बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा मराठी माहिती


शीर्षक: 

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा मराठी माहिती. 

परिचय:

दिवाळी हा दिव्यांचा सण आणि एक भव्य उत्सव आहे. ज्याचे जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे.  दिवाळी दरम्यान पाळल्या जाणार्‍या विविध प्रथा आणि विधींमध्ये बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा ही एक अद्वितीय आणि महत्त्वपूर्ण परंपरा आहे. दिवाळीचा तिसरा दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदा हिंदू धर्मीयांचा एक मोठा सण या दिवसाला दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा असेही म्हणतात. या दिवशी विष्णुनी वामन अवतारी बटूचे रूप घेऊन दानशूर राजा बळीला पातळात गाडले.  हा लेख बलिप्रतिपदेच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पैलूंचा शोध घेतो आणि दिवाळीच्या सणांच्या या कमी ज्ञात पण अविभाज्य भागाच्या सारावर प्रकाश टाकतो.

बलिप्रतिपदा पाडव्याचे महत्त्व:

बलिप्रतिपदा पाडवा हा एक हिंदू सण आहे. जो वाईटावर चांगल्याचा विजय आणि अन्यायावर सत्याचा विजय साजरा करतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असतो. या दिवशी गोवर्धन पूजा देखील करतात. या दिवशी अभंग स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. या दिवशी सोने खरेदी, सुवासणीकडुन पतीस औक्षण, व्यापारांच्या वर्षाचा प्रारंभ केला जातो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेट वस्तू देतो. नवविवाहित दापंत्यासाठी पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. याला दिवाळसन म्हणतात. यानिमित्ताने जावयास सासरच्याकडून निमंत्रण दिले जाते. नंतर स्वादिष्ट जेवण बनवून जावयास खाऊ घातले जाते. आणि नंतर त्यास आहेर दिला जातो. तत्पूर्वी पत्नी आपल्या पतीला तेल आणि उटणे लावून मालिश करते आणि स्नान घालते. आणि स्नान झाल्यावर पतीचे औक्षण करते. 

हा सण राजा बळीच्या कथेचे स्मरण करतो. एक परोपकारी शासक ज्याला देव विष्णूनी पाताळात गाडले होते. तथापि विष्णू बळीची नम्रता आणि भक्ती पाहून प्रभावित होतात आणि ते त्याला वरदान देतात की दरवर्षी बलिप्रतिपदा पाडव्याला पृथ्वीवर तुझी पूजा केली जाईल तसेच तुझे स्मरण केले जाईल. 

हे पण वाचा- लक्ष्मी - कुबेर पुजन मराठी माहिती    

दिवाळी पाडव्याचा मुहूर्त:

दिवाळी पाडव्याचा मुहूर्त दिनांक 14 नोव्हेंबर सकाळी 6 वाजून 14 मिनिटां पासून ते सायंकाळी 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

बलिप्रतिपदा पाडव्याच्या पौराणिक कथा:

पार्वतीने महादेवाना या दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हणतात. या दिवशी खेळ खेळले जातात. प्राचीन काळी बळी नावाचा फार बलाढ्य राजा होता. त्याचे तिन्ही लोकावर राज्य होते. त्याने लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेत टाकले होते. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजादक्ष आणि दानशूर होता. राजा बळी हा राजा विरोचन पुत्र तसेच तो भक्त प्रल्हाद यांचा नातू देखील होता. राजा बळी याच्या दारी कोणीही आला तर राजा बळी त्याला रिकाम्या हाती पाठवत नसे. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती आणि आपल्या शक्तीच्या सामर्थ्यावर त्यांनी देवांचा पराभव केला होता. या गोष्टींचा त्याला फार गर्व झाला होता. त्याचे गर्व हरण करण्यासाठी भगवान विष्णू यांची निवड करण्यात आली होती. 

