![]() |
चॅट जी .पी .टी . |
आज सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे चॅट जी पी टी आता आपण पाहूया की चॅट जी पी टी म्हणजे काय आहे.
चॅट जी पी टी हे ओपनए आय या कंपनीचे चॅट बोट आहे ओपन ए आय या कंपनीची सुरुवात ही एलन मस्क आणि सॅम अल्टमन यांनी केली पण सध्या कंपनीचा कारभार सॅम अल्टमन पाहतात तशी ही कंपनी आर्टिफिशल इंटेलिजंट(कृत्रिम बुद्धिमत्ता) यावर काम करते कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक वेगळा विषय होऊ शकतो थोडक्यात चौथी औद्योगिक क्रांती असा होईल.
आता आपण चॅट जी पी टी कडे वळू चॅट जी पी टी चा फुल फॉर्म आहे चॅट जनरेटिव्ह प्रि ट्रेनड ट्रान्सफॉर्मर असा होतो चॅट जी पी टी हे एक ए आय चॅट बोट आहे यामध्ये आपण एका मशीन बरोबर संभाषण करत असतो आता ते मशीन म्हणजे काय संगणक. आपण या मशीनला काही विचारू शकतो आणि ते मशीन तुम्हाला त्याचे उत्तर काही सेकंदात देते मग ते प्रश्न लहानग्याचे असो किंवा मोठ्यांचे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हा चॅट बोट मानवाची जागा घेईल की काय.
जरी हा चॅट बोट सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देत असला तरी हा चॅट बोट अजून तरी शंभर टक्के बरोबर आहे असं पण नाही. ह्या चॅट बोट मध्ये जी माहिती असते ती पक्षपाती ही असू शकते कारण ती माहिती भरणाऱ्या व्यक्तीवर देखील अवलंबून असू शकते असं काही तज्ञांचे मत आहे.
या चॅट बोट ने अमेरिकेतल्या बऱ्याच परीक्षा पास केल्या होत्या नंतर भारतामध्ये महिन्याभरापूर्वी एक सर्वे केला होता त्यामध्ये चॅट बोट हा यूपीएससी चे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांची उत्तरे देखील सोडवू शकला नाही नंतर असे समजले की त्यामध्ये सप्टेंबर 2021 पर्यंतचा डाटा बसवण्यात आला होता बरं ह्या चॅट बोट मध्ये वेगवेगळ्या पाच स्त्रोतापासून माहिती गोळा करून भरण्यात येते जसं की पुस्तके, विकिपीडिया, इत्यादी माध्यमे.
हे चॅट बोट जे आहे ते आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी पूर्ण दिवस जात होता आता ते अगदी काही सेकंदामध्ये करून देणार उदा. संगीत रचना, कथा, बायोडाटा ई-मेल, सहल प्लॅन करणे, थीम, अशा बऱ्याच गोष्टी असतील.
जसजसं या चॅट बोटचा वापर करत जातील तसं ते स्मार्ट बनत जाईल. चॅट बोट हे काय मानव जातीप्रमाणे विचार नाही करू शकत हे पण तितकच खर आहे आज याचा वापर जवळ जवळ 140 देशांमध्ये करण्यात येतो आहे कदाचित त्याचे पुढचे नवीन सॉफ्टवेअर वापरण्यासाठी पैसेही मोजावे लागतील पण आता मानव जातीला ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर जगावं लागणार हे पण तितकच खरं आहे
वाचा - लाकडी घाना तेल आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते