागेचा बुरुज आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी एक खोल खड्डा आहे. त्यामध्ये तोफेचे गोळे ठेवले जात असत. तटबंदीला पाच दरवाजे आहेत ते अनुक्रमे दिल्ली दरवाजा, अलिबहादूर किंवा मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा, नाटक शाळा उर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. हे सर्व दरवाजे टोकदार कमानी मध्ये असून मोठे अनुकुची दार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यात दिल्ली दरवाजाची उंची 21फुट उंच असून रुंदी 14 फूट आहे. हाच दरवाजा मोठा आहे. वाड्याच्या सर्व तटावर मिळून 275 शिपाई, 500 घोडेस्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी 100 हून अधिक नोकर होते.
दिल्ली दरवाजावर नगरखाना आहे. आगीमधून वाचलेला पेशवेकालीन भाग हा एवढाच शाबूत आहे. देवडीच्या भिंतीवर विष्णू, गणपती या देवतेची तसेच महाभारतातील काही दृष्ट्यांची चित्रे काढलेली आहेत. ती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वाड्याच्या आतल्या भागात काय चालले हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहेत. एका पत्रातील मजकूरानुसार बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो मात्र आत स्वर्गासारखा दिसतो. तसेच येथून जवळच मुठा नदी वाहते.
गणेश रंग महाल:
शनिवार वाड्यातील गणेश रंग महाल ही नानासाहेब पेशव्यांनी इ.स.1755 साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळी 100 नृत्यांगना नृत्य करत असत. महालाच्या एका टोकाला गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. तर दुसऱ्या टोकाला कारंजा व सुंदर फुलबाग आहे. शनिवार वाडा हा किल्ला मराठा राज्याचे पेशवे (पंतप्रधान) यांनी बांधला होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आगी व आक्रमणे यामुळे जवळजवळ किल्ला नष्ट झाला आहे.
शनिवार वाड्याचे बांधकाम 10 जानेवारी 1730 रोजी त्याची पायाभरणी केली. आणि 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाडा बांधून तयार झाला. 1828 मध्ये आगीमुळे किल्ला बहुतेक नष्ट झाला. परंतु उर्वरित इमारती आजही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. 1808 1812,1813 यावर्षी लहान मोठ्या आगी लागलेच्या नोंदी आहेत. तसेच 17 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रजानी या किल्यावर हल्ला केला. 1919 मध्ये या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून नियुक्त केले गेले.
शनिवार वाड्यातील पेशव्यांचा खजिना:
शनिवार वाड्यातील पेशव्यांच्या मालकी खजिन्यांमध्ये 51,402 हिरे, 11,352 माणिक, 27,643 पाचु, 176,011 मोती, 435 नीलम, 432 वैडुर्य, 417 पुष्कराज, 75 गोमेद, 444 पोवळी, 378 करड्या, 1562 फिरोजा, 1912 करिपोला, 497 लसण्या असे मौल्यवान रत्ने होती. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. व उरलेला खजिना दुसऱ्या बाजीरावानंतर त्यांचा दत्तक पुत्र नानासाहेब (दुसरे) यांना मिळाला. कानपूर आणि विदुर ब्रह्मवर्त मध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अति मौल्यवान जड जवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथेच एका विहिरीत लपवून ठेवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गाॅर्डन अलेक्झांडर यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात 30 लाख रुपयांची सोन्या चांदीची नाणी, ताटे, वाट्या व इतर भांडी कित्येक शेर वजनाची चांदीची अंबारी आणि 70 लाख रुपयांचे दागिने जड जवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्यावेळी ब्रिटिशांना मिळाला होता.
शनिवार वाड्यावरील पुस्तके:
शनिवार वाड्याचा इतिहास सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत.
