मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.या मुंबई नगरीला स्वप्ननगरी म्हणून सुद्धा ओळखले जाते.पण ही स्वप्न नगरी तयार कशी झाली. या स्वप्ननगरीचा इतिहास काय आहे. ही स्वप्ननगरी बनवण्या पाठीमागचे कारण काय आहे. ह्या अनेक गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो आज आपण जी मुंबई पाहतो आहे ती शेकडो वर्षांपूर्वी सात बेटांमध्ये वाटली गेली होती. त्याला आयलँड म्हणून ओळखले जात होते. मुंबई हे शहर सात छोट्या छोट्या बेटांनी बनलेले होते. यामध्ये माहीम, वरळी, बॉम्बे, कुलाबा, छोटा कुलाबा, माझगाव, परेल ही बेटे होती. शेकडो वर्षांपूर्वी ही बेटे एकमेकांशी जोडलेली नव्हती. तेथे जाणे येण्याची सोय नव्हती. त्यामुळे तेथील लोकसंख्या देखील कमी होती. आणि जे लोक होते ते पुरातन काळात त्या बेटावर राज्य करत होते. या मुंबईचे मूळ रहिवासी कोळी बांधव होते. आणि त्यांची आराध्य देवता मुंबादेवी होती. यावरून या शहराचे नाव मुंबई असे पडले.आणि 1995 साली या शहराला अधिकृतपणे मुंबई हे नाव मिळाले. तिसऱ्या शतकात इसवी सन पूर्व ते इसवी सन 1348 च्या मध्ये या बेटांवर वेगवेगळ्या हिंदू राज्यकर्त्यांनी राज्य केले. इसवी सन पूर्व 185 ते 321 इसवी सन पूर्व मध्ये ही बेटे मौर्य राज्याचा भाग बनले.त्यानंतर इसवी सन 1391 ते इसवी सन 1534 पर्यंत याच्यावर सातवाहनांचे नियंत्रण राहिले. याच्यानंतर खूप राजे आले आणि गेले. इसवी सन 1391 ते इसवी सन 1534 मध्ये उत्तर कोकणच्या भागाबरोबर मुंबई बेटे गुजरात सल्तनत च्या सुलतान बहादुर शहा यांच्या नियंत्रणात होती. आणि त्यादरम्यानच युरोपीयनांचे( पोर्तुगीज) आगमन झाले.
इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज नेविगेटर( जहाज चालवणारा) वास्को-द-गामा सगळ्यात पहिल्यांदा युरोपियन व्यापाराच्या( ट्रेडर) रूपात भारतामध्ये पोहोचला होता. आपल्या आगमनानंतर पोर्तुगीजांनी कित्येक वर्षापर्यंत उत्तर कोकणात आपली शक्ती दाखवण्यास सुरुवात केली होती. इसवी सन 1510 मध्ये पोर्तुगीजांनी विजापूर सुलतानाकडील गोवा मिळवला.आणि तेथे आपले वर्चस्व स्थापन केले. या दरम्यान पोर्तुगीज शोधक फ्रान्सिस डी अल्मिडा कन्नूर पासून दिव पर्यंतच्या मोहिमेदरम्यान आपल्या जहाजाबरोबर बॉम्बेत येऊन पोचला. त्यांनी 21 जानेवारी 1509 मध्ये गुजरातच्या सुलतान कडून माहीम क्रिक चा भाग बळकवून ह्या बेटावर आपली पहिली भेट दिली. यानंतर पोर्तुगीजांनी एक एक करून या बेटावरती आपले वर्चस्व निर्माण केले. आणि जानेवारी 1533 मध्ये बसैन बेट मिळवल्यानंतर माहीम आणि बांद्रा बेटे पोर्तुगीजांच्या नियंत्रणात आली. अशा तऱ्हेने पोर्तुगीजांनी पूर्ण बॉम्बे वर नियंत्रण मिळवले.
16 व्या शतकामध्ये भारतीय उपखंडात मुघलांचे वर्चस्व वेगाने पसरत होते. मुघल शासक हुमायून चे वाढते वर्चस्व बघता गुजरातचे सुलतान बहादुर शहा ची असुरक्षितता वाढत होती. इसवी सन 1532 नंतर हुमायून आणि बहादूर शाह यांच्यामध्ये सारखा संघर्ष वाढत होता. ज्यावेळी हुमायून ने गुजरात मिळवले. त्यावेळी पोर्तुगीजांनी ह्या गोष्टींचा फायदा घेत बहादुर शहा बरोबर ट्रिटी करार करायला जबरदस्ती केली. त्यामुळे 23 डिसेंबर 1534 मध्ये बहादुर शहा व पोर्तुगीज या दोघांमध्ये ट्रिटी ऑफ बसैन करार साईन झाला. ह्या अंतर्गत बॉम्बे ची सात बेटे, बसैन हे मोक्याचे ठिकाण आणि बहादुर शहा यांचे अवलंबित्व पोर्तुगीज नियंत्रणाच्या अधिपत्याखाली आले. आणि असे करून पोर्तुगीज बॉम्बे वर राज्य करू लागले. याबरोबरच ह्या बेटांवर इस्लामिक रुल पण संपुष्टात आला. येथे पोर्तुगीजांनी आपले ट्रेडिंग सेंटर स्थापन केले. पोर्तुगीजांनी बेटावरती काही ठिकाणी किल्ले बांधले. सॅलसेट बेटावर स्थापन करण्यात आलेला मढ किल्ला त्यांच्या महत्त्वाच्या बांधणी दरम्यानचा एक होता. ह्या वेळेतच पोर्तुगीजांनी येथे चर्चेस बांधले. तसेच येथील राहणाऱ्या लोकांमध्ये क्रिस्टीयानिटीचा आक्रमकपणे प्रसार केला.
सतराव्या शतकापर्यंत बॉम्बे पोर्तुगीजांच्या ताब्यातच राहिले. पोर्तुगीज ह्या ठिकाणाला बॉम्ब बाहिया(bomb bahia) म्हणून संबोधत असे. बॉम्ब बाहिया चा अर्थ आहे द गुड बे( चांगली खाडी) यापासूनच याचे नाव बॉम्ब बाहीया किंवा बॉम्बे असे पडले. इसवी सन 1580 ते इसवी सन 1640 मध्ये पोर्तुगाल व स्पेनने भारतात येण्यासाठी बाकी युरोपियन शक्तींसाठी आपले मार्ग खुले केले. याबरोबर येथे डच यांचे आगमन झाले. त्याबरोबरच वेस्टर्न इंडिया मध्ये डचांचे ट्रेडिंग वरती वर्चस्व प्रस्थापित व्हायला लागले. आणि जशी इंग्लिश मर्चंट ची बॉम्बे वरती नजर पडली त्यावेळी त्यांना याच्या मोक्याचे महत्व कळू लागले. नोव्हेंबर 1583 मध्ये इंग्लिश मर्चंट यांनी आपले पाऊल या ठिकाणी ठेवले. बॉम्बे च्या उत्कृष्ट नैसर्गिक बंदरांच्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करून येथे ते नाविक तळ तयार करू इच्छित होते. याबरोबरच सगळ्या बाजूने पाण्याने वेढलेले असल्या कारणाने ही बेटे जमिनीवरील आक्रमणांपासून रक्षण करत होती. भौगोलिक फायदे ब्रिटिशांना अजूनच जास्त आकर्षित करत होते. यानंतर इसवी सन 1612 मध्ये ब्रिटन आणि पोर्तुगीज मध्ये बॅटल ऑफ स्वाली( स्वालीची लढाई) लढली गेली.त्यामध्ये पोर्तुगीज सैन्याला हार पत्करावी लागली येथून ब्रिटिश राज्यवट या भागात लागू व्हायला लागली.
