प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 महाराष्ट्र: चांगल्या भविष्यासाठी मातांचे सक्षमीकरण
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 चे महत्त्व:
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भारतातील महाराष्ट्र राज्याने मातृवंदना योजना सुरू केली आहे. ही दूरदर्शी योजना गरोदर मातांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी, गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मादरम्यान त्यांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मातृवंदना योजना माता आरोग्य आणि राज्यातील मातांच्या कल्याणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. या लेखात आपण मातृ वंदना योजना 2.0 चे महत्त्व, उद्दिष्टे, पात्रता, निकष याबद्दलची माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 (PMMVY) महाराष्ट्र 2023 मराठी माहिती( Matruvandana Yojana 2.0 (PMMVY) Maharashtra 2023 information in marathi )
दारिद्र्यरेषेखालील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर ही शारीरिक क्षमता नसतानाही मजूरी साठी काम करावे लागते. यामुळे अशा महिला व माता कुपोषित राहून नवजात बालकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ योजना संपूर्ण देशात लागू केली आहे. आणि महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली होती. या अंतर्गत अशा गर्भवती महिला व स्तनदा मातांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून नवजात बालकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व माता व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा हा त्यामागचा उद्देश आहे.
हे पण वाचा
- शनिवार वाडा मराठी माहिती
- धनत्रयोदशी मराठी माहिती
- विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2023
- शेतकरी आणि महाडीबीटी योजना
- भारतीय संस्कृती विरुद्ध पाश्चात्त्य संस्कृती
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची वैशिष्ट्ये:
मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे. ही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागा अंतर्गत राबवण्यात येत असून या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे. हा निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उघडण्यात आलेल्या Escrow Account मध्ये जमा करण्यात येत होता. दिनांक 8- 12- 2017 च्या शासन निर्णयानुसार सदर योजना मातृ वंदना योजना 1.0 महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवली जात असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य/ जिल्हास्तरावरून सदर योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू होती. शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत(शासकीय रुग्णालयात) गर्भवती महिलेस पहिल्या जीवित अपत्या पुरताच लाभ मिळत असून तीन टप्प्यात लाभाची रक्कम पाच हजार रुपये डीबीटी मार्फत लाभार्थीच्या बँक पोस्ट खात्यात दिली जात होती.
सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0:
शासन निर्णय
केंद्र शासनाच्या महिला बाल विकास विभागाकडून दिनांक 14-07- 2022 च्या परिपत्रकानुसार 'मिशन शक्तीच्या' मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या होत्या.त्यानुसार दिनांक 03-01- 2023 च्या परिपत्रकांमधील मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित मातृ वंदना योजना 2.0 राज्यात लागू करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती.त्याप्रमाणे मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण 14 योजना एकत्रित केलेल्या आहेत. त्यापैकी 'सामर्थ्य' या विभागात एकूण सहा योजना असून या योजनेमध्ये प्रधानमंत्री मातृ योजना 2.0 चा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 अंतर्गत लाभार्थ्याला लाभ देणे व योजना राबवण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन 2023-24 पासून पुढील प्रमाणे राज्यात लागू करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 चा लाभ:
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्त्यासाठी रुपये 5000 ची रक्कम दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात सहा हजार रुपये चा लाभ आधार संलग्न बँक किंवा पोस्ट खात्यात डीबीटी मार्फत दिला जाईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 अटी:
1.पहिला हप्ता
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झाली पाहिजे. लाभार्थी महिलेला यामध्ये पहिल्या अपत्यासाठी तीन हजार रुपये तसेच दुसरे अपत्य मुलगी झाल्यास तिच्या जन्मनंतर एकत्रित सहा हजार रुपये लाभार्थीला दिले जातात.
2.दुसरा हप्ता
बालकाची जन्म नोंदणी तसेच लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक यामध्ये लाभार्थी महिलेला पहिल्या अपत्यासाठी दोन हजार रुपये इतका लाभ मिळतो.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 योजनेचे उद्दिष्ट
- माता व बालकांच्या आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकर आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
- जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे व माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा.
- सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे. स्त्रीभ्रूणहत्येस आव रोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल.
