जुलियस रॉबर्ट ओपन हायमर- अणुबॉम्बचे जनक


 मै काल के रूप में मृत्यू हु संसार का विनाशक हू हे भगवत गीते मधील वाक्य आहे जे रॉबर्ट ओपन हायमर यांच्या तोंडातून बाहेर पडले ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा आपल्या हाताने बनवलेल्या दुनियाच्या पहिल्या आटोमिक बॉम्बच्या स्फोटाला न्यू मेक्सिको मध्ये बघितले होते. ज्युलियस रॉबर्ट ओपन हायमर हे जगातल्या प्रसिद्ध वैज्ञानिकांमध्ये त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ज्यांच्या वैज्ञानिक शोधा नंतर जग तसे राहिले नाही त्याची झलक ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने जपानचा बदला घेतल्यानंतर बघायला मिळाले. जो हिरोशिमा व नागासाकी वर ऑटोमिक बॉम्ब हल्ला झाला. ज्यामुळे खूपच जापनिक लोक मारले गेले जगातील सगळ्यात मनुष्यहानी झालेल्या देश म्हणून जपानची इतिहासात नोंद झाली. 

जुलियस रॉबर्ट ओपन हायमरचा जन्म एप्रिल 22 1904 मध्ये यु एस ए च्या न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जुलियस ओपन हायमर होते. त्यांचा टेक्सटाईल एक्स्पोर्टचा बिझनेस होता.ओपन हायमर लहानपणापासूनच हुशार होते. त्यांचे मन पुस्तकात रमत होते. वयाच्या नवव्या वर्षी लॅटिन व ग्रीक भाषेत ओपन हायमर फिलॉसॉफी ( तत्त्वज्ञान) शिकत होते. त्याचबरोबर त्यांना खनिज शास्त्र ( mineraolgy)मध्ये आवड निर्माण झाली होती. शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते हावर्ड युनिव्हर्सिटी मध्ये जाणार होते. अचानक तब्येत बिघडल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना न्यू मेक्सिको येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली.

अठराव्या वर्षी हावर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर रॉबर्ट ओपन हायमर यांनी केमिस्ट्री(रसायनशास्त्र),लिटरेचर(साहित्य)फिलॉसॉफी(तत्त्वज्ञान)मॅथेमॅटिक्स(गणित) चा अभ्यास केला. 1925 ला त्यांनी आपली बॅचलरची डिग्री पूर्ण केली. त्यानंतर त्यांना क्राईस्ट कॉलेज  केंब्रिजमध्ये ऍडमिशन मिळाले. तेथे त्यांनी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांना एक पत्र लिहिले. रुदरफोर्ड त्यावेळी चे केमिस्ट्री चे प्रसिद्ध वैज्ञानिक होते. ज्यांनी अल्फा व बीटा किरणांचा शोध लावला होता आणि ऍटोमिक मॉडेल सुद्धा बनवले होते. परंतु रुदरफोर्ड यांनी ओपन हायमरच्या पत्राची विनंती स्वीकारली नाही. ओपन हायमर जेव्हा केंब्रिज मध्ये  पोहोचले तेव्हा केमिस्ट्री चे दुसरे प्रसिद्ध वैज्ञानिक जे.जे थॉमसन ज्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता त्यांच्या हाताखाली काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ती पण एका अटीवर ती म्हणजे लॅब चे सर्व असाइनमेंट व कामे करणे ते त्यांना बिलकुल पसंत नव्हते. 