इसवी सन 1652 मध्ये ब्रिटिश एम्पायर सुरत कौन्सिल यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बॉम्बे पोर्तुगीजांपासून विकत घेण्याचा सल्ला दिला. 1660 मध्ये पोर्तुगाल मध्ये किंग जॉन 4 चे शासन होते. क्रिस्टीयानिटीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने त्याचे सारे लक्ष तेथेच लागून राहिलेले असायचे. ज्यामुळे या बेटांवरचे त्याचे ट्रेड व प्रशासन कोलमडले होते. ज्यामुळे किंग जॉन 4 ला या बेटावरती नियंत्रण ठेवण्यात अडथळे येऊ लागले. या दरम्यानच ब्रिटिश वेगाने पसरत चालले होते. आणि बॉम्बे वर तर त्यांची नजर पहिल्यापासूनच होती. 23 जून 1661 मध्ये पोर्तुगीज ॲम्बेसिडर ने इंग्लंडचा राजा चार्ल्स 2 आणि पोर्तुगालचा राजा जॉन चौथा याची मुलगी कॅटरिना डी ब्रिगयांजा यांच्याबरोबर विवाह प्रस्ताव ठेवला. या लग्नाला एका मोठ्या तपशीलवार दस्तऐवजीकरण द्वारे नियंत्रित केले जात होते. या विवाह करारामध्ये एक गुपित लेख पण होता ज्यामध्ये हे मागण्यात आले होते की बॉम्बेला इंग्लंडचा प्रिन्स चार्ल्स दुसरा याला हुंडयात देण्यात यावे. पण शेवटी इंग्लंडच्या प्रिन्स चे लग्न होणार होते. त्यामुळे इतके देऊन चालणार नव्हते. बॉम्बे बरोबर दोन दशलक्ष पोर्तुगीज क्राऊन आणि याबरोबरच मोरोक्को मधील एक शहर टॅंजियस पण देण्यात आले. त्याबरोबरच त्यांनी आणखी एक मागणी ठेवली होती ती अशी होती की इंग्लंड भारतामध्ये पोर्तुगालला डच आणि स्पॅनिश या शक्तींच्या विरुद्ध त्यांचे रक्षण करेल.
भारतामध्ये डच अजून सुद्धा शक्तिशाली शक्ती म्हणून अस्तित्वात होता. त्यांचे वर्चस्व अठराव्या शतकाच्या मध्यावतीतच कोलमडू लागले. एकीकडे इंग्लंडची पोर्तुगीजाना संरक्षण सेवा मिळाली तर दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांना महत्त्वाचे व मोठ्या किमतीचे बॉम्बे हे साधन मिळाले. याबरोबरच ब्रिटिशांना ब्राझील व पोर्तुगीज ईस्ट इंडीज मध्ये ट्रेड तसेच पोर्तुगीज मध्ये राहणाऱ्या ब्रिटिशांना धार्मिक व व्यावसायिक स्वातंत्र्य मान्य करण्यात आले. ह्या कराराला 28 ऑगस्ट 1661 ला मान्यता मिळाली. आणि 31 मे 1662 ला अखेर विवाह संपन्न झाला. याबरोबरच बॉम्बेला ब्रिटिशांना हस्तांतरण करण्याची तयारी सुरू झाली. ज्यावेळी गोष्ट बॉम्बेच्या हस्तांतरणाची आली त्यावेळी परिस्थिती अजूनच गुंतागुंतीची झाली. खरं म्हणजे पोर्तुगीज व्हॉइसरॉय यांना ब्रिटिश नापसंत होते. त्यामुळे या हस्तांतरांना त्यांनी कित्येक वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हस्तांतरणाची प्रक्रिया ब्रिटिशांना खूपच त्रासदायक होत गेली. इसवी सन 1665 मध्ये बॉम्बे चा ताबा ब्रिटिशांना सोपवला गेला. पण नाट्यमय घडामोडी संपता संपत नव्हत्या. तो लग्न करार सरळ तऱ्हेने घेतला गेलाच नाही. कारण हा करार सारखा पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यात संघर्षाचे चे कारण बनत होता. दोन्ही शक्ती प्रदेश विभागणीसाठी असहमती दाखवत होती. परंतु जवळजवळ दोन वर्षे वाट बघितल्यानंतर ब्रिटिश कमांडर नॉर्दन सॅलसेट ने आपला दावा सोडून केवळ बॉम्बे आयलँड घेण्यासाठी तयारी दाखवली.
