डायरेक्ट टू मोबाईल(D2M) तंत्रज्ञानाची माहिती


 भारत एक डायरेक्ट टु मोबाईल टेक्नॉलॉजी(D2M)लॉन्च करू शकतो. हे एक क्रांतीकारी होणार आहे. जगात असा कोणताच देश नाही जे हे करण्याची योजना करत असेल. ज्याप्रमाणे यूपीआय सारखी सिस्टीम पूर्ण भारतातच फुकट व वापरायला सोपी आहे. अमेरिकेमध्ये पण या प्रकारची सिस्टम मिळणार नाही. अमेरिकेमध्ये आधारासारखी सिस्टम कधी बनवलीच नाही. पण भारत आजच्या वेळेस जी योजना करत आहे. डायरेक्ट टु मोबाईल (D2M) सेवा द्यायची. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर हे तुम्हाला दिसणार नाही.पण सरकार यावेळेला अन्वेंशन पण करत आहे. लाईव्ह टीव्ही व वेगवेगळ्या शोसाठी डायरेक्ट टु मोबाईल टेक्नॉलॉजी ला कसे आपण फोनवरती वापरू शकतो. या विषयाला जगामधील माध्यमे पण कव्हर करत आहेत. रशियाचे न्यूज आउटलेट आहे रशिया टुडे त्यांनी पण हे लिहिले आहे की स्मार्टफोन इंटरनेटशिवाय. 


स्मार्टफोन टीव्ही म्हणजे तुमचा स्मार्टफोन टीव्ही बनेल बिना इंटरनेटशिवाय पण हे कसे होणार येथे लिहिले आहे की जी टीव्ही केबल असते त्याच्या साह्याने नाहीतर टाटा स्काय, डिश टीव्ही, डीटीएच कनेक्शन आहे त्यांच्या साह्याने होईल. पण ते कनेक्शन आपल्या जवळपास पाहिजेच. तेव्हाच तुम्ही याचा वापर योग्य रितीने करू शकाल. ज्या तंत्रज्ञानाविषयी आपण आत्तापर्यंत बोलत आहोत ते जवळजवळ रेडिओ सारखे असणार आहे. आत्तापर्यंत आपण समजला असाल की  स्मार्टफोन विषयी चर्चा चालू आहे. स्मार्टफोनवर बिना इंटरनेटशिवाय मोबाईल डेटा. जो डेटा आपण सारखा विकत घेत असतो हा विकत घेण्याची गरज नाही आहे. कारण तो डायरेक्ट तुम्ही वापरू शकता. याच्यावर एक दस्तऐवज प्रकाशित झाले आहे. 

आय आय टी(कानपूर) आणि गव्हर्मेंट एजन्सीने ही जी डी टू एम(D2M) टेक्नॉलॉजी आहे ही एक एफएम रेडिओ सारखी असेल असे सांगितले आहे. एफ एम रेडिओला आपण मोफत वापरतो. आपल्या मोबाईल फोन मध्ये ही वारंवारता पकडणे ची आहे. याच्यासारखीच ही डी टू एम टेक्नॉलॉजी काम करेल. ज्या कंपनी डाटा इंटरनेट विकतात मोबाईल साठी त्यांचा व्यवसाय बंद होऊ शकतो. जर 526 आणि 528Mhz मध्ये ब्रोडकास्ट करायला सुरू केले तर आमचा डाटा विकत घेणार कोण यासाठी त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण बरेचसे लोक आरामात रेडिओ वारंवारतेचा वापर बिना इंटरनेट आपल्या मोबाईलवर करतील. 80 टक्के लोक जे मोबाईल डाटा विकत घेतात ते सारखे व्हिडिओ बघण्या वर लक्ष केंद्रित करतात. तर सरकार येथे एक्सप्लोर ( अन्वेंशन) करत आहे. 

हे एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल(सार्वजनिक खाजगी भागीदारी) असेल. जेथे सरकार व प्रायव्हेट कंपनी दोन्ही मिळून काम करतील. कारण हे आर्थिक स्वावलंबी असेल.आणि असे नाही आहे की येथे तुम्हाला जाहिरात दिसणार नाही.तुम्हाला मोफत, इंटरनेट दिले जात आहे तर वस्तू ची जाहिरात पण दाखवली जाणार कारण कुठून ना कुठून महसुल गोळा केला जाईल.जर तुम्ही विचार करत असाल की ह्या टेक्नॉलॉजी मुळे तुम्ही मोबाईल फोनवर यूट्यूब चे सगळे व्हिडिओ चित्रपट वगैरे सगळे बघू शकाल पण तसं नाही 


