दसरा: विजय आणि आनंदाचा सण:
दसरा ज्याला विजयादशमी किंवा दसरा असेही म्हणतात. हा सर्वात महत्वाचा हिंदू सण आहे. जो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी विजयादशमी दसरा साजरा केला जातो. हा सण नवरात्रीची समाप्ती दर्शवितो. नऊ दिवसांची उपासना आणि दुर्गा देवीच्या विविध रूपांचा उत्सव झाल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो.चला तर मित्रांनो आज आपण विजयादशमी दसरा 2023 ची मराठी माहिती या लेखात पाहूया.
दसरा हा सण अत्यंत लोकप्रिय आहे. दसऱ्याा विषयी बोलताना दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असेही म्हटले जाते. कारण यामागे विजयाचा फार मोठा इतिहास आहे.
हे पण वाचा- नवरात्री उत्सव 2023 मराठी माहिती
दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. अश्विन शुद्ध दशमीला दसरा म्हणजेच विजयादशमी साजरा केला जातो. त्याला दशहरा असे सुद्धा म्हटले जाते. नवरात्र झाल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी दसरा साजरा केला जातो. या दिवशी दुर्गादेवीने महिषासुर राक्षसाचा वध केला होता. तसेच प्रभू राम यांनी याच दिवशी रावणाचा वध केला होता. पांडव याच दिवशी अज्ञातवासातून घरी परतले होते. त्यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.
दसऱ्याच्या दिवशी सोने लुटले जाते. आणि हे सोने लुटण्यासाठी लोक गावाची वेश ओलांडून जातात आणि सोने लुटतात. दसऱ्याच्या दिवशी घराला आंब्याच्या आणि झेंडूच्या फुलांची तोरणे लावली जातात. वाहने, यंत्रे यांची पूजा करून यांना झेंडूच्या फुलाची माळ घातली जाते. वाहने सजवली जातात. बैल व बैलगाड्या सजवल्या जातात. घरोघरी देवांची पूजा अर्चना करून शस्त्रांची पूजा केली जाते. या दिवशी विविध पदार्थ बनवले जातात. जसे की पुरणपोळी कडकणी इ.
संध्याकाळी आपट्याची पाने तोडून सोन्याच्या रुपात ती मित्र, नातेवाईक, वडीलधाऱ्या माणसांना दिली जातात. सोना घ्या सोन्यासारखे रहा अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात ही एक जुनी प्रथा आहे पण आता या प्रथेला मोबाईल कॉल्स व इंटरनेट मेसेज चे स्वरूप आले आहे. थोर मंडळी कडून लहान मंडळींना आशीर्वाद दिले जातात याच दिवशी संध्याकाळी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. या सणाला दशहरा सुद्धा म्हटले जाते. या दिवशी सिमाउल्लंघन, शमीच्या झाडाचे व शस्त्रांचे पूजन केले जाते.
दसऱ्याचे महत्व:
विजयादशमी दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तातील एक दिवस या दिवशी कोणतेही नवीन शुभ कार्य केले जाते. या दिवशी वाहन खरेदी, घर खरेदी, सोने खरेदी, कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते. म्हणतात की अनेक पराक्रमी राजे दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास याच दिवशी जात असे यालाच सीमा उल्लंघन असे म्हणतात. विजयादशमी हा विजय मिळवून देणारा दिवस असे मानले जाते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी देवीच्या उत्सवाला प्रतापगडावर दसऱ्याच्या दिवशी सुरुवात केली होती.
आपट्याच्या झाडाचे औषधी गुणधर्म:
या वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म आहेत हे औषधी गुणधर्म पित्त आणि कफ या दोषावर गुणकारी आहे
2023 मध्ये दसरा कधी आहे?
दसरा 2023 मध्ये 24 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. आणि या दिवशी मंगळवार आहे
दसरा सणाविषयी पौराणिक कथा:
दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवास संपवुन घरी परतले. पांडवांनी आज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण अर्जुनाने विराटच्या गाई सोडून आणण्यासाठी वापरले. यानंतर परत ती शस्त्रे शमीच्या झाडावर आणून ठेवली. त्यानंतर आज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी शमीच्या झाडाची पूजा करून ती शस्त्रे परत मिळवली अशी आख्यायिका आहे. त्यामुळे विजयादशमीला शमीच्या झाडाची पूजा केली जाते.
दुसरी कथा अशी आहे की वरंतंतू नावाची एक ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासाठी बरेच शिष्य येत असत. त्यावेळी मानधनाची पद्धत नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत असत. या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुरुंना विचारले की तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय घेणार? परंतु ऋषी गुरुदक्षिणा घेण्यास नकार देतात. ते म्हणतात तू केलेल्या सेवेमुळे मी संतुष्ट आहे. त्यामुळे मला गुरुदक्षिणेची काही गरज नाही. परंतु तरीसुद्धा कौत्स ऐकत नाही आणि तो त्यांना गुरुदक्षिणा द्यायचे ठरवतो. मग ऋषी कौत्साची परीक्षा घेण्याचे ठरवतात.
ऋषींनी कौत्साला चौदा विद्याचे ज्ञान दिले असल्यामुळे ऋषी त्याला सांगतात की एका विद्येसाठी एक कोटी सुवर्णमुद्रा म्हणजेच 14 विद्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणायला सांगतात. तेव्हा कौत्स रघु राजाकडे( दानशूर आणि पराक्रमी राजा) जातो. परंतु राजाने यज्ञामध्ये ब्राह्मणांना आणि गरिबांना आपली सर्व संपत्ती दान केलेली असते. त्यामुळे खजिना संपलेला असतो. तो कौत्सा कडे तीन दिवसाची मुदत मागतो. आणि तो कुबेरावर स्वारी करण्याचे निश्चित करतो.कुबेराला माहित होते की रघु राजा विरुद्ध आपला टिकाव लागणार नाही. तेव्हा कुबेर स्वारीच्या आदल्या रात्रीच रघु राजाच्या राजवाड्यात आपट्याच्या पानांच्या आकाराची नाणी पावसासारखी पाडतो.
कौत्स 14 लाख सुवर्णमुद्रा घेऊन ऋषींकडे जातो. परंतु ते त्या घेण्यास नकार देतात. त्यामुळे कौत्स त्या सुवर्णमुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगतो. लोकं त्या वृक्षाची पूजा करतात आणि पाहिजे तेवढ्या मुद्रा घरी घेऊन जातात. त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्या ऐवजी आपट्याची पाने( ज्याला सोने म्हणतात) लुटण्याची प्रथा सुरू झाली अशी आख्यायिका आहे.
भारताच्या इतर भागात दसरा सण:
भारत आणि नेपाळच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दसऱ्याला वेगवेगळ्या आख्यायिका आणि परंपरा आहेत. उत्तर भारतात हे राक्षस राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे स्मरण करते. ज्याने त्याची पत्नी सीतेचे अपहरण केले होते. या दिवशी लोक रावण, त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि त्याचा मुलगा मेघनाद यांचे पुतळे जाळतात जे वाईट शक्तींच्या नाशाचे प्रतीक आहे. लोक महाकाव्य रामायण देखील राम लीलाच्या रूपात साकारतात. एक नाट्यप्रदर्शन जे भगवान रामाचे जीवन आणि कृत्ये दर्शवते.
दक्षिण भारतात दसरा हा दिवस म्हणून साजरा केला जातो जेव्हा देवी दुर्गा किंवा चामुंडेश्वरीने म्हैस-राक्षस महिषासुराचा वध केला होता. ज्याने देव आणि मानवा मध्ये दहशत निर्माण केली होती. या दिवशी लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरत असलेली शस्त्रे आणि साधनांची पूजा करतात. जसे की पुस्तके, वाहने, यंत्रे, हत्यारे इत्यादी. या विधीला आयुधा पूजा किंवा अस्त्र पूजा म्हणून ओळखले जाते. म्हणजे शस्त्रांची पूजा. लोक त्यांच्या घरात देव, देवी आणि प्राण्यांच्या बाहुल्या आणि मूर्ती देखील प्रदर्शित करतात. ज्याला गोलू किंवा कोलू म्हणतात.
उत्तर भारतात दसऱ्याचे दहा दिवस रामलीला सुरू असते. आणि याच दिवशी रामलीलांचा शेवट केला जातो.
दसऱ्याची कविता:
सायंकाळी सोनी लूटनी मोरू परतुनी आला||
बहिण काशी ओवाळी मग त्याला||
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा||
अशाप्रकारे एकमेकांना शुभेच्छा देऊन व एकमेकांना भेटून हा दसऱ्याचा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
हे पण वाचा- भारतीय संस्कृती विरुद्ध पाश्चात्त्य संस्कृती
विजयादशमी दसऱ्याच्या शुभेच्छा:
आंब्याची तोरणे लावूनी दारी|
येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा|
विजयादशमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा|
|सोनं घ्या सोन्यासारखे रहा|
हे पण वाचा- प्लासी आणि बक्सर ची लढाई आणि त्याचे प्रभाव
हे पण वाचा- भारतीय नौदलाचा इतिहास
हे पण वाचा- 15 ऑगस्ट 2023 ची माहिती
हे पण वाचा- जुलियस रॉबर्ट ओपन हायमर- अणुबॉम्बचे जनक
हे पण वाचा- राजश्री छत्रपती शाहू महाराज
लक्ष्य द्या:
मित्रांनो वरील लेखात आपण विजयादशमी दसरा याबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे दसरा सणाविषयी अजून काही माहिती असेल तर कमेंट करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
धन्यवाद