नवरात्री उत्सव 2023 मराठी माहिती

नवरात्री उत्सव 2023 :



नवरात्री एक चैतन्यशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध उत्सव आहे.नवरात्रीचे भारत आणि जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. हा नऊ रात्रीचा उत्सव दैवी स्त्री शक्तीचा उत्सव आहे. आणि हिंदू पौराणिक कथा आणि परंपरेत खोलवर रुजलेला आहे. या लेखात आम्ही नवरात्रीचे महत्त्व, विधी याचा सखोल अभ्यास करू.

नवरात्रीचे महत्त्व:

नवरात्री हा संस्कृत दोन शब्दांचा संयोग आहे: "नव" म्हणजे नऊ आणि "रात्री" म्हणजे रात्री.  हा उत्सव देवी दुर्गाला समर्पित आहे. जी तिच्या शक्ती आणि सामर्थ्यासाठी पूज्य आहे.  हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या नऊ रात्री तीन भागात विभागल्या गेल्या आहेत. आणि हे भाग प्रत्येक देवीच्या वेगळ्या रूपाला समर्पित आहे: दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती. या देवता अनुक्रमे धैर्य, संपत्ती आणि ज्ञान या दैवी पैलूंचे प्रतिनिधित्व करतात.

हे पण वाचा - भारतीय संस्कृती विरुद्ध पाश्चात्त्य संस्कृती

अश्विन महिन्यात घरांमध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून देवीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच  घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय. नवरात्रीचे पहिले तीन दिवस दुर्गा किंवा कालीला पुढचे तीन दिवस लक्ष्मीला आणि उरलेले तीन दिवस सरस्वतीला समर्पित केले जातात. या दरम्यान महाराष्ट्रातील शक्तिपीठांना विशेष महत्त्व प्राप्त होते.या काळात देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात येथे येतात. नवरात्री नऊ रात्री व दहा दिवसाची असते. 

हिंदू धर्मानुसार नवरात्र वर्षातून दोनदा साजरी केली जाते. पहिली नवरात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात साजरी केली जाते. तर दुसरी ऑक्टोबर मध्ये साजरी केली जाते. नवरात्र हि शारदीय नवरात्र या नावाने देखील ओळखली जाते. नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदु सण आहे. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. घरात घट बसवला जातो. आपण जी घटस्थापना करतो त्याचा थेट संबंध शेतकऱ्यांशी होतो. घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय. नवरात्रीच्या दिवशी शेतकरी शेतातील माती आणतो आणि ती एका भांड्यामध्ये भरतो या मातीमध्ये नऊ धान्य पेरतात. त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवला जातो. या घटावरती आंब्याची पाने ठेवून नारळ ठेवला जातो. या दिवसात शेतातील पिके तयार झालेली असतात तर काहीच्या शेतातील पिकांची कापणी होऊन पीक घरात आलेले असते. नवरात्रीच्या नऊ दिवसात हे धान्य घटासमोर उगवते. काही ठिकाणी नवरात्रीच्या दहाव्या दिवशी रावणाचा प्रतिकात्मक पुतळा बनवून तो पेटवला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्यात येतो. 

नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. आणि तिची उपासना केली जाते. त्यानंतर नऊ दिवसांनी अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो. विजयादशमी दसरा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. या दिवसाच्या शुभमुहूर्तावर नवीन कामे केली जातात. या दिवशी आपट्याची पाने आणून ही पाने मित्रांना, नातेवाईकांना, मोठ्या माणसांना दिली जातात. आणि सोनं घ्या सोन्यासारखं राहा अशा शब्दात एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तसेच नवरात्रीच्या नवव्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा देखील केली जाते. ज्याला खंडे महानवमी असेही म्हणतात. 

नवरात्री 2023 तिथी आणि मुहूर्त:

रविवार 15 ऑक्टोंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. प्रतिपदा तिथी सुरू होते 14 ऑक्टोंबर 2023 शनिवारी रात्री 11:24 वाजता आणि 15 ऑक्टोंबर रविवारी दुपारी बारा वाजून 32 मिनिटांनी समाप्त होते. तर कलश स्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी 11: 44 ते दुपारी 12:30 पर्यंत आहे. त्यानंतर

24 ऑक्टोंबर 2023 विजयादशमी दसरा आहे. 

नवरात्रीच्या पौराणिक कथा:

नवरात्रीच्या दोन पौराणिक कथा आहे पहिल्या कथेप्रमाणे महिषासुर नावाच्या दैत्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून एक वरदान मागून घेतले ते असे की पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव, देव, दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुर माजला त्यांनी तिन्ही लोकांवर हाहाकार माजवायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी दुर्गा देवीकडे साकडे घातले. नऊ दिवस दुर्गादेवीने महिषासुरंशी लढून दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासुर मर्दिनी असे म्हटले जाते. 

दुसरी पौराणिक कथा श्री रामाने रावणावर विजय मिळवता यावा त्यासाठी दुर्गादेवीची आराधना केली नऊ दिवस देवीची पूजा आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले त्यानंतर देवीने रामाला आशीर्वाद दिला. दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि लंकेवर विजय मिळवला यामुळेच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. 

