गणेश चतुर्थी : 2023 ची माहिती:
गणेश चतुर्थी हा सण भारतभर साजरा केला जातो. तसेच तो विदेशात ही साजरा केला जातो. श्रावण महिना लागला की सणांना सुरुवात होते. नागपंचमी गोकुळाष्टमी नंतर महाराष्ट्रात वेध लागतात ते म्हणजे गणेश चतुर्थीचे. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचे आगमन होते. सर्वांकडून गणेश चतुर्थीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आणि हा सन धूमधडाक्यात साजरा केला जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चा जयघोष सगळीकडे ऐकायला मिळतो. चला तर या लेखात आपण गणेश चतुर्थीची माहिती पाहूया.
गणेश चतुर्थीचे महत्व:
भगवान गणेशाची पूजा अडथळे दूर करणारा, बुद्धी आणि समृद्धी देणारा आणि कलेची देवता म्हणून केली जाते. त्याला प्रथम देव म्हणूनही ओळखले जाते. गणेश चतुर्थी हा आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी गणेशाचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे.
गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे. गणेश चतुर्थी या दिवसाला महा सिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. गणेश चतुर्थीला पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यानंतर गणपतीची पूजा केली जाते व आरती म्हटली जाते. नंतर गणपतीला मोदकांचा नैवेद अर्पण केला जातो. गणपतीला जास्वंदीचे फुल, दुर्वा, आघाडा या प्रिय गोष्टी आवडीच्या असल्यामुळे गणपतीला त्या अर्पण केल्या जातात. गणपती हा सर्व गणांचा अधिपती आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकांना संघटित करून, लोकांच्या मध्ये एकता निर्माण करून विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली.भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीन हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. ऋग्वेदात गणपतीची दुसरी नावे होती ती म्हणजे बृहस्पती व वाचस्पती. गणपती देवाची अस्त्रे अंकुश व कुऱ्हाड ही आहेत. गणपतीचे वर्णन करायचे झाले तर चार हात, दोन हत्तीचे मोठे कान, वळणदार सोंड, गोलाकार पोट आणि शेला पितांबर हे रूप मनात येते. त्यांच्या चारी हातात चार वस्तू आहेत. त्यांच्या एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक आणि चौथा हात आशीर्वाद या मुद्रेत असतो. कोणत्याही कामाची सुरुवात या देवाच्या आशीर्वादाने होते.
हे पण वाचा - प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती
गणेश चतुर्थीची प्रचलित आख्यायिका आहे की एकदा गणपती मोदक खाऊन व मोदकांची शिधा बांधून घेऊन उंदराच्या पाठीवरून जात होते. या दिवशी गणरायाने इतके मोदक खाल्ले होते की त्यांचे पोट टम्म फुगले होते. त्यामुळे गजानन यांचा तोल जात असतो. यावेळी गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडतो. व त्याचे कपडे फाटून मोदक खाली पडतात. नंतर गणराया स्वतः उभे राहून सर्व मोदक गोळा करतात. हे पाहून चंद्र हसू लागतो. व तो गणपतीच्या रूपाची टिंगल ही करतो. चंद्र माझ्याकडे बघून हसतच आहे येऊन मदत करत नाही. त्यामुळे गणपती रागावतात व ते चंद्राला शाप देतात की हे चंद्रा तू माझ्यावर हसलास तुला वाटते की तू खूप देखना आहेस. मी तुला शाप देतो की यापुढे तू आकाशातून नाहीसा होशील आणि पुन्हा कधी दिसणार नाहीस. हे पाहून चंद्र हसायचा थांबतो आणि तो गणरायाची माफी मागतो. त्यामुळे गणपती चंद्राला सांगतात कि मी माझा शाप परत घेऊ शकत नाही. परंतु तुला एक उपशाप देतो की तू पूर्णत नाहीस होणार नाहीस पण तुझा आकार हळूहळू कमी होईल. जेव्हा तू नाहीसा होशील त्या दिवशी अमावस्या असेल आणि अमावास्या नंतरच्या दिवसात तुझा आकार वाढत जाईल ती पौर्णिमा असेल. शेवटी पंधराव्या दिवशी तुझा आकार पूर्णपणे असेल गणरायांनी थोडा वेळ विचार करून चंद्राला सांगितले चतुर्थीला तू माझ्यावर हसलास या चतुर्थीस कोणी तुझे दर्शन करणार नाही. आणि असे केले तर त्याच्यावर काहीतरी संकट येईल.
भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र गणपती आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे हिंदू धर्मात भगवान श्री गणेश यांना प्रथम पूजेचा मान आहे
गणेश जन्माची आख्यायिका:
पार्वती देवीला स्नानासाठी जायचे होते. पण त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याकरता कोणीही नव्हते. तेव्हा पार्वतीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली. आणि त्यामध्ये प्राण टाकून त्या मूर्तीला जिवंत केले. व त्याला पहारा देण्यासाठी तेथे ठेवले. त्याला सांगितले की कोणालाही आत मध्ये येऊ देऊ नको आणि देवी पार्वती स्नानासाठी निघून गेल्या. भगवान शंकर काही वेळाने तेथे आले. आणि ते आत जाऊ लागले तेव्हा शंकरांना त्या पहारेकऱ्यांनी अडवले. त्यावर भगवान शंकर संतापले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचे शीर धडापासून वेगळे केले. जेव्हा पार्वती स्नान करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला. आणि त्या संतप्त झाल्या त्यांनी पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडले. सर्व देवता, देवी पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात पण पार्वती कोणाचे ऐकून घेत नाही. तेव्हा शंकर आपल्या गणाला आदेश देतात की पृथ्वीवर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचे शीर कापून घेऊन या. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्यांना हत्ती दिसतो ते त्याचे शीर कापुन घेऊन येतात. भगवान शंकर ते शीर त्या धडाला लावतात. आणि त्याला जिवंत करतात. हा पहारेकरी देवी पार्वतीचा मानसपुत्र गजानन होय. हा दिवस चतुर्थीचा असल्यामुळे या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
गणेश चतुर्थी मुहूर्त 2023:
गणेश मूर्तीची स्थापना पंचांगानुसार 19 सप्टेंबर 2023 ला सकाळी 11 वाजून 8 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.
गणपतीचे विविध अवतार खालीलप्रमाणे आहेत:
- वक्रतुंड अवतार: या अवतारात त्यांनी मत्सरासुर राक्षसाचा वध केला होता.
- एकदंत अवतार:भगवान परशुरामाशी युद्ध करताना गणपतीचा एक दात तुटल्यामुळे गणेशाला एकदंत म्हणतात. या अवतारात त्यांनी मदासुर राक्षसाचा वध केला होता.
- महोदर अवतार: या अवतारात गणपतीचे शरीर मोठे आहे. या अवतारात त्यांनी मोहासुर राक्षसाचा वध केला होता.
- गजानन अवतार: या अवतारात गणपतीचे कान मोठे आहेत. या अवतारात त्यांनी लोभासुर राक्षसाचा वध केला होता.
- लंबोदर अवतार: या अवतारात गणपतीचे पोट मोठे आहे. या अवतारात त्यांनी क्रोधासुर राक्षसाचा वध केला होता.
- विकट अवतार: या अवतारात गणपती खूप भयंकर दिसतात. या अवतारात त्यांनी कामासूर राक्षसाचा वध केला होता.
- विघ्नराज अवतार: या अवतारात गणपती विघ्नहर्ता म्हणून पूजले जातात.
- धुम्रवर्ण: गणेशाच्या या अवताराचा रंग धुम्रमय आहे. अहंतासुर या राक्षसाचा पराभव करण्यासाठी त्यानी हे रूप धारण केले.
या आठ अवतारांव्यतिरिक्त गणपतीचे अजूनही अनेक अवतार आहेत. काही अवतारांमध्ये त्यांना विविध शस्त्रे आणि आयुधां मध्ये बघितले जाते. काही अवतारांमध्ये त्यांना विविध पशु-पक्ष्यांशी जोडले जाते.
महोत्कट विनायक:
या अवतारात गणेशांनी देवांतक आणि नरांतक नामक दोन राक्षसंचा वध केला ज्यांनी तिन्ही देव लोकांवर कब्जा केला होता.
मयुरेश्वर:
हा अवतार त्रेता युगात झाला होता हा अवतार दैत्यराज सिंधूच्या अत्याचारापासून मानव आणि देवतांना वाचवण्यासाठी झाला होता. या अवतारात गणेशानी त्याचा वध केला होता.
धुम्रकेतू:
हा अवतार कलियुगात झाला असे मानले जाते. या अवतारात गणेशांचे दोन हात आहेत. आणि त्यांचा रंग धूम्र वर्णी आहे. तसेच त्यांचे वाहन निळा घोडा आहे. व ते त्याच्यावर स्वार आहेत.
विनायकी:
गणेशाचा हा अवतार स्त्री आहे. आणि त्याची बुद्धी आणि विद्येची देवी म्हणून पूजा केली जाते. अंधकासुराचा पराभव करण्यासाठी ती गणेशाच्या शरीरातून बाहेर पडली असे म्हणतात.
हेरंब:
गणेशाच्या या अवताराला पाच डोकी आहेत.
गणेशाचा हे अवतार सर्वज्ञ आहे. ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणून त्याची पूजा केली जाते.
गणपतीचे अवतार त्यांच्या शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहेत.
गणेश चतुर्थीचा उत्सव:
गणेश चतुर्थी संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा सण हिंदू कॅलेंडरमध्ये भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी सुरू होतो. जो सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. या दिवशी भक्त घरोघरी आणि मंदिरात गणपतीच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. मूर्ती फुलांनी, हारांनी, मिठाईने सजवल्या जातात. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी भक्त प्रार्थना करतात आणि भगवान गणेशाची आरती (पूजा) करतात.
धार्मिक विधींव्यतिरिक्त गणेश चतुर्थी उत्सवामध्ये कुटुंबे आणि मित्र या वेळेत एकत्र येतात. उत्सवादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा होतात जसे की संगीत मैफिली, नृत्य सादरीकरण आणि रांगोळी स्पर्धा.
भारताच्या विविध भागात गणेश चतुर्थी:
भारताच्या सर्व भागात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तथापि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये हे उत्सव विशेषतः भव्य आहेत. मुंबईत हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. संपूर्ण शहरात हजारो पँडल (तात्पुरती देवळे) उभारली जातात. हे पँडल फुले, दिवे आणि इतर सजावटींनी सजवले जातात.
हे पण वाचा - शेतकरी आणि महाडीबीटी योजना
गणेश चतुर्थी आणि पर्यावरण:
अलिकडच्या वर्षांत गणेश चतुर्थी उत्सवाच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल चिंता वाढत आहे. उत्सवादरम्यान वापरल्या जाणार्या अनेक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या असतात. जे नॉन-बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे. या मूर्ती नद्या आणि तलावांमध्ये विसर्जित केल्यावर त्या पाण्यात हानिकारक रसायने सोडतात.
गणेश चतुर्थीचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी बरेच लोक आता मातीच्या किंवा इतर जैवविघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींची निवड करत आहेत. काही समुदाय सामूहिक विसर्जन समारंभाचे आयोजन देखील करत आहेत. ज्यात मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले जाते. जे या उद्देशासाठी खास बांधण्यात आले आहेत.
भगवान गणेशाला विद्येची आणि ज्ञानाची देवता म्हणूनही ओळखले जाते. विद्यार्थी आणि विद्वानांकडून त्यांची पूजा केली जाते.
गणेश चतुर्थी हा नवीन उपक्रम आणि प्रकल्प सुरू करण्याचा काळ आहे.असे मानले जाते की या दिवशी सुरू केलेल्या सर्व नवीन प्रयत्नांना भगवान गणेश आशीर्वाद देतात.
गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक पद्धतीने कशी साजरी करावी यासाठी येथे काही टिप्स आहेत:
चिकणमाती किंवा इतर जैवविघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या पर्यावरणास अनुकूल मूर्ती खरेदी करा.
तुमच्या मूर्तीचे विसर्जन एका कृत्रिम तलावात करा. जे यासाठी खास तयार करण्यात आले आहे.
उत्सवादरम्यान प्लास्टिक पिशव्या आणि इतर डिस्पोजेबल वस्तूंचा वापर टाळा.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना देणगी द्या.
या टिपांचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या गणेश चतुर्थी उत्सवाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यात मदत करू शकता.
गणपती मंत्रपुष्पांजली:
मला आशा आहे की हा लेख माहितीपूर्ण आहे. वाचल्याबद्दल धन्यवाद.