पोर्तुगीजांकडे अजून बसैन, सॅलसेट, सायन, धारावी, मडगाव, वरळी, परेल, वडाळ्याचा ताबा होता. याच्यानंतर दोन महिन्यांनी त्यांच्याकडे लिस्बन कडून एक ऑफिशियल लेटर आले होते. ज्यामध्ये ह्या हस्तांतरणाला कायमस्वरूपी थांबवण्याचा आदेश दिला होता. परंतु त्यावेळी खूप उशीर झाला होता. त्या वेळेपर्यंत मडगाव व परेल ब्रिटिशांच्या अंतर्गत आले होते. व बाकी बेटे बॉम्बे बरोबर ॲड करण्यात आली होती. इसवी सन 1966 पर्यंत ब्रिटिशांनी धारावी, वडाला, माहीम, सायनला सुद्धा व्यापून टाकले होते. ब्रिटिश जेव्हा येथे आले तेव्हा या बेटांना व्यवस्थापित करायला खूप आव्हानांचा सामना करावा लागला. याच्यामुळे ब्रिटिशांनी बॉम्बेला ईस्ट इंडिया कंपनीला दहा पाउंड प्रतिवर्ष च्या भाडेतत्त्वावर सुपूर्द केले. याच्या बदली कंपनीने चार्ल्स दुसरा ला सहा टक्के वार्षिक दराने 50 हजार डॉलर्सचे कर्ज दिले. आणि येथूनच बॉम्बे च्या विकासाला सुरुवात झाली. या बेटांच्या विकासात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे रोगराई व कनेक्टिव्हिटी येथे एका पेक्षा एक भयानक रोग जन्म घेत होते. ईस्ट इंडिया कंपनीने येतील लोकांची लाईफस्टाईल चेंज केली आणि हायजिनिक व मेडिकल फॅसिलिटी वर काम केले. या रोगांना बऱ्याच प्रमाणात कंट्रोल केले गेले. त्यामुळे येथील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढू लागली. इसवी सन 1661 मध्ये येतील लोकसंख्या दहा हजार होती जी चार वर्षात 60000 वर गेली. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचे सेंटर गुजरात मधील सुरत या शहरात होते.
ईस्ट इंडिया कंपनीने आपला पहिला ट्रेडिंग सेंटर सुरत मध्ये स्थापन केला होता. सुरत या कंपनीची क्राऊन सिटी म्हणून ओळखली जात होती. कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेशन व ट्रेड चालत असल्यामुळे ही सिटी विकसित झाली होती. परंतु येथे दोन प्रॉब्लेम होते एक तापी नदी व दुसरी मराठा व मुगल यांच्यातील आक्रमणे यांच्यामुळे इसवी सन 1687 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपले हेडक्वार्टर बॉम्बेला शिफ्ट केले. पुढे जाऊन हे बॉम्बे प्रेसिडेन्सी चे हेडक्वार्टर बनले. बॉम्बेच्या विकासाचे काम सेकंड गव्हर्नर गेराल्ड ऑगायार यांच्या नेतृत्वात चालू झाले. यांना कंपनी द्वारा इसवी सन 1669 ला गव्हर्नर पदावर नियुक्त करण्यात आले आणि त्यांनी या पदावर इसवी सन 1677 म्हणजेच आपल्या मृत्यूपर्यंत सेवा दिली. यांच्या नेतृत्वातच बऱ्याचशा प्रशासकीय सुधारणांची अंमलबजावणी केली गेली. यांनीच येथे सगळ्यात पहिला कोर्ट तसेच सगळ्यात पहिली प्रिंटिंग प्रेस स्थापन केली. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे हा छोटा बेट व्यावसायिक केंद्रात रूपांतरित झाला. 17 व्या शतकाच्या मध्यात येता येता बॉम्बे एक महत्त्वाच्या ट्रेडिंग सेंटरमध्ये रूपांतरित झाला. येथे देशातून वेगवेगळ्या कोण्यातून मोठ्या प्रमाणावर इमिग्रेशन (कायमचे वास्तव्य) होऊ लागले.ब्रिटिश येथे बरेचसे ट्रेडिंग ग्रुप जसे की गुजराती, पारशी, ज्यू व दाऊदी बोहराज यांना घेऊन आले.
