हृदयविकार कारणे व आयुर्वेदिक उपचार मराठी माहिती

Heart

मित्रांनो सकाळी वर्तमानपत्र उघडल्यानंतर आपण निधन वार्ता नावाचे कॉलम रोजच पाहतो.ज्यामध्ये बरेचसे अपरिचित असून देखील जेव्हा एखाद्या तरुणाचा फोटो पाहतो. तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं व ती बातमी आपण पूर्णपणे वाचतो. वयाच्या तिशी चाळीसी मध्ये काही त्रास नसताना अचानक एखाद्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असे वाचतो. तेव्हा ज्येष्ठ नागरिक देखील विचारात पडतो. मनामध्ये त्याचे आई-वडील, पत्नी व नातेवाईक यांचा विचार येतो. मन सुन्न होते व काही तासाने आपण ती बातमी पूर्णपणे विसरून जातो. 

जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांनी हजारो रुग्णांची हृदयविकाराच्या झटक्यातून सुटका केली. परंतु त्यांना स्वतःला देखील वाचवण्याची संधी मिळाली नाही. तीन महिन्याखालीच अहमदाबाद येथील वीस हजार हृदयाच्या शस्त्रक्रिया केलेल्या सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मागे देखील 25 तज्ञ डॉक्टरांच्या सेमिनारमध्ये चेस्ट फिजिशियन असलेल्या डॉक्टराचा वयाच्या पन्नासाव्या वर्षी निबंध सादर करून बाहेर पडतानाच हृदयविकाराचा झटका येण्याने निधन झाले. सोबत असलेले पंचवीस तज्ञ डॉक्टर सुद्धा त्यांना वाचवू शकले नाहीत. 

मागील वर्षी कर्नाटक मधील सुपरस्टार पुनित राजकुमार चे वयाच्या 40 शी मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तसेच नुकतेच आपल्या मराठीचे सुप्रसिद्ध कलाकार श्रेयस तळपदे यांना सुद्धा हृदयविकाराचा झटका येऊन गेला. पण ते सुदैवाने त्याच्यातून बचावले. कुठलाही त्रास नसताना वयाच्या तिशी चाळीशी मध्ये मृत्यू होताना पाहून मन सुन्न होते. त्यामुळे पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. 

मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदय हा मांस पेशींनी बनलेला अवयव असून त्याचा आकार हाताच्या बंद मुठी एवढा असतो. प्रति मिनिट बहात्तर प्रमाणे दिवसातून दहा लाख वेळा आपल्या हृदयाचे आंकुचन प्रसरण पावत असते. हृदय जोपर्यंत व्यवस्थित काम करत असते तोपर्यंत मानव जिवंत राहू शकतो. हृदय बंद झाले की मृत्यू अटळ आहे. 

शरीरातील रक्त प्रवाह संचलनाचे नियंत्रण हृदयाकडून होते. रक्तप्रवाहाच्या संचलनामध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हा हृदय विकार होतो. हल्लीची आपली जीवण शैली, व्यायामाचा अभाव, प्रदूषण, अन्नपदार्थांमध्ये भेसळ, अतिरिक्त कीटकनाशकांचा वापर, साखर,  आयोडाइज्ड मिठाचा अतिरिक्त वापर, जंकफूड, चायनीज पदार्थांचा अतिरेक, पिझ्झा, बर्गर अशा बेकरी पदार्थांचा अतिरेक तसेच जिम मधील व्यायामाचा अतिरेक ही काही महत्त्वाची कारणे हृदयविकार निर्माण करतात. शिवाय प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळ, ताण तणाव, वेळी अवेळी भोजन, सात्विक आहाराऐवजी राजस व तामस आहाराचा अतिरेक यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. 

