स्वयंपाक घरातील या तीन गोष्टी बदला आणि आपले आरोग्य चांगले ठेवा. तर त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली आहे साखर साखरे बद्दल आपण सेंद्रिय गूळ वापरू शकतो. दुसरे आहे मीठ आयोडीन मिठा ऐवजी आपण सैंधव मीठ (रॉक सॉल्ट) वापरू शकतो. आणि रिफाइंड तेला ऐवजी शुद्ध लाकडी घाणा तेल वापरू शकतो. चला तर आज आपण पाहूया की या तीन गोष्टींचा आपल्या शरीराला किती फायदा होतो. आणि हे पदार्थ आपल्याला अनेक आजारांपासून कसे दूर ठेवू शकतात .
- सेंद्रिय गुळ
सेंद्रिय गुळाचे अनेक फायदे आहेत ते खालील प्रमाणे
- सेंद्रिय गुळाचा उपयोग शरीरातील ग्लुकोजची मात्रा कमी करण्यासाठी होतो. त्यामुळे डायबिटीज रोगींना सेंद्रिय गुळाचा उपयोग करणे फायदेशीर ठरते.
- सेंद्रिय गुळात शरीराला फायदेशीर असणारे अमिनो ऍसिड असतात. यामुळे शरीराचे अनेक अवयव स्वस्थ राहतात.
- सेंद्रिय गुळ शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयरोगाच्या जोखमीला कमी करता येते.
- सेंद्रिय गुळात अधिक रूपात खनिज तत्वे असतात. त्यामुळे हाडांची व दातांची निगा ठेवली जाते.
- सेंद्रिय गुळात मुख्य रुपात विटामिन ए आणि विटामिन सी असतात. त्यामुळे शरीराला रोगाविरुद्ध लढण्यास मदत होते.
- सेंद्रिय गुळाचे उपयोग पाचन तंत्रास खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अपचन, आम्लपित्त, गॅस, आणि अन्य पाचन संबंधी गोष्टींमध्ये उत्तम परिणाम मिळतात.
- सेंद्रिय गुळाचे उपयोग त्वचेच्या स्वास्थ्यासाठी उत्तम आहे.
- सेंद्रिय गुळामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- सेंद्रिय गुळाचे उपयोग शरीरातील हृदयासाठी फायदेशीर असतात. हृदयाच्या नसांच्या वहनांमध्ये रक्तसंचार वाढवतात त्यामुळे हृदय स्वस्त राहते.
- सेंद्रिय गुळाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे. ते वजन घटविण्याच्या क्रियांमध्ये मदत करते. ज्यामुळे शरीराची वजनाची नियंत्रण क्षमता वाढते.
- सेंद्रिय गुळाचा उपयोग शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करते. कारण यामध्ये उच्च प्रोटीन आणि आरोग्यदायी शक्ती भरपूर असते.
सैंधव मिठाचे फायदे खालील प्रमाणे
- सैंधव मीठ खाल्ल्याने पाचन शक्ती वाढते. तसेच आपल्या शरीरातील जलचर पदार्थ दूर होतात.
- श्वसन संबंधी समस्या मध्ये या मिठाचा खूप फायदा होतो.
- सैंधव मिठाचा फायदा उच्च रक्तदाब व हृदया संबंधी आजार कमी करण्यासाठी होतो.
- शरीरातील जंतू विरुद्ध लढण्यास सैंधव मीठ खूप फायदेशीर ठरते. तसेच हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
- सैंधव मीठ स्नायूंचे दुखणे कमी करण्यासाठी मदत करते. तसेच शरीरातील उष्णता नियंत्रण करण्याचे काम देखील करते.
- हे मीठ मूत्रपिंड स्वस्त राखण्यासाठी मदत करते. तसेच फॅट कमी करण्यासाठी याचा वापर होतो.
- जॉईंट दुखण्याच्या आजारावर सुद्धा सैंधव मीठ फायदेशीर ठरते.
- सैंधव मिठ रक्तदाब नियंत्रण करणे, अनिद्रा कमी करणे, मधुमेहावर नियंत्रणासाठी, खूप फायदेशीर असते. तसेच त्वचा स्वस्थ ठेवण्यास, पाचन संबंधी समस्या, अधिक मूत्रप्रवाह होण्यासाठी, लघवीचे संक्रमण रोखण्यासाठी, देखील याचा खूप फायदा होतो.
- ह्या मिठामुळे जर आपल्या शरीरात विटामिन आणि मिनरल ची कमतरता असेल तर ती भरून निघण्यास मदत होते. तसेच मस्तिष्क संबंधित समस्यावर देखील याचा चांगला परिणाम दिसून येतो.
लाकडी घाणा तेल हे नैसर्गिक पारंपारिक पद्धतीने निर्माण केले जाते. यामध्ये कोणत्याही रसायन यांचा वापर केला जात नाही. आणि हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते. त्याचे फायदे खालील प्रमाणे
- लाकडी घाणा तेल त्वचेला चमकदार व स्वस्थ बनवण्यास मदत करते
- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. शरीरातील विषाणू नियंत्रणात राहतात त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
- लाकडी घाण्याच्या तेलामुळे डायबिटीज, कॅन्सर, उच्चरक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच स्नायूंच्या स्वास्थ्यासाठी लाकडी घाना तेल फायदेशीर ठरते. यामध्ये ओमेगा थ्री असल्यामुळे ट्राय ग्लिसराईड नियंत्रणात राहतात. त्यामुळे स्नायू स्वस्थ राहतात.
- लाकडी घाना तेल केसांच्या, नखांच्या स्वास्थासाठी, पाचनशक्ती वाढवण्यासाठी, खूप फायदेशीर आहे. यामधील अँटीबॅक्टरियल गुणांमुळे दात आणि मुखातील रोग नाहीसे करण्यासाठी फायदा होतो.
- लाकडी घाणा तेल मधुमेह, लिपीडचे विकार, आणि उच्च रक्तदाबावर फायदेशीर ठरते. तसेच हे तेल स्किन मॉइश्चरायझर सुद्धा असते. त्यामुळे त्वचेला सुंदर व स्वस्थ बनवते.
- हे तेल मस्तिष्क स्वस्त राखण्यास तसेच मस्तीष्क संबंधी आजारावर परिणामकारक ठरते. स्मृतीशक्ती वाढवण्यास, पाचनशक्ती वाढवून शरीर स्वस्थ ठेवण्यास मदत करते.
- हाडांच्या आजारामध्ये, बुद्धिमत्ता विकासासाठी लाकडी घाना तेल खूप फायदेशीर असते
वरील माहिती द्वारे कोणताही दावा केला नाही तरी कोणत्याही आजारासाठी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा