कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव 2023 साजरा करणे. - एकतेचे आणि उत्साहाचे प्रतीक
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला श्रीकृष्ण यांचा जन्म झाला आहे असे मानले जाते. त्यामुळे या तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.भगवान विष्णू ने पापांचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. हिंदी पंचांग अनुसार श्रीकृष्ण अष्टमी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 03 वाजून 37 मिनिटांनी सुरू होईल. आणि ७ सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्री साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. त्यामुळे यावर्षी जन्माष्टमी साठी रोहिणी नक्षत्र सहा सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल. आणि 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 25 मिनिटापर्यंत चालेल. रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी रात्री एकाच वेळी असल्याने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सव 6 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल.
पूजा मुहूर्त:
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सहा सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजून 27 मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री 12 वाजुन 42 पर्यंत पूजा चालेल.
कृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दिव्य उत्सव आहे. हिंदू संस्कृतीत महत्त्वपूर्ण स्थान आहे. या शुभ सोहळ्याचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे दहीहंडीची परंपरा ज्याने गेल्या काही वर्षांपासून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. श्री कृष्ण जन्म अष्टमी म्हणून ओळखल्या जाणार्या भगवान कृष्णाच्या जयंतीनिमित्त आपण दहीहंडी उत्सवाचे सार आणि महत्त्व जाणून घेणे अत्यावश्यक आहे. कृष्ण जन्माष्टमी भगवान कृष्णाच्या जन्माचे पवित्र स्मरणोत्सव हिंदू धर्मातील एक आदरणीय सण आहे. या शुभ प्रसंगाचा एक आकर्षक पैलू म्हणजे दहीहंडीची परंपरा जी एका उत्साही उत्सवात विकसित झाली आहे. कृष्ण जन्मअष्टमी म्हणून ओळखल्या जाणार्या भगवान कृष्णाची जयंती आपण साजरी करत असताना दहीहंडी उत्सवाच्या बहुआयामी आयामांचा शोध घेणे आवश्यक बनले आहे. |
दहीहंडी उत्सव 2023 माहिती:
श्रीकृष्णाचे जन्मस्थान मथुरा आहे.त्यामुळे मथुरेमध्ये हा सण भव्य दिव्य असा साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशातून असंख्य कृष्ण भक्त मथुरेत येतात. दहीहंडीला गोपालकाला म्हणून सुद्धा संबोधले जाते. 2023 या वर्षात कृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबर 2023 ला साजरी होईल. याच्यानंतर पुढील दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर 2023 ला दहीहंडी हा सण साजरा केला जाईल. दहीहंडी हा उत्सव श्रीकृष्णाशी संबंधित आहे. त्यांना आपल्या बालपणात दही, लोणी व दुग्ध जन्य पदार्थ खूप प्रिय होते. त्याच्यामुळे ते आपल्या व शेजाऱ्यांच्या घरात आपल्या मित्राबरोबर जाऊन दही चोरत होते आणी आपल्या मित्रांना पण खायला देत होते. याच्यावरून त्यांचे नाव माखन चोर असे पडले. त्यांच्या या त्रासाला कंटाळून यशोदामाई व शेजाऱ्यांनी दही व लोण्यानी भरलेली भांडी किंवा हंडी उंच ठिकाणी ठेवायला सुरुवात केली. पण तिथेही श्रीकृष्ण गप्प बसले नाहीत. दही मिळवण्यासाठी दोस्ता बरोबर मानवी मनोरे बनवले व त्यांनी दही मिळवले. भगवान श्रीकृष्णाची ही लीला भारतीय परंपरेचा व भारतीय सणाचा एक भाग बनुन राहिली. यामुळे दरवर्षी जन्माष्टमीच्या पुढच्या दिवशी दहीहंडी साजरी करण्याची प्रथा चालू झाली. दहीहंडी उत्सवामध्ये श्रीकृष्णाची आराधना केली जाते. त्यादिवशी एक हंडी घेतात त्यामध्ये दही,दुध,फळे आणि बरेच पदार्थ घालून ती हंडी भरली जाते. आणि तिला उंच ठिकाणी लटकवली जाते. मुले मुली ही हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. त्यांना गोविंदा असे म्हटले जाते. हे गोविंदा मानवी मनोरे बनवून ही हंडी फोडतात. हंडी फोडण्यासाठी बक्षीस सुद्धा लावलेली असतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्याचे जाहीर केलं होतं. त्यामुळे इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे यंदा दहीहंडीचा खेळ हा प्रो गोविंदा असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 75 हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्यात आलेले आहेत. आणि यासाठी 18 लाख 75 हजाराचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.
राज्यात पहिल्यांदाच प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे तुम्ही घरबसल्या मानवी मनोऱ्याच्या थरारक खेळांचे थेट प्रक्षेपण बघू शकता.
वरळी येथील जांबोरी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपकडून दहीहंडीचे आयोजन केलेले आहे. विजेत्यांसाठी 33 लाख 33 हजारांची बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत. आठ थर लावणाऱ्या मंडळांसाठी 51 हजार रुपये, सात थरांसाठी 11000 रुपये आणि सहा थरांसाठी पाच हजार रुपये अशी बक्षिसे लावण्यात आलेली आहेत. दहीहंडीचा उत्सव हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांचा सराव जोरदार सुरू आहे. सेलिब्रेटि पेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व द्या अशी गोविंदा पथकांची मागणी आहे.
मानवी मनोऱ्यामध्ये गोविंदाची अस्तित्वात असलेली एकता आणि सुसंवाद दर्शवते. गोविंदाचा प्रत्येक स्तर सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे महत्त्व दर्शवतो. हंडी फोडणे हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. भगवान कृष्णाच्या बालपणीच्या कथांचे सार आहे. हे टीमवर्कच्या संकल्पनेचे उदाहरण देते. जिथे व्यक्ती समान ध्येयासाठी एकजुटीने कार्य करतात. दहीहंडीचा सण हा एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे जो भारतीय परंपरांचे सार प्रतिबिंबित करतो. गोविंदांनी मनोरे बनवताना दाखवलेला एकतेचा भाव भारतासारख्या वैविध्यपूर्ण राष्ट्राला बांधून ठेवणाऱ्या एकतेचे प्रतीक आहे.
अलीकडच्या वर्षांत मानवी मनोरे लावताना गोविंदाच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. आयोजक सहभागी असलेल्या प्रत्येक गोविंदाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करत आहे. दहीहंडीला महत्त्व प्राप्त होत असताना तिची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संयोजक परंपरेचे पालन करणे आणि सुरक्षा मानकांचे पालन करणे यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्सवाचे सार जपून आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन दहीहंडीचे पावित्र्य राखले जाऊ शकते.
श्रीकृष्ण जन्माष्टमी व दही हंडी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
वाचा- प्लासी आणि बक्सर ची लढाई आणि त्याचे प्रभाव
वाचा- रक्षाबंधन 2023 ची माहिती