1957 मध्ये जर्मनीची प्रसिद्ध युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ गाॅटिंगन मध्ये पीएचडी साठी ऍडमिशन घेतले. तेथे त्यांची भेट वेटनर हेजणबर्ग व एनरिका फर्मी या जगातील प्रसिद्ध थेरॉटिकल फिजिसिस्ट बरोबर झाली. ते पुढे जाऊन खूप प्रसिद्ध झाले 1927 मध्ये ओपन हायमर यांनी 23 व्या वर्षी आपली पीएचडी पूर्ण केली. पीएचडी पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेला आले तेव्हा 1927 मध्ये हावार्ड युनिव्हर्सिटी आणि 1928 मध्ये कॅलथेक युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी रिसर्च केले. कॅलथेक युनिव्हर्सिटी मध्ये काम करताना त्यांची मैत्री लायनस कार्ल पॉलिंग यांच्याशी झाली जे जगातल्या वीस प्रसिद्ध वैज्ञानिकांमध्ये एक होते. ओपन हायमर व कार्ल एका केमिकल बॉण्ड वरती काम करत होते. त्यावेळी कार्ल यांना असे कळले की ओपन हायमर यांचे त्यांच्या पत्नीशी अफेअर चालू आहे. त्यावेळी त्यांची मैत्री संपुष्टात आली. मॅन हॅटन प्रोजेक्टमध्ये  रॉबर्ट ओपन हायमर यांना कार्ल यांची गरज होती. ते त्यांना केमिकल डिव्हिजनचा हेड बनवणार होते. त्यावेळी कार्ल यांनी ओपन हायमर यांना साफ नकार दिला होता. त्यावेळी मॅनहॅटन  प्रोजेक्टवर याचा प्रभाव दिसून आला होता. 


1930 मध्ये रॉबर्ट ओपन हायमरने बऱ्याच प्रसिद्ध वैज्ञानिकां बरोबर काम केले ज्यामध्ये नोबेल प्राइज विनिंग एरनेस्ट लॉरेन्स बरोबर त्यांच्या कामाची प्रशंसा केली गेली. एरनेस्ट लॉरेन्स  सायक्लोट्रॉनवर काम करत होते. जे एक प्रकारचे पार्टिकल एक्सलेटर होते यामध्ये मिळालेल्या यशानंतर रॉबर्ट ओपन हायमर यांना बढती मिळाली त्यानंतर ते प्राध्यापक झाले. 1936 मध्ये त्यांचे वैज्ञानिक करियर व्यवस्थित चालले होते तर दुसरीकडे त्यांची मानसिक स्थिती बिगडत चालली होती. त्यावेळी त्यांचा सामना भगवत गीतेशी झाला. भगवद्गीता समजून घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया चे संस्कृत प्रोफेसर आर्थर डब्ल्यू रायडर यांच्याकडून संस्कृत शिकून घेतले. 

रॉबर्ट ओपन हायमर असे मानत होते की भगवद्गीतेमुळे त्यांचे जीवन आणि विचार पूर्णपणे बदलून गेले आहेत. त्यानंतर त्यांचे जीवन थोडे सुरळीत होऊ लागले. 1940 मध्ये मेडिकल रिसर्चर कॅथलिन पुनिंग बरोबर त्यांचे लग्न झाले. ओपन हायमर कम्युनिस्ट विचार धारेला सपोर्ट करणारे होते. 1937 ला त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांचे वडिल दोन मुलांसाठी चार लाख डॉलरची संपत्ती सोडून गेले होते. तेव्हा हायमरने आपल्याकडील संपत्ती युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मधील ग्रॅज्युएट स्कॉलरशिप ला दान केली. यावरून त्यांच्या कम्युनिस्ट विचारांचा अंदाज लावू शकता. 