पोर्णिमा (कादंबरी) - साधुदास
पुण्याचा शनिवार वाडा - रमेश नेवसे
शनिवार वाडा (ललित कादंबरी) - वा. ना. शहा
शनिवार वाडा - गणेश खरे
शनिवार वाडा - प्र. के. घाणेकर
शनवार वाडा - प्रभाकर भावे
शनिवार वाड्याची कथा:
शनिवार वाड्यात एका राजपुत्राची निघुऀण पणे हत्या करण्यात आली होती. त्याचा आत्मा आजही रात्री किल्यावर ओरडत फिरत असतो. आसपासच्या लोकांना त्याच्या ओरडण्याच्या आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो असे म्हणतात. शनिवार वाडा आपल्या या भुताटकी प्रकरणामुळे प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की या महालात 30 ऑगस्ट 1773 च्या रात्री मराठा समाजाचे पाचवे पेशवे 16 वर्षाचे नारायण राव यांची त्यांच्या काकांनी कट रचना हत्या केली होती. जेव्हा मारेकरी किल्ल्यात शिरले तेव्हा त्यांना धोक्याची चाहूल लागली होती त्यामुळे ते आपल्या खोलीतून पळाले व ते काका मला वाचवा असे ओरडत होते परंतु त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. नारायण पेशव्यांचा आत्मा आजही काका मला वाचवा असे ओरडत भटकत असतो असे लोक म्हणतात. महालाच्या भिंतीवर रामायण आणि महाभारत काळातील चित्रे बनवली आहेत. अंधारात तर हे महाल अजूनच भीतीदायक वाटते. ज्यामुळे शनिवार वाड्याच्या गूढतेत भर पडते.
शनिवार वाडा लाईट अँड साऊंड शो:
शनिवार वाडा किल्ल्यावर दररोज संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो चे आयोजन केले जाते. मराठ्यांची समृद्ध इतिहासाची माहिती व्हावी यासाठी 1.25 कोटी रुपये खर्चून हा शो आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:15 ते 8:10 मिनिटापर्यंत मराठी भाषेत आणि इंग्रजी भाषेत 8:15 ते 9:10 या दरम्यान आयोजित केला जातो.
शनिवार वाडा प्रवेश वेळापत्रक व शुल्क:
शनिवार वाडा दररोज सकाळी 9:30 ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत खुला-- असतो. शनिवार वाड्यातील प्रवेश तिकिटाची किंमत प्रति माणूस 05 रुपये आणि परदेशी माणसांसाठी 125 रुपये आहे. लाईट आणि साऊंड शो साठी प्रतिव्यक्ती 25 रुपये इतके प्रवेश शुल्क आहे.
ही पण वाचा- धनत्रयोदशी मराठी माहिती 2023
सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव:
ऐतिहासिक महत्त्वाव्यतिरिक्त शनिवार वाडा सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. महाराष्ट्राच्या चैतन्यशील परंपरा साजरे करणारे विविध कार्यक्रम आणि प्रदर्शने या किल्ल्यामध्ये आयोजित केले जातात. या मध्ये पारंपारिक नृत्य प्रकार, संगीत मैफिली आणि त्या प्रदेशाची सांस्कृतिक समृद्धी दर्शविणारी प्रदर्शने पाहू शकतात.
जतन करण्याचे प्रयत्न:
काळाच्या ओघात शनिवार वाड्याला ऱ्हास आणि दुर्लक्षाच्या आव्हानांचा सामना करावा लागला. तथापि हे वास्तुशिल्प रत्न पुनर्संचयित करण्यासाठी आणि राखण्यासाठी ऐतिहासिक संवर्धन संस्था आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत. जीर्णोद्धार प्रकल्पांचा उद्देश केवळ भौतिक संरचना जतन करणे नाही तर शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची जाणीव वाढवणे देखील आहे.
निष्कर्ष:
शनिवार वाडा हा पुण्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. त्याचे स्थापत्य वैभव, शौर्य आणि षड्यंत्राच्या कथा जाणून घेण्यासाठी इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक आवश्यक ठिकाण आहे. आम्ही शनिवार वाड्याची माहिती देत असताना केवळ भूतकाळातच लक्ष घालत नाही. तर ते प्रतिनिधित्व करत असलेल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही हातभार लावतो.
FAQ'S
1.शनिवार वाडा कधी बांधला?
शनिवार वाड्याचे बांधकाम 10 जानेवारी 1730 रोजी त्याची पायाभरणी केली. आणि 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाडा बांधून तयार झाला.
2.शनिवार वाडा कोणी बांधला?
शनिवार वाडा मराठा साम्राज्याच्या छत्रपती शाहू महाराजांच्या अधिपत्याखालील बाजीराव पेशवा प्रथम याने बांधला होता.
3.शनिवार वाडा हे नाव कसे पडले?
शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले.तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले.
लक्ष्य द्या:
मित्रांनो वरील लेखात शनिवार वाडा मराठी माहिती याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे शनिवार वाडा मराठी माहिती बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
धन्यवाद
हे पण वाचा
- ओम जप आरोग्य लाभ आणि आरोग्य टिप्स
- सिंधुताई सपकाळ - अनाथांची माई मराठी माहिती
- कोल्हापूर संस्थापिका महाराणी ताराराणी
- थॉमस एडिसन मराठी माहिती
- भारतीय नौदलाचा इतिहास