गणेश पूजनादरम्यान(पत्रपुजा)वापरल्या जाणाऱ्या 21 प्रकारच्या (वनस्पती) पानाबद्दल काय म्हणते आयुर्वेद काय आहे त्याचे फायदे चला तर या लेखात जाणून घेऊया याबद्दल थोडक्यात.
अर्जुन-
अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदय पोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. अर्जुनारिष्ट हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहे. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शियम मुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.
अगस्ती (हादगा) -
प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारावर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्व अ हे दृष्टीला पोषक असते अ जीवनसत्वाचे वनस्पतीज रूप अर्थात बीटा कॅरोटीन हे तत्व अगस्तीच्या पानांमध्ये 45 हजार युजी एवढ्या प्रचंड प्रमाणात म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.
कन्हेर -
कन्हेरी हिचा उपयोग तारतम्याने करतात. कारण कणेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.
आघाडा -
आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी स्त्री रोगावर विशेष उपयुक्त असे आहेत.
जातिपत्र -
जाई व्रण रोधक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पाण्याच्या काढ्याने धुऊन त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.
केवडा-
केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्र विकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखी मध्ये किंवा इतर शिरा रोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.
डोरली -
डोरली सारखे रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंत कृमीचा त्रास कमी होतो. दात दुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.
हे पण वाचा- गणेश चतुर्थी 2023 ची माहिती
चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगावरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमीघ्न आहे. विशेषत टेपवर्मचा (चपट्या कृमी) त्रास यांनी नाहीसा होतो.
गणपती हे तेज (उष्ण) तत्व प्रधान दैवत आहे. आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दुर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतीमध्ये दुर्वा हे एक आद्य औषध आहे.
तुळशीचा सर्व प्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी, कफ,व तापा वरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारावर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचा विकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.
धत्तूरपत्र म्हणजे धोत्रेची पाने हे श्वसन विकारावर एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण आहे. तो योग्य पर्याप्त मात्र मध्ये वापरल्यास औषधासारखा उपयोगी पडतो अन्यथा घातक होऊ शकतो.
चरक संहिते मधील अनेक रोगांवरील औषधी प्रयोगामध्ये देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुर दारू असे सुद्धा म्हटले जाते
बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारावरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे बिल्वादी चूर्ण, बिलवा वलेह, बेल मुरांबा इत्यादी.
पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे. ज्याचा संदर्भ आयुर्वेदातच नव्हे तर ऋग्वेदात ही सापडतो. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षाची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेश पूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.
मरुवा अतिशय अल्हादायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन तयार करणाऱ्या सर्व अंतस्त्रावी ग्रंथांची राणी समजल्या जाणाऱ्या पियुषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही असे आयुर्वेद म्हणतो.
बोराच्या बी चे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखे खा- खा होण्याचा आजार कमी होतो. बोरांच्या पानाची चटणी तांदुळाच्या कांजी बरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.
भृंगराज पत्र अर्थात माक्याची पाने माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म' केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यावर हे उपयोगी ठरते.
मधुमालती म्हणजे मालती ही पत्री प्रामुख्याने मुख रोगावर उपयुक्त वनस्पती आहे.
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी बुद्धी स्मृती वर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.
अर्क पत्रे म्हणजे रुईची पाने रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरीतच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्याचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.
शमी हा शब्द 'शमयति रोगांन् इति' म्हणजे रोगाचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.
डाळिंब -

दूर्वा -

तुळस -

धोत्रा-
धत्तूरपत्र म्हणजे धोत्रेची पाने हे श्वसन विकारावर एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण आहे. तो योग्य पर्याप्त मात्र मध्ये वापरल्यास औषधासारखा उपयोगी पडतो अन्यथा घातक होऊ शकतो.
देवदार -
चरक संहिते मधील अनेक रोगांवरील औषधी प्रयोगामध्ये देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुर दारू असे सुद्धा म्हटले जाते
बेल -
बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारावरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे बिल्वादी चूर्ण, बिलवा वलेह, बेल मुरांबा इत्यादी.
पिंपळ -
पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे. ज्याचा संदर्भ आयुर्वेदातच नव्हे तर ऋग्वेदात ही सापडतो. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षाची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेश पूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.
मरुवा-
मरुवा अतिशय अल्हादायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन तयार करणाऱ्या सर्व अंतस्त्रावी ग्रंथांची राणी समजल्या जाणाऱ्या पियुषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही असे आयुर्वेद म्हणतो.
बोर-
बोराच्या बी चे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखे खा- खा होण्याचा आजार कमी होतो. बोरांच्या पानाची चटणी तांदुळाच्या कांजी बरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.
माका-
भृंगराज पत्र अर्थात माक्याची पाने माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म' केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यावर हे उपयोगी ठरते.
मधुमालती-
मधुमालती म्हणजे मालती ही पत्री प्रामुख्याने मुख रोगावर उपयुक्त वनस्पती आहे.
विष्णुक्रान्ता-
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी बुद्धी स्मृती वर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.
रुई -
अर्क पत्रे म्हणजे रुईची पाने रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरीतच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्याचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.
शमी-
शमी हा शब्द 'शमयति रोगांन् इति' म्हणजे रोगाचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.
हे पण वाचा- प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती