नरक चतुर्दशी मराठी माहिती 2023


नरक चतुर्दशीच्या परंपरांचे अनावरण: प्रकाशाचा उत्सव आणि अंधारावर विजय

परिचय: नरक चतुर्दशी  मराठी माहिती 2023

नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. जो अश्विन महिन्यातील गडद पंधरवड्याच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून या शुभ प्रसंगाचे धार्मिक महत्त्व आहे. अश्विन कृष्ण पक्ष चतुर्थीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या  पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. या लेखात आम्ही नरक चतुर्दशी मराठी माहिती पाहणार आहोत. तसेच विधी, पौराणिक कथा आणि या सणांना खूप महत्त्व देणारे धार्मिक संदर्भ पाहणार आहोत.

अभंग्यस्नानाचा शुभ मुहूर्त

अभंग्यस्नानाचा शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबरला

पहाटे 5:28 ते 6:41 पर्यंत असेल. पंचांगानुसार सूर्योदयापूर्वी चतुर्दशी तिथी असते तर सूर्यास्तानंतर अमावस्या तिथी असते यावर्षी 12 नोव्हेंबरला रविवारी एकाच दिवशी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन आले आहे. 

अभंग स्नान

नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी मुलतानी माती किंवा उटणे लावून आंघोळ करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंग स्नान म्हणतात. ज्यामध्ये हळद, तिळाचे तेल, दही, बेसन, चंदन आणि औषधी वनस्पती वापरल्या जातात या पेस्टने त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. अभंग्य स्नानाला पहिली आंघोळ सुद्धा म्हणतात. 

ऐतिहासिक महत्व: 

नरक चतुर्दशीची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथांमध्ये विशेषत: भगवान श्रीकृष्ण आणि नरकासुर राक्षसाच्या कथेमध्ये शोधली जाऊ शकते. पौराणिक कथेनुसार नरकासुर हा एक शक्तिशाली आणि अत्याचारी राक्षस होता. ज्याने स्वर्गात दहशत निर्माण केली होती. या संकटापासून जगाचे रक्षण करण्याची गरज ओळखून भगवान श्रीकृष्णाने नरकासुराशी भयंकर युद्ध केले आणि छोटी दिवाळीच्या दिवशी(अश्विन कृष्ण पक्ष चतुर्थीला) विजय मिळवला. हा विजय वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. 

नरक चतुर्दशी मराठी माहिती 2023

नरक चतुर्दशी दिवाळीचा पहिला दिवस आणि धनत्रयोदशीनंतर येतो. नरक चतुर्दशीला काळी चतुर्दशी असेही म्हणतात. या दिवशी अमावस्या असते. भारतातील काही ठिकाणी नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणून ही ओळखले जाते. या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. अकाली मृत्यूची भीती दूर करण्यासाठी तसेच मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती व्हावी यासाठी या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून उठणे लावून अभंग्य स्नान केले जाते. 

नरक चतुर्दशी का साजरी केली जाते

नरक चतुर्थी साजरी करण्यामागे एक आख्यायिका आहे की या दिवशी दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होऊन अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते तसेच मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते. नरक चतुर्दशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात या दिवशी यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो. तसेच मृत्यूनंतर त्याला स्वर्ग प्राप्त होते. एक अशी आख्यायिका आहे की भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून आंघोळ केली. तेव्हापासून तेल आणि उठणे लावून आंघोळ करण्याची परंपरा चालू झाली. 

नरक चतुर्थी विषयी पौराणिक कथा

नरक चतुर्दशी बद्दल एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे नरकासुर नावाचा एक राक्षस होता त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून आपला कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्यानंतर त्यानी देव, देवता, मानव आणि स्त्रियांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या राजकन्या व त्यांच्या राज्यातील 16100 स्त्रियांचे अपहरण केले. आणि त्यांना कैद करून ठेवले. आणि त्यांच्याबरोबर विवाह करण्याचा बेत ठरवला. याबरोबरच त्यांच्याकडून भरपूर संपत्ती लुटली तसेच देव माता आदितीचे कुंडले व वरुणाची विशाल छत्री बळकावली. त्याच्या शक्तीने देव, देवता व मानव यांना खूप त्रास सहन करावा लागला. नरकासुराची प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक खंदकाने, अग्नी, पाणी आणि गिरीदुर्गांनी वेढलेली होती. ही बातमी श्रीकृष्णाला समजताच श्रीकृष्ण गरुडावर स्वार होऊन नरकासुरावर आक्रमण करतात. या लढाईत श्रीकृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला आणि नरकासुराच्या बंदीवासातील स्त्रियांची मुक्तता केली. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला आजच्या तिथीला जो अभंग्य स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये कृष्णाने नरकासुराला वर दिला त्यामुळे नरक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभंग स्नान करण्याची रीत पडली नरकासुराच्या ताब्यातील 16,100 राज कन्यांना त्यांचे लोक स्वीकारणार नाहीत म्हणून श्रीकृष्णांनी16,100

राजकन्यासोबत लग्न केले आणि समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली.  

नरक चतुर्दशीचे महत्त्व उलगडणे

हिंदू सणामध्ये नरक चतुर्दशीच्या सणाला विशेष स्थान आहे. उत्साहाने आणि भक्तीने साजरा होणारा हा शुभ प्रसंग आध्यात्मिक महत्त्व आणि सांस्कृतिक परंपरांचे घटक एकत्र आणतात. 

नरक चतुर्दशी:

नरक चतुर्दशी याला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. ही मुख्य दिवाळी सणाच्या आधी येते. हे दैत्य नरकासुरावर भगवान कृष्णाच्या विजयाचे स्मरण करते. जे अत्याचारावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. सर्व लोक पहाटेच्या आधी उठतात विधीवत तेल व उठणे लावुन स्नान करतात. त्यानंतर आपल्या पायाच्या अंगठ्याने करटुले (कारीट) किंवा चिरोटा नावाचे कडू फळ फोडले जाते. आणि अंधार दूर करण्यासाठी दिवे लावतात. शुद्धीकरण विधी शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही अशुद्धता काढून टाकणे सूचित करते.

धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त नरक चतुर्दशी उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. कुटुंबे एकत्र येऊन मिठाईची देवाणघेवाण करतात. फटाके फोडतात आणि उत्सवाचा आनंद लुटतात. हा दिवस एक स्मरणपत्र आहे की प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवेल. व्यक्तींना त्यांच्या जीवनात चांगुलपणासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देईल.

निष्कर्ष:

नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्यातील नरकरुपी पाप वासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करून आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित करण्याचा दिवस आहे. 

हे ही वाचा-  ओम जप आरोग्य लाभ आणि आरोग्य टिप्स

हे ही वाचा-  सिंधुताई सपकाळ - अनाथांची माई मराठी माहिती

लक्ष्य द्या:

मित्रांनो वरील लेखात नरक चतुर्दशी मराठी माहिती 2023 याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे नरक चतुर्दशी मराठी माहिती 2023 बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

धन्यवाद 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.