कारण आपण आत्ता दूरदर्शनची चर्चा करणार आहोत असे नाही की सगळं इंटरनेट तुमच्या फोनवरती येईल तुम्ही ब्राउझिंग करू शकाल तुमच्या फोनवर  google येईल असे नाही तर फक्त लाईव्ह क्रिकेट चालू असेल, वर्ल्ड कप जिथे इंडिया खेळत असेल याबरोबर दूरदर्शनचे खूप सारे चैनल येथे येऊ शकतील आणि सरकार साठी हे खूपच महत्त्वाचे आहे सरकार येथे फक्त हे बघत नाही तुम्हाला मोफत इंटरनेट द्यायचा आहे सरकारला याच्याशी काही देणं घेणं नाही की तुमचे मनोरंजन होईल , मोफत होईल सरकारला येथे दोन गोष्टी दिसत आहेत पहिली याच्यामुळे भारतामध्ये त्यांना एज्युकेशनल व्हिडिओ पाठवता येतील. भारताच्या लोकसंख्येच्या हिशोबाने आपल्या 22 करोड हाऊस होल्डर( कुटुंबप्रमुख) आहेत. जेथे आपल्याला टीव्ही बघायला मिळेल. या उलट ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत ते जवळजवळ 80 ते 90 करोड च्या आसपास लोक आहेत.भारतामध्ये जर आपण बघितले तर तेथे तुम्हाला टीव्ही दिसणार नाही पण स्मार्टफोन असेल.


डी टू एम टेक्नॉलॉजी मुळे सरकार डायरेक्ट त्या लोकांबरोबर संपर्कात येईल त्या लोकांना मेसेज, एसएमएस पाठवू शकेल,व्हिडिओ मेसेज पाठवू शकेल, आणि या सर्विस ला आपण कल्पना करू शकता आपण बऱ्याच प्रकारे याचा वापर करू शकतो. देव न करो की नवी महामारी येवो. पण आलीच तर त्याविषयी लोकांना माहिती देणे की हे करा हे करू नका.डी टू एम ने डायरेक्टली लोकांच्या फोनवर सरकार व्हिडिओ पाठवू शकेल.याबरोबरच लोकल इमर्जन्सी इशू अलर्ट(स्थानिक आपत्कालीन समस्या सूचना) करायची असेल तर सरकार तो व्हिडिओद्वारे सांगू शकेल. कुठे भूकंप आला असेल, कुठे वादळ येणार असेल यासाठी हे करा हे करू नका या सगळ्या गोष्टी डी टू एम टेक्नॉलॉजी मुळे होऊ शकतील. ही सेवा एक क्रांती होऊ शकेल. 


सरकारने नुकतेच अशा प्रकारची गोष्ट केली होती ती म्हणजे इमर्जन्सी सिवियर अलर्ट मेसेज(आपत्कालीन गंभीर इशारा संदेश) हा एक टेस्ट अलर्ट होता. डिपार्टमेंट ऑफ टेलि कम्युनिकेशन ने सांगितले की आम्ही आमची टेक्नॉलॉजी टेस्ट करत होतो. उद्या जर इमर्जन्सी आली तर डायरेक्टली तुमच्या मोबाईल फोनवर संदेश येईल. मग तुमच्याकडे नेटवर्क असू दे नाहीतर नसू दे. तुम्हाला हा मेसेज तुमच्या मोबाईल फोनवर दिसेल का याची टेस्ट केली होती. याची कल्पना जवळजवळ डी टू एम टेक्नॉलॉजीशी जोडलेली आहे. जर भूकंप आला किंवा वादळ आले किंवा आणखी काही संकट आले तर त्यावेळी सरकार इमर्जन्सी अलर्ट डायरेक्ट तुमच्या डिवाइस वर पाठवू शकेल. आजच्या काळात भारतामध्ये 5g आलेला आहे. तरीपण लोक कंप्लेंट करतात की आमचे इंटरनेट स्लो आहे स्पीड म्हणावी तशी येत नाही जी 5g ला येते. 


आंतरराष्ट्रीय लेवलला पण तुलना केली तर भारतीयांना 5g, 4g च्या नावावरती कधी आंतरराष्ट्रीय लेव्हलची स्पीड मिळाली नाही. आणि याचे कारण आहे कंजक्शन एवढे सगळे लोक इतके सारे डिव्हायसेस आहेत. आणि मोबाईल टॉवर इतके नाही आहेत जे व्यवस्थितपणे इंटरनेट पुरवू शकेल. धरून चला बहुतेक लोक हळूहळू डी टु एम कडे वळायला लागले. मोबाईल मध्ये
 बिना इंटरनेट चे व्हिडिओ बघायला सुरुवात करतील त्यामुळे इंटरनेटचा वापर कमी होऊ शकेल. त्याबरोबर टॉवर ची आवश्यकता पण कमी होईल.  त्यामुळे सरकार पण अन्वेंशन करत आहे की कसे बिना इंटरनेट शिवाय डी टू एम टेक्नॉलॉजी पासून मोबाईलवर कंटेंट(सामग्री) घेऊन येऊ शकतो. हा कन्टेन्ट कसा असेल, कुठला असेल, ते तर भविष्यातच कळेल. 


वाचा- मुंबईचा इतिहास (History of Bombay)


वाचा-  लेक लाडकी योजना 2023 ची माहिती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.