शरीरात तयार झालेल्या चरबीचे कण रक्तवाहिन्यांमध्ये साचत जाऊन रक्त वहनास प्रतिबंध करतात. हे अडथळे हृदयांच्या रक्तवाहिन्यांमध्ये असतील तर हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. जर अडथळे मेंदूच्या भागात असतील तर पक्षवध (पॅरालिसिस) होऊ शकतो. पूर्वी या समस्या पन्नाशी साठी नंतर उद्भवत असत कारण वयोमानानुसार रक्तवाहिन्यांमध्ये काठीण्य येत होते. व त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत असत. तथापि हल्लीच्या आपल्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब या समस्या प्रत्येकामध्ये निर्माण होत असताना दिसतात. या समस्या आपण टाळू शकतो. परंतु त्यासाठी आपणास पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणे सोडून भारतीय संस्कृतीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. हल्ली आपण आहारात नाही तर व्यायामात देखील पाश्चिमात संस्कृतीचे अनुकरण करत आहोत. 

जिम मधील व्यायाम हा आकर्षक व पिळदार शरीर अवश्य तयार करतो. तथापि जिम मध्ये तासन्तास व्यायाम केल्याने तसेच त्यासोबत अतिरिक्त प्रोटीन सेवन केल्याने त्याचा हृदयावर अतिरिक्त भार पडणे हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीतील प्राणायाम, योगासन, जोर, बैठका हाच व्यायाम आपल्या भारतीय हवामानाला पोषक आहे. अतिरिक्त धूम्रपान हे देखील हृदयाला घातकच आहे. हल्ली धुम्रपानासोबत मद्यपानांना सुद्धा प्रतिष्ठा मिळत आहे. जे स्वस्तात खूप हानिकारक आहे. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, शारीरिक श्रमाचा अभाव, ताण तणाव, अनुवांशिकता, रागीटपणा शिवाय दिवसातील 24 तासांपैकी 18 ते 20 तास कार्यालयीन कामकाज करणे, अपुरी झोप, अपुर्ण विश्रांती, तसेच जिभेला स्वादिष्ट वाटणाऱ्या पदार्थाचे आणि कोल्ड्रिंक्सचे अतिरिक्त सेवन ही देखील हृदयविकाराची कारणे आहेत. 

हृदयविकाराची लक्षणे:

हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीमध्ये तीव्र वेदना होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दरदरून घाम सुटणे, मळमळ, चक्कर येणे, वेदना छाती पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्याकडे होऊन तिथून त्या मान किंवा डाव्या हाताकडे जातात ही लक्षणे सुमारे 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ टिकतात. काही वेळेला रुग्ण पांढरा पडतो व रुग्णाला मृत्यू येतो. हृदयविकाराच्या पहिल्या झटक्यात 40℅ लोकांना मृत्यू येत असतो. आपण त्या 40 टक्यात आहोत की 60 टक्यात आहोत हे पाहण्यासाठी आपण जिवंत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

सद्यस्थितीत आपल्या आरोग्या विषयी जागृत असणे नितांत गरजेचे आहे. हृदयविकार तसेच इतर प्राण घातक व्याधींपासून आपला बचाव करण्यासाठी आयुर्वेदाचा अंगीकार प्रत्येक व्यक्तीने करणे आवश्यक आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रातील हृदयरोग तज्ञांचा हृदयविकाराने मृत्यू होऊ शकतो. तेव्हा त्या वैद्यकशास्त्रावर पूर्णपणे अवलंबून न राहता त्यासोबत आयुर्वेदिक औषधोपचार घेणे आवश्यक असते. कारण आधुनिक रासायनिक औषधांमुळे रोगाचे उच्चाटन न करता फक्त आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यात कितपत यश मिळते हे आपण पाहतोच आहोत. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, इसीजी, बायपास या करता लाखो रुपये खर्च करून देखील इतर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतच असतात. व पुन्हा पुन्हा अँजिओप्लास्टी करावी लागते. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणे सर्वांना शक्य नसते. हा लाखो रुपयांचा खर्च करून देखील शाश्वती नसते. तेव्हा फक्त आधुनिक वैद्यक शास्त्रावर अवलंबून न राहता. त्यासोबत आपण आयुर्वेदिक उपचार ते देखील सर्वांना परवडेल अशा खर्चात घेऊ शकतो. 

आयुर्वेदात हृदयविकारासाठी अत्यंत उपयुक्त औषधे आहेत. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणे तसेच रक्तवाहिनी मधील ब्लॉकेज कमी करणे शिवाय हृदय कमकुवत असेल तर ते मजबूत करणे यासाठी सद्यस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आयुर्वेदिक औषधे घ्यावी. आयुर्वेदिक औषधाने कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम न होता आपला हृदयविकारापासून बचाव होऊ शकतो. हृदयविकारापासून ज्यांना धोका संभवतो किंवा हृदयविकारापासून ज्यांना स्वतःचा बचाव करायचा आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये आयोडाइज्ड मीठ, साखर व चरबी युक्त स्निग्ध पदार्थांचे सेवन टाळावे फायबर युक्त व  कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर स्वयंपाकात करावा. 

भारतीय पारंपरिक पदार्थांचे जसे की गुळ, लाकडी घाण्याचे तेल, सैंधव मीठ इत्यादींचा वापर स्वयंपाकात करावा. रोज सकाळी आपल्या शक्ती प्रमाणे शारीरिक व्यायाम करावा. धूम्रपान, मद्यपान त्वरित बंद करावे. मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल साठी ची औषधे नियमितपणे घ्यावी. त्यासोबतच लिंबू, अद्रक, विनेगर व मध यापासून बनवलेले संजीवन रोज सकाळी अनुशापोटी पाच ते दहा मि.ली सेवन करावे. लिंबू ,अद्रक, लसुन, विनेगर व मध यांच्या गुणधर्मामुळे शरीरातील अडथळे ब्लॉकेजेस कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यासोबतच आयुर्वेदिक औषधे, कॅप्सूल, सिरप घेतल्याने अँजिओग्राफी व बायपास पासून आपण आपला बचाव करू शकतो. 

हर्बल उपचार: अर्जुना, अश्वगंधा आणि गुग्गुल यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये हृदय-संरक्षणात्मक गुणधर्म असल्याचे मानले जाते. या औषधी वनस्पती हृदयाचे कार्य सुधारण्यात, जळजळ कमी करण्यास आणि संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यात मदत करू शकतात.

हृदयविकाराचा झटका कधीही कुठेही येऊ शकतो. तेव्हा दवाखान्यात पोहचण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. ती पंधरा मिनिटे अतिशय महत्त्वाची असतात. तेव्हा रुग्ण रुग्णालयात पोहचण्यापूर्वी रुग्णाचा बचाव करण्यासाठी Tab.Sorbitrate 5 mg ही गोळी जिभेखाली ठेवावी. तसेच Tab.Ecosprin 150 mg च्या दोन गोळ्या आणि Tab.Statin 40 mg च्या दोन गोळ्या रुग्णास त्वरित दिल्यास रुग्ण हॉस्पिटल पर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. या तिन्ही गोळ्यांची किंमत अवघी 50 रुपये आहे. या गोळ्यांची किट आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कायम आपल्या खिशामध्ये, पर्समध्ये किंवा घरामध्ये ठेवल्यामुळे आपण आपला तसेच इतरांचा जीव देखील वाचवु शकतो. हल्ली हृदयविकाराच्या प्रमाणामध्ये खूपच वाढ झाली आहे. तेव्हा आपण हृदयविकाराचा झटका येण्याची वाट न पाहता आत्ताच काळजी घेतल्यास आपणास पुढे काळजीचे कारण राहणार नाही. तुम्ही हृदयाची काळजी घेतल्यास हृदय नक्कीच तुमची काळजी घेईल. 

हे पण वाचा-

टिप्स:
वरील माहितीवरून कोणताही दावा केला नाही तरी कोणत्याही आजारासाठी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

लक्ष्य द्या:

मित्रांनो वरील लेखात हृदयविकार कारणे व आयुर्वेदिक उपचार मराठी माहिती याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे हृदयविकार कारणे व आयुर्वेदिक उपचार मराठी माहिती बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

धन्यवाद 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.