रशियामध्ये स्टॅलिनने जनतेवर अत्याचार वाढवले तेव्हा त्यांचा कम्युनिजम वरचा भरोसा उठला. आणि परत ते सायंटिफिक थेरी मध्ये गुंतून राहू लागले. त्यादरम्यानच 1939 मध्ये दुसरे महायुद्ध चालू झाले होते. आणि वेळ आली होती ओपन हायमरच्या सगळ्यात मोठ्या प्रोजेक्टची "द मॅन हॅटन प्रोजेक्ट" हा प्रोजेक्ट सुरू होण्याआधी जर्मनीने आपले न्यूक्लिअर बॉम्ब बनवायला सुरुवात केली होती. 1938 मध्ये जर्मन सायंटिस्ट यांनी फिशन रिएक्शन मुळे होणारी अनियंत्रित ऊर्जा निर्मिती व संशोधन पूर्ण केले होते. त्यामुळे जर्मनी आपल्या न्यूक्लिअर बॉम्ब विकसित करण्यावर लागला होता.हे लिओ स्लीजडऀ व दोन हंगेरीयन जर्मन वैज्ञानिकांना याबद्दल  माहित पडले होते. अशा मध्ये हिटलरचा वाढता द्वेष आणि जगाला हरवण्याची इच्छा हे या वैज्ञानिकांना समजले होते. त्यांना माहिती होते जर जर्मनी ने न्यूक्लिअर बॉम्ब बनवला तर जगाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या वैज्ञानिकांनी अमेरिका प्रेसिडेंट फ्रँकलिन रुजवेल्ट यांना कळवण्याचे ठरवले. परंतु त्यांना असे वाटले की आपल्या पत्राची दखल तेथे घेतली जाणार नाही. तेव्हा त्यांनी जर्मनीचे महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन ला माहिती दिली जे हिटलरच्या च्या भीतीने अमेरिकेत येऊन राहिले होते. जेव्हा अल्बर्ट आईन्स्टाईनला न्यूक्लियर बॉम्ब ची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रुजवेल्ट यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी जर्मनीमध्ये बनत असलेल्या ॲटम बॉम्ब ची माहिती दिली त्याबरोबरच अमेरिकेला परिस्थिती हाताळण्यासाठी कसे काम करावे लागेल या गोष्टीची माहिती सुद्धा दिली. 


अमेरिकेला या गोष्टीची माहिती नव्हती की असे काही होईल 2 ऑगस्ट 1939 ला आईन्स्टाईनचे लेटर, 1 सप्टेंबर 1939 ला जर्मनी द्वारे पोलंडवर आक्रमण नंतर दुसऱ्या महायुद्धाने अमेरिकेला या गोष्टीचा खोलवर विचार करायला लावले. त्यानंतर लगेचच प्रोजेक्ट द मॅन हॅटन वर जोरात काम चालू झाले. आईन्स्टाईनच्या पत्रानंतर फ्रँकलिन रुझ वेल्ट यांनी न्यूक्लिअर बॉम्ब वर रिसर्च करण्यासाठी अमेरिकेचे लेफ्टनंट जनरल लेसली ग्रोव्हजला परवानगी दिली. या प्रोजेक्टला द मॅन हॅटन असे नाव ठेवण्यात आले कारण त्याची सुरुवात मॅन हॅटन सिटी मधून झाली होती. आणि दुसरे कारण म्हणजे दुसऱ्या देशांबरोबर आपल्या देशातील लोकांपासून हा प्रोजेक्ट लपवून ठेवायचा होता. सरकार मधील अधिकाऱ्यांना देखील ह्या प्रोजेक्टची काही कल्पना नव्हती.जेव्हा हा बॉम्ब बनवून तयार झाला त्यावेळी त्यांना याबद्दल माहिती पडले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका पहिले दोन वर्षे युद्धात सहभागी झाले नव्हते. त्यावेळी अमेरिका ब्रिटनला शस्त्र पुरवत होता. 7 डिसेंबर 1941 ला जपानने अमेरिकेच्या हवाई बेटावर बनलेल्या पर्ल हार्बर नावल बेसवर हवाई हल्ला केला. ज्यामुळे पूर्ण अमेरिका घाबरून गेला होता. जपानच्या हल्ल्यानंतर अमेरिका दुसऱ्या महायुद्धाचा भाग बनला. याच्यानंतर अमेरिकेने आपले न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचे प्रयत्न जलद केले. जनरल लेसलीने न्यूक्लिअर बॉम्ब बनवायला ज्या सायंटिस्ट ची निवड केली होती त्या सायंटिस्ट चे नाव होते रॉबर्ट ओपन हायमर 