- लाभार्थ्याकडून शासकीय आरोग्य केंद्रातून सुविधांचे लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून त्यामध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवणे.
- नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्म नोंदणीच्या प्रमाणात वाढ व्हावी.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक:
- ज्या महिलेचे निव्वळ कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे.
- अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिला.
- 40% व अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग महिला.
- बी पी एल शिधा पत्रिका धारक महिला.
- आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत लाभार्थी महिला.
- ई श्रम कार्ड धारक महिला.
- पी एम किसान सन्माननिधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकरी महिला.
- मनरेगा जॉब कार्ड धारक महिला.
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी मदतनीस.
वरील नमूद केलेल्या एका कागदपत्रासह खालील कागदपत्रे व तपशील देणे आवश्यक:
- आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी कागदपत्र
- माता आणि बाल संरक्षण कार्ड (MCP)
- ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसूतीपूर्व तपासणीच्या नोंदी, तसेच बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत इत्यादी असावे.
- लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुक ची प्रत.
- बाळाच्या जन्म नोंदणीच्या प्रमाणपत्राची प्रत.
- गरोदरपणाची नोंदणी केलेला आर. सी.एच (RCH)पोर्टल मधील नोंदणी क्रमांक.
- लाभार्थीचा स्वतःचा, पतीचा किंवा कुटुंबातील इतर सदस्याचा आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक.
- वेळोवेळी नमूद केलेले अन्य कागदपत्र.
लाभार्थीकडे आधार कार्ड नसल्यास खालीलपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक.
- बँक किंवा पोस्ट खाते फोटो पासबुक
- मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पॅन कार्ड
- MGNREGS जॉब कार्ड
- सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेल्या तिच्या पतीचे कर्मचारी फोटो ओळखपत्र
योजनेची वैशिष्ट्ये:
सर्व नवीन लाभार्थी ज्यांची मासिक पाळीची शेवटची तारीख एल.एम.पी (LMP) मिशन शक्तीची मार्गदर्शक तत्वे प्रकाशित झाल्याच्या तारखेनंतर आहे.त्यांना मातृ वंदना योजना 2.0 च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार लाभ मिळेल.
जर एखाद्या महिलेने आधीच मातृ वंदना योजना 1.0 अंतर्गत पहिला हप्ता मिळवला असेल व मातृ वंदना योजना 2.0 च्या निकषानुसार लाभ मिळवण्यासाठी पात्र असेल तर तिला उर्वरित लाभ मिळू शकतात.
लाभ देण्याची काल मर्यादा:
पहिल्या अपत्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या एल.एम.पी (LMP) दिनांकापासून पूर्वी असणारा 730 दिवसांचा कालावधी कमी करून तो 510 दिवसांवर आणला आहे. तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून 210 दिवसापर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे नोंद करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या कालावधीतच अर्ज करणे आवश्यक आहे. कालावधी उलटून गेल्यावर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच लाभार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला असेल परंतु प्रधानमंत्री मातृ योजनेच्या नवीन संगणक प्रणाली द्वारे कोणत्याही कारणामुळे अर्ज स्वीकारले जात नसल्यास अशा लाभार्थींना लाभ दिला जाणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय 18 वर्षे व कमाल 55 वर्षे यादरम्यान असावे.
जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या वेळेस अपत्य झाले असतील त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील तर मातृ वंदना योजना 2.0 च्या नियमानुसार दुसरे अपत्य मुलगी असल्याचा लाभ मिळेल.
लाभार्थ्याने दिलेल्या कालावधीत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणेची नोंदणी करणे आवश्यक
लाभार्थी महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट https://wcd.nic.in/ वर जाऊन अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करू शकतो. सिटीजन लॉगिन मधून ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा आहे. लाभार्थ्यांनी हा फॉर्म परिपूर्ण भरून लाभार्थ्याने स्वाक्षरी केलेल्या हमीपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे अर्ज जमा करावा.
या योजनेचा लाभ तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते यामध्ये डी.बी.टी. द्वारे जमा केला जाईल.
पगारी मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास भविष्यातील तिची गर्भधारणा ही नवीन लाभार्थी म्हणून नोंदवली जाईल.
लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रस्तुती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रुपये 1400 ग्रामीण भागात व रुपये 1000 शहरी भागात लाभ मिळेल.
प्रधानमंत्री मातृवंदना 2.0 योजनेमागील दृष्टी:
माता आरोग्य हा कोणत्याही समाजाच्या कल्याणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. निरोगी आईने निरोगी मुलाला जन्म देण्याची अधिक शक्यता असते. ज्यामुळे दोघांचे भविष्य उज्वल होते. मातृवंदना योजनेचे उद्दिष्ट माता आरोग्याच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणे हे आहे. ज्यात गर्भवती महिलांना पुरेशी प्रसवपूर्व काळजी, पोषण आणि आधार मिळतील याची खात्री करणे समाविष्ट आहे. माता आणि बालमृत्यू दर कमी करणे आणि मातांना त्यांच्या नवजात मुलांसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध करून देणे हे यामागचे ध्येय आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 महाराष्ट्राची प्रमुख वैशिष्ट्ये:
1.आर्थिक सहाय्य:
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य मिळते. आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील महिलांसाठी ही मदत विशेषत: महत्त्वाची आहे. कारण ती त्यांना आवश्यक आरोग्य सेवा आणि पोषण मिळवण्यात मदत करते.
2.जागरूकता आणि शिक्षण:
योजना आर्थिक मदत देण्यावर थांबत नाही. ही गर्भवती महिलांना नियमित तपासणीचे महत्त्व, योग्य पोषण आणि संस्थात्मक (शासकीय आरोग्य केंद्र) प्रसूतीचे फायदे याबद्दल शिक्षित करण्यावर भर देते. हे ज्ञान असलेल्या महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करते.
3.आरोग्यसेवेसाठी शासकीय आरोग्य केंद्रात प्रवेश:
मातृवंदना योजना आरोग्य सेवा सुविधांमध्ये आपल्या बाळांना जन्म देणाऱ्या मातांना प्रोत्साहन देऊन संस्थात्मक (शासकीय आरोग्य केंद्रातील) प्रसूतींना प्रोत्साहन देते. हे सुनिश्चित करते की बाळाचा जन्म सुरक्षित आणि निर्जंतुक वातावरणात होतो. ज्यामुळे गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो.
4.भविष्याचे रक्षण:
ही योजना केवळ गरोदरपणात मातांनाच मदत करत नाही तर प्रसूतीनंतरच्या काळातही मदत करते. ज्यामुळे आई आणि मूल दोघांनाही योग्य काळजी आणि लक्ष मिळण्याची खात्री होते.
5.सकारात्मक प्रभाव:
मातृवंदना योजनेने महाराष्ट्रातील माता आणि बालकांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव यापूर्वीच दाखवून दिला आहे. यामुळे संस्थात्मक(शासकीय आरोग्य केंद्रात) प्रसूती वाढल्या आहेत. आरोग्यसेवेची उत्तम उपलब्धता आणि गरोदर मातांमध्ये जागरूकता वाढली आहे. मातांना आवश्यक ती काळजी मिळेल याची खात्री करून ही योजना राज्यातील माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यास हातभार लावते.
हे पण वाचा
- लेक लाडकी योजना 2023
- स्टार्टअप इंडिया योजनेची माहिती
- अटल पेन्शन योजना - सुरक्षित भविष्य
- सुकन्या समृद्धी योजना(SSY)
- लाकडी घाणा शुद्ध तेलाचे फायदे
निष्कर्ष:
मातृवंदना योजना महाराष्ट्र ही राज्यातील गरोदर मातांसाठी आशेचा किरण आहे. माता आरोग्याच्या गंभीर समस्येचे निराकरण करून आणि आर्थिक सहाय्य, शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देऊन ही योजना केवळ मातांना सक्षम बनवत नाही तर पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करते. हे सरकारचे सामाजिक कल्याणासाठी असलेल्या समर्पणाचा पुरावा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मातांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. मातृ वंदना योजना ही राज्याच्या निरोगी व उज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
लक्ष्य द्या:
मित्रांनो वरील लेखात मातृवंदना योजना 2.0 महाराष्ट्र 2023 याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे मातृवंदना योजना 2.0 महाराष्ट्र 2023 बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
धन्यवाद