नवरात्र उत्सवातील देवीचे नऊ रूपे:

1.शैलपुत्री

नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्रीला समर्पित आहे. ज्याचा अर्थ पर्वताची कन्या आहे ती दुर्गा देवीचे पहिले रूप आहे. 

2.देवी ब्रह्मचारीनी

दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारीनी अवताराचे पूजन केले जाते यामध्ये देवीने शिव शंकराचे ध्यान केले होते.ही तपश्चर्या बघून ब्रह्मदेवाने देवीवर प्रसन्न होऊन त्यांना ब्रह्मचारिणी हे नाव दिले होते.

3.देवी चंद्रघंटा

तिसऱ्या दिवशी देवीचे चंद्रघंटा अवताराचे पूजन केले जाते. यामध्ये देवीच्या कपाळावर चंद्रकोर आहे. 

4.देवी कुष्मांडा

चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा अवतराला पुजले जाते. जिच्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली होती. 

5.देवी स्कंदमाता

पाचव्या दिवशी देवीच्या स्कंद माता या अवताराला पुजले जाते. 

6.देवी कात्यायनी

देवीचे हे रूप दृष्टांचा नाश करणारे असून या देवीचे वाहन सिंह आहे. सहाव्या दिवशी या देवीचे पूजन केले जाते. 

7.देवी काल रात्री 

देवीच्या या रूपात देवीच्या शरीराचा रंग काळा आहे. देवीच्या या रूपाची सातव्या दिवशी पूजा केली जाते. 

8.देवी महागौरी

देवीचे हे रूप आठव्या दिवशी पुजले जाते. ही देवी पांढऱ्या बैलावर बसलेली आहे. 

9.देवी सिद्धीदात्री

देवीचे हे रूप नवव्या दिवशी पुजले जाते

हे पण वाचा -  विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2023 माहिती

नवरात्रीचे नऊ रंग 2023:

  1. रविवार - केशरी/ भगवा
  2. सोमवार - पांढरा
  3. मंगळवार - लाल
  4. बुधवार - निळा
  5. गुरुवार - पिवळा
  6. शुक्रवार - हिरवा
  7. शनिवार - करडा
  8. रविवार - जांभळा
  9. सोमवार - मोरपंखी

विधी : 

नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  हा सण चिन्हांकित करण्याचा पारंपारिक मार्ग म्हणजे उपवास, प्रार्थना आणि नृत्य.  नवरात्री दरम्यान पाळले जाणारे काही सामान्य विधी येथे आहेत:

उपवास: 

अनेक भक्त या नऊ दिवसांत उपवास करतात. हे शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते.

गरबा आणि दांडिया: 

गरबा आणि दांडिया नृत्यांच्या तालबद्ध तालांनी संध्याकाळ जिवंत होते. लोक रंगीबेरंगी पोशाख परिधान करून मंडळांमध्ये नृत्य करतात. त्यांची भक्ती आणि आनंद व्यक्त करतात.  ही नृत्ये नवरात्रोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

देवीची पूजा: 

भक्त दुर्गा देवीच्या मंदिरांना भेट देतात. सकाळी व संध्याकाळी मनोभावे देवीची पूजा केली जाते.देवीची आरती म्हटली जाते. मंदिरे आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने सजवलेली असतात.

देवीची नऊ रूपे: 

नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या नऊ रूपांपैकी एकाची पूजा केली जाते. हे रूप विशिष्ट रंगांनी सुशोभित केले जाते.

या नऊ दिवसांमध्ये लोक त्यांच्या सांसारिक दिनचर्या सोबत देवीची उपासना करतात. आणि त्यांच्या सभोवतालची दैवी ऊर्जा स्वीकारतात. नवरात्रीच्या आनंदात सर्व स्तरातील व्यक्ती एकत्र येतात.

प्रादेशिक भिन्नता:

नवरात्रीच्या उल्लेखनीय पैलूंपैकी एक म्हणजे ती संपूर्ण भारतभर प्रादेशिक भिन्नतेसह साजरी केली जाते. गुजरात राज्यात गरबा नृत्य आघाडीवर आहे. जिथे लोक पारंपारिक पोशाख धारण करतात. आणि एकाग्र वर्तुळात आकर्षकपणे नृत्य करतात. पश्चिम बंगालमध्ये नवरात्री दुर्गा पूजेशी संलग्न आहे. हा एक उत्कंठापूर्ण उत्सव आहे ज्यामध्ये दुर्गा देवीच्या विशिष्‍टपणे तयार केलेल्या मूर्तींची भव्य स्थापना केली जाते. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील राज्यात याला गोलू म्हणून ओळखले जाते. जेथे भारतीय संस्कृतीची विविधता दर्शविणारी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती आणि बाहुल्या घरांमध्ये प्रदर्शित केल्या जातात.

शेवटी नवरात्र हा एक धार्मिक सण आहे. हा संस्कृतीचा आणि दैवी स्त्री शक्तीचा उत्सव आहे. भक्ती आणि नृत्याच्या नऊ रात्री लोकांना जवळ आणतात. त्यांना चांगल्या आणि वाईट या गोष्टीची जाणीव करून देतात. 

देवीचा मंत्र - 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.