धनत्रयोदशी मराठी माहिती 2023
धनत्रयोदशी ज्याला धनतेरस असेही म्हणतात. दिवाळीच्या काळात सणाच्या उत्साहाची सुरुवात होते. या शुभ दिवसाला हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे. जो संपत्ती आणि समृद्धीचा उत्सव साजरा करतो. धनत्रयोदशीच्या परंपरा, विधी आणि माहिती या लेखात आज आपण पाहणार आहोत.
धनतेरस:
धन तेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे. धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस. दिवाळी या दिवसापासून सुरू होते. धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी समुद्रमंथनातून बाहेर आला म्हणूनच या दिवशी धन्वंतरी ची पूजा देखील करतात. धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली असे वाक्य कानावर पडू लागते. या दिवशी घरोघरी आकाश कंदील लावले जातात. अंगणात दिवे लावले जातात. तसेच घरोघरी फराळ बनवण्याची लगबग चालू होते.
धनत्रयोदशी चे महत्व:
धनत्रयोदशीचा उगम विविध पौराणिक कथांमधून होतो. एक लोकप्रिय कथा म्हणजे राजा हिमाच्या मुलाची कहाणी ज्याचे जीवन त्याच्या पत्नीच्या चतुर धोरणामुळे अकाली मृत्यूपासून वाचले. ज्यामध्ये दिवे लावणे आणि मौल्यवान दागिन्यांनी दरवाजा बंद करणे समाविष्ट आहे.
हे पण वाचा- दिवाळी भाऊबीज मराठी माहिती 2023
धनत्रयोदशी पौराणिक कथा:
हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. कारण त्याला अकाली मृत्यूचा शाप मिळालेला असतो. यामुळे राजा व राणी खूप दुःखी असतात. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा राजपुत्राच्या मृत्यूचा असतो. त्या दिवशी त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार असेच सोन्या चांदीने भरून ठेवले जाते. सर्व महालात मोठ मोठे दिवे तसेच महालात सर्वत्र दिवे लावून लखलखीत प्रकाश केला जातो. त्याची पत्नी त्याला रात्रभर गाणी व गोष्टी ऐकवुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्प रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. त्याला पुढचे काही दिसत नाही. या कारणास्तव यम परत माघारी यमलोकात जातो. अशा प्रकारे ती राजकुमाराचे प्राण वाचवते. म्हणून या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात याने अकाली मृत्यू टळतो असा समज आहे.
दुसरी कथा:
धनत्रयोदशी बद्दल दुसरी कथा अशी आहे की महर्षी दुर्वास यांनी दिलेल्या श्रापातून मुक्त होण्यासाठी देव आणि दानव यांनी मिळून समुद्रमंथन केले. तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला. म्हणूनच धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
धनत्रयोदशी मुहूर्त 2023:
यंदा धनत्रयोदशी दिनांक 10 नोव्हेंबरला असून पूजेचा मुहूर्त सायंकाळी 05 वाजून 55 मिनिटांपासून ते सायंकाळी 08 वाजून 28 मिनिटांपर्यंत असणार आहे.
धनत्रयोदशीची पूजा कशा प्रकारे केले जाते:
या दिवशी सोने चांदी भांडी खरेदीला विशेष महत्त्व असते. तसेच या दिवशी लक्ष्मी म्हणून केरसुणी किंवा झाडूची पूजा केली जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वाढते असे मानले जाते. या दिवशी सायंकाळी दक्षिणेकडे वातीचे टोक करून दिवा लावला जातो. त्यानंतर त्याला नमस्कार केला जातो. त्यामुळे यमाची कृपा होते असे मानले जाते. तसेच या दिवशी आयुर्वेदाचे देव भगवान धन्वंतरी ची पूजा देखील केली जाते. चार हात असलेल्या भगवान धन्वंतरी च्या एका हातात अमृत कलश दुसऱ्या हातात जळू तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात आयुर्वेद घेऊन भगवान धन्वंतरी जन्माला आला असे मानले जाते. धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य लाभते.
वैद्य लोक या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात व प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या पानाचे बारीक तुकडे व साखर लोकांना खायला देतात. यामागे असे कारण आहे की कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे असे मानतात. दररोज कडुलिंबाची पाच-सहा पाने खाल्ल्याने सर्व प्रकारच्या व्याधी माणसापासून दूर राहतात. म्हणून तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. याबरोबर देवी लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा करतात यामुळे आपल्या घरी सुख, समृद्धी ऐश्वर्य नांदते.
धन्वंतरी कोण आहे?
धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक, देवांचा वैद्य आणि हिंदू औषधांचा देव म्हणून ओळखले जातात. ते श्रीविष्णु चे अवतार आहेत. तसेच ते समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन बाहेर पडले. आणि त्यांनी देवतांना अमृत देऊन अमर केले.
विधी आणि परंपरा:
धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सूर्योदयापूर्वी उठतात. आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळविण्यासाठी मृत्यूची देवता भगवान यम यांना समर्पित विधी करतात. या दिवशी घरे स्वच्छ करून सजवली जातात. जे संपत्ती आणि सौभाग्य यांचे स्वागत करते. या दिवशी सोने, चांदी किंवा भांडी खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी येते असे मानले जाते.
पूजा विधि :
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर लोक विशेष पूजा करतात. पूजेमध्ये आरोग्य आणि कल्याणासाठी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना प्रार्थना केली जाते. याव्यतिरिक्त देवी लक्ष्मीचे आवाहन करणे. जी संपत्तीची देवी आहे. आणि या उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे. दिवे लावणे आणि स्तोत्रांचे पठण पवित्र वातावरणात योगदान देतात. आध्यात्मिक संबंधाची भावना निर्माण करतात.
हे पण वाचा- बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा मराठी माहिती
FAQs
1.धनत्रयोदशी मुहूर्त 2023 कधी आहे?
यंदा धनत्रयोदशी दिनांक 10 नोव्हेंबरला असून पूजेचा मुहूर्त सायंकाळी 05 वाजून 55 मिनिटांपासून ते सायंकाळी 08 वाजून 28 मिनिटांपर्यंत असणार आहे.
2.धन्वंतरी कोण आहे?
धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक, देवांचा वैद्य आणि हिंदू औषधांचा देव म्हणून ओळखले जातात. ते श्रीविष्णु चे अवतार आहेत. तसेच ते समुद्रा मंथनातून अमृत कलश घेऊन बाहेर पडले. आणि त्यांनी देवतांना अमृत देऊन अमर केले.
3.धनत्रयोदशीला आपण काय करतो?
या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन भांडी खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी येते असे मानले जाते.
लक्ष्य द्या:
मित्रांनो वरील लेखात धनत्रयोदशी मराठी माहिती 2023 याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे धनत्रयोदशी मराठी माहिती 2023 बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
धन्यवाद