एकदा बळीराजांनी यज्ञ करण्याचे ठरवले. यज्ञ केल्यानंतर दान करण्याची पद्धत होती. भगवान विष्णू वामन अवतारात बटू वेशात त्यांच्या दारी जाऊन उभे राहतात. त्यावर बळीराजा त्यांना विचारतो आपणास काय हवे आहे? त्यावर वामन अवतारातील बटू त्यांना म्हणतात तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे. मला तीन पावले जमीन पाहिजे आहे. राजा बळीला असे वाटते की हे तर वामन आहेत यांच्या तीन पावले जमिनीमध्ये काय येणार? तेवढ्यात वामन अवतारी विष्णूंनी आपले रूप विराट करून एका पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात स्वर्ग आणि तिसरा पाय ठेवण्यासाठी जागाच नसते कारण वामन अवतारी बटूंच्या दोन पायातच राजा बळी सर्व काही गमावून बसलेला असतो. त्यावेळी वामन अवतारी विष्णू राजा बळी याला विचारतात आता तिसरा पाय कुठे ठेवू त्यावर बळी थोडा विचार करून सांगतो की हे ब्राह्मण कुमारा आपण आपला पाय माझ्या डोक्यावर ठेवा. असे म्हणताच वामन आपले पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवतात तसा बळी पाताळात जातो. 

राजा बळी जरी गविऀष्ट झाला असला तरी तो सत्वशील, प्रजादक्ष आणि दानशूर असल्यामुळे श्रीविष्णू त्यांना पातळाचे राज्य देतात. आणि वर मागण्यास सांगतात त्यावर राजा बळी म्हणतो पृथ्वीवर माझे राज्य संपनार आहे. माझी अशी इच्छा आहे की पृथ्वीवर दरवर्षी एक दिवस तरी माझे राज्य यावे.तेव्हा श्री विष्णूनी कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या क्षमक्षशीलतेची, दानशुलतेची पूजा करतील असा वर दिला. त्याबरोबरच यमासाठी दिपदान करणाऱ्यांना कधी यमाचा त्रास होऊ नये. त्याच्याकडे लक्ष्मीचा नेहमी वास असावा असाही भगवान विष्णूनी त्याला वर दिला. हा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा यालाच बलिप्रतिपदा किंवा बळीराजा प्रतिपदा असेही म्हणतात. त्या दिवसापासून बळी प्रतिपदा करण्याची प्रथा सुरू झाली. राजा बळी हा दानशूर, जनतेची काळजी घेणारा राजा होता. त्यामुळे राजा बळीच्या राज्यातील सर्व प्रजा ही खूप सुखी होती. त्यामुळे आत्ताच्या काळात लोक अशी प्रार्थना करतात की इडा पिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे. या प्रसंगामुळे माता लक्ष्मीला आपल्या पतीचे खूप कौतुक वाटले. त्यामुळे तिने आपले पति विष्णूचे औक्षण केले त्याबद्दल श्रीविष्णूंनी अलंकार, हिरे, माणिक, मोती, ओवळणी म्हणून घातले. यामुळे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते त्याबद्दल पती तिला भेटवस्तू देतो. 

विक्रम संवंत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य यांनी शकाचे आक्रमण परतवून लावले. त्याचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्यने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. 

बलिप्रतिपदा पाडवा हा हिंदूंसाठी महत्त्वाचा सण आहे.

शेतकऱ्यांचा राजा बळी: 

बळीराजाने शेतीचे महत्व ओळखले होते. राजा बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता. बळीराजा तेथील जनतेला शेतीविषयक उपक्रमासाठी प्रोत्साहन देत असे. त्यामुळे  तेथे धनधान्य भरपूर प्रमाणात होत असे. सुख, समृद्धी येण्यासाठी धन किती महत्त्वाचे आहे आणि हे मिळवण्यासाठी धान्य किती महत्त्वाचे आहे हे राजा बळीला माहिती होते. त्यामुळे तेथील प्रजा सुखी झाली. बळीराजाचे शेती वरील प्रेम, शेतीसाठी काहीतरी करण्याची इच्छा, शेतीसाठी समर्पण प्रचंड होते. त्यामुळे आताच्या युगात अशी प्रार्थना केली जाते की इडा पिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे. 

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा मराठी माहिती:

बलिप्रतिपदा ज्याला बली पद्यामी किंवा पाडवा असेही म्हणतात. त्याचे मूळ प्राचीन हिंदू पौराणिक कथांमध्ये आहे.  पौराणिक कथेनुसार राजा बळी एक सद्गुणी आणि उदार शासक होता. भगवान विष्णूने वर्षातून एकदा त्याच्या राज्याला भेट देण्याचे वरदान दिले होते.  बलिप्रतिपदा हा दिवस चिन्हांकित करतो जेव्हा राजा बळी पृथ्वीवर परत येतो.हे वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे.

विधी आणि परंपरा:

दिवसाची सुरुवात लोक सूर्योदयापूर्वी उठून शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक असलेले विधीवत तेल स्नान करून होते. कुटुंबे एकत्र येऊन प्रार्थना करतात आणि भगवान विष्णू आणि राजा बळी याची पूजा करतात. समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागतात.

बलिप्रतिपदेच्या रीतिरिवाजांपैकी एक म्हणजे राजा बळीचे घरांमध्ये स्वागत करणे. राजा बळीच्या आगमनासाठी लोक त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर रंग बेरंगी रांगोळी काढतात. त्यांना पारंपारिक पदार्थ आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण केला जातो. जे या शुभ दिवसाशी संबंधित आनंदोत्सव प्रतिबिंबित करतात. 

भारतातील उत्सव:

दिवाळी भारतातील विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या रीतिरिवाजांसह साजरी केली जात असताना महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये बलिप्रतिपदेला विशेष स्थान आहे.  महाराष्ट्रात या दिवशी पतींनी आपल्या पत्नीला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. ज्यामुळे प्रेम आणि सहवासाचे बंध दृढ होतात.

कर्नाटकमध्ये हा दिवस बाली पद्यामी म्हणून साजरा केला जातो. गोव्यात हा उत्सव पारंपारिक लोकनृत्य आणि मिरवणुकांनी साजरा केला जातो.ज्यामुळे उत्सवांना एक अनोखा सांस्कृतिक स्वाद येतो.

हे पण वाचा- नरक चतुर्दशी मराठी माहिती 2023

निष्कर्ष:

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा हा पौराणिक कथा, परंपरा आणि उत्सव यांचा सुंदर संगम आहे. राजा बळीच्या परतीचा सन्मान करण्यासाठी कुटुंबे एकत्र येत असतात. आणि त्यांचे व भगवान विष्णूचे आशिर्वाद घेतात.तसेच पती पत्नी च्या नात्यामधील गोडवा कायम राहण्यासाठी आणि दोघांच्या नात्यांचा सन्मान राखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 

       स्नेहाचा सुगंध दरवळला

        आनंदाचा सण आला

     विनंती आमची परमेश्वराला

    सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला

 दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

लोक हे देखील विचारतात

दिवाळी पाडवा का साजरा केला जातो?

दिवाळी पाडवा हा राजा बळीच्या स्मरणार्थ तसेच पती पत्नी च्या नात्यामधील गोडवा कायम राहण्यासाठी साजरा केला जातो. 

दिवाळी पाडव्याचा मुहूर्त 2023 कधी आहे? 

दिवाळी पाडव्याचा मुहूर्त दिनांक 14 नोव्हेंबर सकाळी 6 वाजून 14 मिनिटां पासून ते सायंकाळी 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

लक्ष्य द्या:

मित्रांनो वरील लेखात बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा मराठी माहिती याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा मराठी माहिती बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

धन्यवाद 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.