जगातील सर्वात मोठे कार्यालय आहे भारतात

 जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत अमेरिकेत नसून भारतात आहे चला जाणूया सविस्तर 


भारतातील एका इमारतीला जगातील सर्वात मोठे ऑफिस इमारतीचा दर्जा मिळाला आहे. गुजरातमधल्या सुरत शहरात जगातील सर्वात मोठे कार्यालय बनवण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठ्या कार्यालयामध्ये अमेरिकेच्या पेंटागॉनचे कार्यालय पहिले होते. त्याला पण आपण मागे टाकले आहे. हे कार्यालय भारतात तयार झाले आहे. त्या कार्यालयाला सुरत डायमंड बोर्स असे नाव देण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून जगातील सर्वात मोठे कार्यालय बनण्याचा मान अमेरिकेच्या पेंटागॉनकडे होता. पण आता हा मान सुरत डायमंड बोर्स कडे जाणार आहे.

सुरत हे हिरे व्यापाराचे केंद्र मानले जाते. जगातील ९०℅ हिरे हे सुरत मध्ये तयार होतात. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश गढवी म्हणाले की ही इमारत बनवताना आपण अमेरिकेच्या पेंटॅगॉनला मागे टाकण्याचा कोणताही विचार केला नव्हता तर त्याचे मुख्य कारण डायमंड इंडस्ट्रीला प्रोत्साहन देणे होते. हिरे व्यवसायिकांसाठी हे वन स्टॉप डेस्टिनेशन असेल. 


जगातील 15 डायमंड पैकी 14 डायमंड पॉलिश करणे, कट करणे तसेच हिरे व्यापारा संबंधी सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. या गोष्टी या ठिकाणी होतात पण याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे डायमंडच्या खाणी आहेत. ह्या डायमंडच्या खाणी आपल्याला रशिया, आफ्रिका मध्ये मिळतील. या देशांमधून कच्चे डायमंड मागवून त्यावर आपल्या देशातील लोकांकडून कलाकुसर करून ते यु एस ए, युरोप मधील शोरूम मध्ये विकले जातील. हे कार्यालय ट्रेडिंग सेंटर आहे. ज्या ठिकाणी डायमंडचे ट्रेडिंग केले जाईल. त्याच्या अगोदर हे मुंबईमध्ये भारत डायमंड मध्ये होत होते. 

गुजरात मधील कार्यालय हे ७.१ दशलक्ष चौरस फुट जागेत बांधण्यात आले आहे. ही इमारत 15 मजली बनवण्यात आली असून ह्या बिल्डिंगमध्ये तेरावा मजला नाही. ही इमारत बांधण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागला. ही इमारत बनवण्यासाठी साधारणतः ३२०० कोटी रुपये खर्च आला तसेच या इमारतीमध्ये ४५०० कार्यालये असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर 2023 मध्ये या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. 


नवीन इमारत  हजारो हिरे व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. या इमारतीमध्ये हिरे व्यापाऱ्यांनी त्यांची कार्यालय घेण्यास सुरुवात केली आहे. 


वाचा- स्टार्ट अप इंडिया योजनेची माहिती


वाचा-  आय ए एस अधिकारी कसे व्हावे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.