१५ ऑगस्ट २०२३ ची माहिती

 


15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला. स्वातंत्र्यानंतर आपले एक वेगळे स्थान जगात दिसू लागले. इंग्रजांनी दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केले. यावेळी किती हाल सहन करावे लागत होते. किती यातना भोगाव्या लागत होत्या. त्याविरुद्ध हे देशभक्त आणि  क्रांतिकारक लढा देत होते. यावेळी किती देशभक्तांना क्रांतिकारकांना फाशी दिली, तुरुंगवास भोगावा लागला, कित्येक देशभक्ताच्या क्रांतिकारकाच्या बलिदानामुळे आज आपण हा दिवस पाहतोय. 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्तांना त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस अर्पण केला जातो. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतामध्ये स्वातंत्र दिन साजरा केला जातो. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस अभिमानाचा आहे. हा दिवस देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याची तारीख 15 ऑगस्ट 1947 याचा अर्थ असा की 1947 हे भारताचे स्वातंत्र्याची पहिले वर्ष आणि पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून नेहमीच स्मरणात राहील. परिणामी देश 2023 मध्ये आपला 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. 15 ऑगस्ट 1948 रोजी भारताने आपल्या स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन साजरा केला. अशा प्रकारे हे वर्ष स्वातंत्र्याचा 76  वा वर्धापन दिन आहे. यावर्षीच्या उत्सवाची थीम आहे  "राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम" ("Nation first, Always first") हा आजादी का अमृत महोत्सव याचा एक भाग आहे.  

केंद्र सरकारने देशभरात हर घर तिरंगा अभियानाची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. या दिवशी देशाचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. यामध्ये आतापर्यंत आम्ही काय विकास केला आहे आणि भविष्यात काय लक्ष्य असणार आहेत हे देशाला सांगतात. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. मग राष्ट्रगीत गायले जाते. तिन्ही दल आपापल्या शक्तीचे प्रदर्शन करतात. परेड आणि भारताच्या विविध सांस्कृतिक परंपराचे दर्शन घडते. अशाप्रकारे राज्याच्या विविध भागात त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री राष्ट्रध्वज फडकवतात. 

४ जुलै 1947 ला ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारताच्या स्वातंत्र्य बाबतचे विधेयक सादर केले गले. त्यानंतर हे विधेयक संमत करण्यात आले. या विधेयकात हा ठराव झाला की 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिश काळ संपुष्टात येईल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट 1947 ला तिरंगा ध्वज फडकविला म्हणून 15 ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा आहे. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 77 वर्ष पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्याच्या दिवशी लोक पहाटे भारतीय राष्ट्रध्वज फडकवताना देशभक्ती बद्दल आपले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम परेड इत्यादीचे ही आयोजन केले जाते. 


मंगळवार, १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारत आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. या वर्षाच्या उत्सवाची थीम "राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम" अशी आहे. सरकारने दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समारंभ, लष्करी परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

स्वातंत्र्य दिन हा भारतातील राष्ट्रीय सुट्टी आहे. आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत गाण्यासाठी, देशभक्तीपर भाषणे ऐकण्यासाठी जातात  या दिवशी शाळा आणि व्यवसाय बंद असतात. 

स्वातंत्र्यदिन हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा काळ आहे.  1947 पासून भारताने केलेल्या प्रगतीवर चिंतन करण्याची आणि देशाचे चांगले भविष्य घडवण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची ही वेळ आहे. हा एक राष्ट्र म्हणून एकत्र येण्याची आणि आपले स्वातंत्र्य साजरे करण्याची वेळ आहे. एक देश म्हणून आपल्यासमोर असलेल्या आव्हानांवर चिंतन करण्याची आणि सर्व भारतीयांसाठी चांगले भविष्य घडविण्यासाठी पुन्हा वचनबद्ध होण्याची ही वेळ आहे.

स्वातंत्र्य दिन हा भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा आणि देशासाठी एक चांगले भविष्य घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याची वेळ आहे.  या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊ आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला झोकून देऊ.

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

                   जय हिंद


वाचा- डायरेक्ट टू मोबाईल (D2M) तंत्रज्ञानाची माहिती

वाचा- मुंबईचा इतिहास (History of Mumbai)



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.