जून 1942 ला ओपन हायमरला टीमचा लीडर बनवला ज्याला खूप विरोध झाला कारण कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या वैज्ञानिकाला न्यूक्लिअर बॉम्ब बनवणाऱ्या टीमचा लीडर कसा बनवला. विरोध असून ही लेसली आपल्या निर्णयावर ठाम राहिले कारण त्यांना माहित होते की पूर्ण काम न्यूट्रॉन आणि त्यापासून निघणारी एनर्जी वर अवलंबून आहे.आणि अमेरिकेमध्ये ओपन हायमर पेक्षा यामध्ये कोणीही पारंगत नव्हते. पण असे पण नव्हते की ओपन हायमरच्या नेतृत्वामुळेच अमेरिका ऍटोमिक बॉम्ब बनवण्यात सफल झाला. रॉबर्ट स्कीजडऀ,एनरिको फर्मी, अल्बर्ट आईन्स्टाईन, एडवर्ड टेलर, रिचर्ड फेनमॅन यासारखे महान वैज्ञानिकाची साथ मिळाली आणि याबरोबर 15 वैज्ञानिकांची टीम मिळाली ज्यांना ओपन हायमर लीड करत होते. वैज्ञानिकांच्या टीम बरोबर एक लाख तीस हजार कामगार सुद्धा या प्रोजेक्टमध्ये काम करत होते. कारण अमेरिकेकडे युरेनियम 235 नव्हते ना युरेनियम 235 ला एक्सट्रॅक्ट करण्याचा टाईम होता. असे असताना निर्णय झाला की एन रिच युरेनियम 235 च्या जागेवर प्लूटोनियम चा वापर करायचा जे युरेनियम सारखेच फिशन रिएक्शन करून कल्पनाशक्ती पलीकडली ऊर्जा निर्मिती करू शकते. 

