महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या 2023 मधील अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणाच्या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. या घोषणांपैकी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे लेक लाडकी योजना 2023. ही घोषणा महत्वपूर्ण आणि लक्षवेधी ठरली आहे. मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आत्म निर्भर बनवणे, स्वतःच्या पायावर उभे राहता यावे. गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत मदत करणे. मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. याकरिता महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. लेक लाडकी योजना विशेषतः राज्यातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. त्यामुळे या योजनेतून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत होऊन राज्यात महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते. या योजनेत मुलींना अठराव्या वर्षात 75 हजार रुपये मिळतील तसेच मुलीच्या जन्मावर पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशाप्रकारे लाभार्थी मुलीला एकूण 98 हजार ची मदत महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येईल.
ही योजना पात्र मुली लाभार्थ्यांना 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करते:
जन्माच्या वेळी: रु. 5,000
इयत्ता 1ली मध्ये प्रवेश घेतल्यावर: रु. 4,000
इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेतल्यावर: रु. 6,000
इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्यावर: रु. 8,000
मुलगी १८ वर्षांची झाल्यावर: रु. 75,000
योजनेअंतर्गत दिलेली एकूण आर्थिक मदत रु. ९८,०००.
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड
- जन्म दाखला
- मुलीचे बँक खाते पासबुक किंवा तिच्या आई किंवा वडिलांचे बँक खाते पासबुक
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- कुटुंबाची केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- संपर्क क्रमांक
अटी व पात्रता
- या योजनेचा लाभ घेतलेली मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावी. व तिचा जन्म महाराष्ट्र राज्यातील असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील कुटुंबे पात्र असतील. तसेच त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे. पांढरे रेशन कार्ड असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- मुलीचे किंवा मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक
- या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयात झाला पाहिजे.
लेक लाडकी योजनेचे फायदे
- लेक लाडकी योजना पात्र मुली लाभार्थ्यांना अनेक फायदे देते यासह:
- शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत
- वंचित पार्श्वभूमीतील मुलींसाठी शिक्षणासाठी वाढीव प्रवेश
- मुलींचे शैक्षणिक परिणाम सुधारले जातील.
या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल. लेक लाडकी योजना विशेषता राज्यातील मुलींसाठी सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे या योजनेतून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत होऊन राज्यात महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकेल.
राज्य सरकारने लेक लाडकी योजना 2023 ही अर्थसंकल्पात घोषित केली आहे. पण अधिकृतपणे लागू करण्यात आलेली नाही त्यामुळे याबद्दल अधिकृत वेबसाईट लिंक, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, किंवा एप्लीकेशन फॉर्म उपलब्ध करण्यात आलेले नाहीत.
लेक लाडकी योजना ही एक मौल्यवान योजना आहे. जी महाराष्ट्रातील मुलींची शैक्षणिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. ही योजना पात्र मुली लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देते. ज्यामुळे कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. आणि मुलींसाठी शिक्षण अधिक सुलभ होईल. मुलींना त्यांच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ही योजना मदत करेल. लेक लाडकी योजना अधिक न्याय्य समाज निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
सरकारने मांडलेल्या या अर्थसंकल्पात मुलींसाठी खूप छान असे पाऊल उचलले आहेत. जेणेकरून मुलींना आर्थिक उच्चता गाठता येईल व पुढील शिक्षणासाठी मुलींना आर्थिक मदत मिळू शकेल हा अर्थसंकल्प महिलांच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे चित्र आहे. कारण महिलांना एसटीमध्ये मोफत प्रवास, अंगणवाडी आशा स्वयसेविकांच्या मानधनात वाढ अशा प्रकारच्या बऱ्याच योजना स्त्री सशक्तीकरणात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.
महत्त्वाची सूचना-
प्रिय वाचकांनो, आम्ही तुम्हाला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देतो. आम्ही सूचित करतो की तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन प्रदान केलेल्या माहितीची पडताळणी करा. आम्ही तुम्हाला फक्त योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला स्वतः अधिकृत वेबसाइटला भेट देऊन योजनेची सत्यता पडताळून पाहावी लागेल.
वाचा- नैराश्य( डिप्रेशन) म्हणजे काय त्याची कारणे व उपाय
वाचा- पन्हाळा किल्ला- महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ला