दिवाळी भाऊबीज मराठी माहिती 2023 - Diwali Bhaubij Marathi Information 2023


शीर्षक: 

भाऊबीज : भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे अतुट प्रेम दाखवणारा सण

परिचय: दिवाळी भाऊबीज मराठी माहिती 2023 

भाऊबीज ज्याला हिंदीमध्ये भाई दूज असेही म्हणतात. हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणींमधील अनोखा बंध साजरा करतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या सहाव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीज चे महत्व भावंडांमध्ये प्रेम, आदर आणि आपुलकी वाढवणे हे आहे. या लेखात आम्ही भाऊबीजशी संबंधित समृद्ध इतिहास, परंपरा आणि दिवाळी भाऊबीज मराठी माहिती 2023 यांची माहिती घेणार आहोत.

भाऊबीजेचे महत्व:

भाऊबीजची उत्पत्ती प्राचीन भारतीय पौराणिक कथांमधून शोधली जाऊ शकते. नरकासुर या राक्षसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्राला भेट दिली अशी आख्यायिका आहे. सुभद्राने तिच्या भावाचे स्वागत आरतीने केले. (दीपक दिव्याने आदर दाखवण्याचा पारंपारिक विधी) आणि त्याच्या कपाळावर टिळक लावले. हा विधी आज साजऱ्या केल्या जाणार्‍या भाऊबीज प्रथांमागील प्रेरणा असल्याचे मानले जाते. 

भाऊबीज हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण बहिण भावाच्या ना त्यामधील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया( यम द्वितीया) या दिवशी असतो. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. बहिण भाऊ यांचा सण म्हणजेच भाऊबीज हा महाराष्ट्र पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. 

हे पण वाचा -  बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा मराठी माहिती

भाऊबीज पौराणिक कथा:

सूर्यपुत्र यम आणि यमी( यमुना) हे दोघे भाऊ-बहीण होते. या दिवशी मृत्यूची देवता म्हणजेच यमराज आपली बहीण यमुने कडे गेला होता अशी आख्यायिका आहे. यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घातले नंतर औक्षण केले. आणि यमराजच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले यावेळी यमुना म्हणाले की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही हे ऐकल्यावर यमराजांनी बहिणीच्या मागणीनुसार तिला वरदान दिले. यामुळे या दिवसाला यमद्वितीया असे म्हटले जाते. तसेच या दिवसापासूनच भाऊबीज या उत्सवाला सुरुवात झाली. 

भगवान कृष्ण आणि सुभद्रा यांची कथा :

दुसर्‍या आख्यायिकेनुसार भाऊबीजच्या दिवशी नरकासुर या राक्षसाचा वध करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिने अनेक दिवे लावून त्यांचे स्वागत केले. सुभद्राने कपाळावर तिलक लावून भगवान श्रीकृष्णाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती. या दिवसापासून भाऊबीजच्या निमित्ताने बहिणी भावांच्या कपाळावर टिळक लावतात आणि त्या बदल्यात भाऊ त्यांना भेटवस्तू देतात. 

या दिवशी यमुना नदीत स्नान करणे शुभ मानले जाते. कारण असे केल्यामुळे त्यांना यमापासून भय नसते अशी आख्यायिका आहे

भाऊबीज का साजरी करतात:

या दिवशी बहिण भावाला आरती ओवळून त्याची पूजा करीत असते. त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेम भावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजे यमराज्याच्या पाशातून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा या मागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्ती प्रमाणे वस्तू ओवाळणी म्हणून देतो. भाऊबीजच्या दिवशी पत्नीच्या हातचे किंवा घरी जेवण जेवु नये. त्याने बहिणीच्या घरी जाऊन तेथेच भोजन करावे असे धर्मग्रंथात सांगितले आहे. तसेच भावाने बहिणीकडे जाऊन बहिणीने भावाला ओवाळावे अशी परंपरा आहे. संध्याकाळी बहीण प्रथम चंद्राच्या कोरेला ओवाळते नंतर भावाला ओवाळते मग भाऊ ताटात ओवाळनी देऊन बहिणीचा सत्कार करत असतो. 

भाऊबीज कशी साजरी करतात:

भाऊबीज हा सण रक्षाबंधनाप्रमाणेच महत्त्वाचा आहे. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. त्यानंतर त्याला एका पाठावर बसवुन त्याला ओवाळले जाते. नंतर त्याला गोड पदार्थांचे जेवण वाढले जाते. अशा प्रकारे हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. बहिण भावाला ओवाळून पूजा करत असते. कारण भावाची मृत्यूपासून सुटका व्हावी व तो यशस्वी व दीर्घायुषी व्हावा या मागचा खरा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्ती प्रमाणे आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर पर पुरुषाला भाऊ मानावे किंवा चंद्राला आपला भाऊ म्हणून ओवाळावे. तसेच भावाला बहीण नसली तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला बहीण मानून तिच्याकडे जावे. 

भाऊबीज 2023 मुहूर्त:

भाऊबीज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी आहे भाऊबीजेचा मुहूर्त लाभ चौघडीया (शुभ वेळ) सकाळी 6:43 मिनिटा पासून ते 8:04  मिनिटा पर्यंत पहिला शुभमुहूर्त असणार आहे. तर दुसरा मुहूर्त अमृत चौघडिया ( शुभ वेळ) सकाळी 8:04 मिनिटांपासून 9:04 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तिसरा मुहूर्त अमृत चौघडिया (शुभ वेळ) सकाळी 10:45 मिनिटांपासून ते 12:05 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

भाऊबीज विविध प्रथांद्वारे चिन्हांकित आहे. जे भाऊ आणि बहिणींमधील खोल बंधनाचे प्रतीक आहे. बहिणी आपल्या भावांची आरती करतात. कपाळावर तिलक लावतात आणि त्यांना मिठाई देतात. त्या बदल्यात भाऊ त्यांच्या बहिणींना प्रेम आणि कौतुकाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात. ही देवाणघेवाण एकमेकांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करते.

टिळक सोहळा: 

भाऊबीजेच्या वेळी टिळक सोहळा हा केवळ एक विधी नाही. त्याला सांस्कृतिक महत्त्व आहे. विशेषता सिंदूर(कुंकु) आणि तांदूळापासून बनवलेला टिळक शुभ मानला जातो. आणि वाईटापासून बचाव करतो असे मानले जाते. हे तिच्या भावाच्या दीर्घ आणि समृद्ध आयुष्यासाठी बहिणीच्या मनःपूर्वक प्रार्थनांचे प्रतीक आहे.

आधुनिक उत्सव: 

जागतिकीकरणाच्या युगात भौगोलिक सीमा ओलांडून राहत असलेल्या भावंडांना उत्सव साजरा करण्याचे सर्जनशील मार्ग सापडतात. व्हिडिओ कॉल, भेटवस्तूंसाठी ऑनलाइन खरेदी आणि डिजिटल संदेश हे प्रेम व्यक्त करण्याचे आणि भाऊबीजचा आनंद वाटण्याचे सामान्य माध्यम बनले आहे.

दिवाळी भाऊबीज मराठी माहिती 2023:

भाऊबीज एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा समुदायापुरती मर्यादित नाही. त्यांने भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत.  विविध पार्श्वभूमीतील लोक या सणांमध्ये सहभागी होतात. ज्यामुळे ते जगभरातील व्यक्तींशी प्रेम आणि कौटुंबिक बंधांत बांधले जातात.भारतातील प्रादेशिक विविधता आणि संस्कृतीमुळे सणांची नावे थोडी बदलली असली तरी अर्थ आणि महत्त्व तेच आहे

हे पण वाचा - लक्ष्मी - कुबेर पूजन मराठी माहिती

निष्कर्ष: 

भाऊबीज हा भावंडांमधील चिरस्थायी बंधाचा पुरावा आहेआहे. हे एक असे नाते आहे जे मोठ्या उत्साहाने जपले जाते. आणि साजरे केले जाते. लाखो लोकांच्या हृदयात भाऊबीजसाठी विशिष्ट स्थान आहे. कारण  ते भाऊ आणि बहिणीच्या मजबूत बंधनाची पुष्टी करतो. जुने गैरसमज आणि मतभेद बाजूला ठेवण्याची आणि बहिण भावासाठी एकमेकांसाठी असलेले प्रेम आणि समर्थन याची पुष्टी करण्याची ही वेळ आहे.

       आरतीची थाळी सजवते
   कुंकू-अक्षतेचा टिळा तुझ्या माथी लावते
   तुझ्या उज्ज्वल दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते
कोणतेही संकट तुझ्यावर न येवो असे देवाकडे मागणे मागते
    भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !


लोक हे देखील विचारतात

1.भाऊबीज का साजरी केली जाते?
भाऊ आणि बहिणींमधील बंध साजरा करण्यासाठी तसेच भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे अतुट प्रेम दाखवण्यासाठी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भावाची पूजा म्हणजे यमराज्याच्या पाशातून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा या मागचा उद्देश असतो.

2.भाऊबीज मुहूर्त 2023 मध्ये कधी आहे? 
भाऊबीज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी आहे भाऊबीजेचा मुहूर्त लाभ चौघडीया(शुभ वेळ)सकाळी 6:43 मिनिटा पासून ते 8:04  मिनिटा पर्यंत पहिला शुभमुहूर्त असणार आहे. तर दुसरा मुहूर्त अमृत चौघडिया( शुभ वेळ) सकाळी 8:04 मिनिटांपासून 9:04 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तिसरा मुहूर्त अमृत चौघडिया  (शुभ वेळ) सकाळी 10:45 मिनिटांपासून ते 12:05 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

लक्ष्य द्या:

मित्रांनो वरील लेखात दिवाळी भाऊबीज मराठी माहिती 2023 याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे दिवाळी भाऊबीज मराठी माहिती 2023 बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

धन्यवाद 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.