प्लुटोनियम 1940 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मध्ये विकसित करण्यात आले होते. जर ते विकसित झाले नसते तर अमेरिकेचे ऑटोमिक बॉम्ब बनवण्याचे स्वप्न पूर्ण झाले नसते. जून मध्ये बॉम्ब बनवण्याची जबाबदारी घेतल्यानंतर सप्टेंबर 1942 मध्ये ओपन हायमर आणि टीम ने क्लिअर केले होते की ऑटोमिक बॉम्ब बनवला जाऊ शकतो. आणि हा विकसित करण्यासाठी एक प्लॅन तयार केला गेला. बॉम्ब च्या टेस्टिंगसाठी ओपन हायमरची आवडती जागा न्यू मेक्सिकोच्या लॉस अलामोस निवडली गेली होती. जी की पूर्णपणे पडीक जमीन होती त्यामुळे सुद्धा त्याची निवड केली गेली होती. या टेस्टला ट्रिनिटी असे नाव देण्यात आले. ट्रिनिटी टेस्टिंगसाठी लॉस अलामोस मध्ये मिलिटरी पर्सन व वैज्ञानिकांना राहण्यासाठी व्यवस्था केली होती. यामधील कुणालाही घरी जाण्याची किंवा अनोळखी व्यक्तीला भेटण्याची परवानगी नव्हती. 1943 ते 1945 पर्यंत सतत बॉम्ब विकसित करण्यावर काम केले गेले. त्यानंतर 12 जुलैला प्लुटोनियम इन रिचड बॉम्बला डीटोनेशन साठी निवडले गेले या वेळेतच फ्रँकलिन रूज वेल्टचा ब्रेन हॅमरेज मुळे मृत्यू झाला. यानंतर व्हॉइस प्रेसिडेंट हॅरी एस. ट्रुमन ने यासाठी परवानगी दिली. असे म्हटले जाते की हा प्रोजेक्ट इतका सिक्रेट होता की फ्रँकलिन रुजवेल्ट शिवाय व्हॉइस प्रेसिडेंट  हॅरी एस. ट्रुमन  ला सुद्धा याबद्दल माहिती नव्हते.ज्यावेळी बॉम्बच्या डीटोनेशनची परवानगी त्यांच्याकडे मागितली गेली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले की कधी व केव्हा हा प्रोजेक्ट तयार केला गेला इतका हा प्रोजेक्ट सिक्रेट होता.हॅरी एस. ट्रुमन यांच्या परवानगी नंतर 12 जुलैला ट्रिनिटी टेस्टिंग झाली. ज्यावेळी हा ॲटॉमिक बॉम्ब फुटला त्यावेळी बघणारे हा स्फोट शब्दात सांगू शकले नाहीत इतका तो भयावह होता. हे बघून ओपन हायमरच्या तोंडातून भगवत गीतेमधील एक श्लोक निघाला ज्याचा अर्थ होता की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या समोर जेव्हा आपले खरे रूप दाखवले होते त्याप्रमाणे हे वाटत होते. आणि असे वाटत होते की आकाशात हजारो सूर्य चमकत आहेत. ओपन हायमर ला हा स्फोट दैवी स्वरूपा सारखा वाटला बॉम्बच्या यशस्वी टेस्टिंग नंतर सर्वजण खुश होते. पण इकडे ओपन हायमरला धक्काच बसला जे त्यांनी भगवद्गीतेच्या श्लोकाद्वारे सांगितले होते ज्याचा अर्थ होतो आता मी मृत्यू बनलो आहे आता मी असे काही बनवले आहे ज्यांनी कितीतरी निरागस लोकांचे प्राण जातील. ओपन हायमर आपल्या ह्या कामाने कधीच खुश झाले नाही आणि ते ज्या प्रकारे विचार करत होते तसेच 6 ऑगस्ट 1945 ला जपानच्या हिरोशिमांमध्ये बघायला मिळाले ज्यावर लिटल बॉय म्हणून ऍटोमिक बॉम्ब टाकला आणि पूर्ण हिरोशिमा उध्वस्त करून टाकले. यानंतरही जपान ऐकत नाही असे दिसल्यावर 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी वर फॅटमॅन नावाचा अणुबॉम्ब टाकला गेला. ज्या बरोबर दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट ही संपली जपानमध्ये झालेल्या विनाशानंतर ओपन हायमरने ठरवले होते की पुढे कोणताही ॲटम बॉम्ब बनवण्याची गरज नाहीये. पण जेव्हा अमेरिकन सरकारने त्यांना हायड्रोजन बॉम्ब बनवण्याची ऑफर दिली तेव्हा त्यांनी ती मानण्यास नकार दिला. ओपन हायमरला असे वाटत होते की त्यांनी बनवलेल्या ऍटोमिक बॉम्बने जगाला खूपच मोठ्या धोक्यात टाकले आहे पण त्यांचे असे पण मत होते की ते जर बॉम्ब बनवत नसते तर जर्मनीने हा बॉम्ब बनवला असता त्यामुळे हे जग राहायच्या लायकीचे राहिले नसते. ओपन हायमर चा मृत्यू 18 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूच्या आधीच जग न्यूक्लियर शस्त्र बनवण्याच्या रेसमध्ये लागले होते. ओपन हायमरच्या गोष्टीने आपण हे शिकतो की विज्ञानाचा दुरुपयोग मानव जातीला धोकादायक ठरणार आहे आणि याचा पश्चाताप ओपन हायमरला आयुष्यभर झाला ओपन हायमर भलेही हुशार वैज्ञानिक राहिले असतील पण दुसरा ओपन हायमर बनू नये हेच या दुनियेच्या दृष्टीने चांगले असेल.


वाचा- जगातील सर्वात मोठे कार्यालय आहे भारतात


वाचा-  स्टार्ट अप इंडिया योजनेची माहिती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.