इसवी सन 1757 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचे नवाब सिराज उद दौलाह यांच्यात प्लासीची लढाई झाली यामध्ये ब्रिटिशांची जीत झाली. आणि बंगाल पण ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. ज्यामुळे भारतीय उपखंडात ईस्ट इंडिया कंपनीचा ट्रेड आणि प्रशासन खूप मजबूत होऊ लागले. बेटावरील लोकसंख्या वाढत होती. आणि कंपनीचे ट्रेड सुद्धा मग त्यासाठी त्यांना अजून मोठी जमीन आणि कनेक्टिव्हिटी पाहिजे होती. याचे निराकरण करण्यासाठी तेथे त्यांनी समुद्र हटवून जमीन तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. इसवी सन 1782 मध्ये या शहराच्या विकासासाठी त्यांनी तेथे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू केले. त्यांचे असे लक्ष होते की सात वेगवेगळी बेटे जोडून एक सिंगल बेट तयार करणे. यासाठी तेथे त्यांनी कॉजवे (मार्ग) बनवायला चालू केले. इसवी सन 1782 मध्ये बॉम्बेचे गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांच्यामुळे हे चालू केले गेले. यांच्याच नावावरून या प्रकल्पाला हॉर्नबी वेलार्ड नाव देण्यात आले. याला पूर्ण व्हायला दीडशे वर्षापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लागला. 1845 मध्ये मुंबई रूपरेखांमध्ये बनून तयार झाली. सात बेटे जोडल्यानंतर बॉम्बे शहराचा एरिया वाढुन 484 किलोमीटर मध्ये विस्तृत झाला. 16 एप्रिल 1853 मध्ये मुंबई ते ठाणे पर्यंत भारताची पहिली रेल्वे लाईन चालू झाली. इसवी सन1861 ते इसवी सन1865 पर्यंत चाललेल्या अमेरिकन सिविल वॉर च्या मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड मध्ये जगात सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ बनली. यामुळे या शहराची जागतिक स्थिती व आर्थिक प्रगती आणखी वाढली.
19 व्या शतकात बरेचसे शैक्षणिक व प्रशासकीय स्थापनांची अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे या शहराचा विकास पूर्ण झाला. एकीकडे महत्त्वाचा व्यापारी तळ व प्रशासकीय केंद्र बनून बॉम्बे ने ब्रिटिशांची मदत केली. तर दुसरीकडे 19 व्या शतकात बॉम्बे शहराने ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यामध्ये पण एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे.येथे दादाभाई नौरोजी यांनी 1885 मध्ये बॉम्बे असोसिएशन सुरू केले. त्यामुळे या शहरात राजकीय चेतना निर्माण व्हायला मदत मिळाली. या हालचालीला एक मोठा हातभार लागला जेव्हा ए. ओ. हयुम यांच्याद्वारे नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे याबरोबरच हे भारतातील सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच मुंबई भारताची व्यावसायिक व मनोरंजनाची राजधानी म्हणूनही ओळखली जाते. 2011 च्या सेंनससच्या माहितीनुसार मुंबई 18 दशलक्ष च्या मोठ्या लोकसंख्येबरोबर जगातील एकमेव प्रसिद्ध शहर आहे. परदेशी ताकद या शहराला बरोबर व्यवस्थापित करू न शकल्यामुळे एकमेकांकडे ढकलत होती. या शहराला कधी हुंड्यामध्ये दिले जात होते. तर कधी ट्रेडिंग कंपनीला भाड्याने दिले जात होते. असे वाटत होते की ह्याची आवश्यकता कोणालाच नाही. परंतु आज काही वर्षानंतर याची रूपरेषा अशी काही बदलली आहे की आज प्रत्येक जण या शहराचा भाग बनू इच्छित आहे.