वाघ संवर्धनाच्या उपक्रमाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत

व्याघ्र संवर्धन करणे काळाची गरज आहे                        गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेली वाघांची गणना पूर्ण झाली असून त्या नवीन आकडेवारीनुसार वाघांची संख्या वाढलेली आहे. आज वाघांची संख्या 3200 च्या आसपास आहे वाघांच्या बाबतीत लिहिण्यास कारण  भारताने राबवलेल्या वाघ संवर्धनाच्या उपक्रमाला पन्नास वर्षे झाली आहेत. याची सुरुवात 1 एप्रिल 1973 पासून झाली आहे. वाघ हे राष्ट्राचे प्रतीक आहे. 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. वाघाचे खरे माहेरघर हे भारताला मानले जाते. वाघ हा मांजर कुटुंबातील सर्वात मोठा सदस्य आहे. तो स्वतः शिकार करतो जगातील 70 टक्के वाघ भारतात मिळतात वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने आपले वस्ती स्थान हे दाट आणि अतिशय घनदाट जंगल असे निवडले आहे. वाघाची शिकारीचे क्षेत्र हे फार मोठे असते म्हणून तो मोठी जंगले निवडतो आज ती जंगलेही संपुष्टात आली आणि वाघ ही. भारतीय वाघांचे वजन हे 100 ते 200 किलो ग्रॅम असते. वाघाला ओळखण्याची पद्धत म्हणजे त्याच्या अंगावरील पट्टे वाघाच्या अंगावर साधारण शंभर पट्टे असतात पट्ट्यामुळे वाघ जंगलामध्ये पटकन ओळखून येत नाही. वाघाचा पंजा हा आकारा पेक्षा मोठा आणि मजबूत असतो. वाघाच्या ठष्शामुळे आपल्याला त्या ठिकाणी वाघ आहे की नाही हे समजू शकते. वाघाचा जबडा सर्वात ताकदवान असतो. जबड्याचा वापर हा शिकारीमध्ये दात रोवण्यासाठी किंवा शिकार ओढून नेण्यासाठी करतो. वाघांना पाणी आवडते. तो उन्हाळ्यात पाण्यात तासन्तास डुंबून असतो. वाघ पट्टीचा पोहणारा आहे. वाघा हा एकटा राहणारा प्राणी आहे. तो दुसऱ्या वाघांना येण्यासाठी मज्जाव करतो. वाघाचे भांडण हे जीव घेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडावर आपले मुत्र फवारून नाहीतर झाडावर नखाने ओरखडे करून ठरवतो. वाघ हा पूर्णपणे मांसाहारी आहे. तो पूर्ण वाढ झालेल्या हत्तीला सोडले तर सर्व प्राण्यांची तो शिकार करतो.वाघ हे एकटे शिकार करतात. वाघ हा एखाद्याची शिकार करायची असल्यास दबा धरून त्या शिकारीच्या जास्तीत जास्त जवळ जातात आणि त्यांची शिकार करतात. पूर्ण वाढ झालेला वाघ 65 किलोमीटर वेगाने चाल करतो. त्याची ढेंग पाच ते सहा मीटर जाऊ शकते. वाघ हा शिकारीच्या गळ्याचा चावा घेऊन श्वसननलिका फोडतो. छोट्या शिकारीसाठी  वाघाचा पंजाच काफी असतो. वानरांची शिकार करतेवेळी वाघ ज्या झाडावर वानरांचा कळप असेल तेथे जाऊन जोरात डरकाळी फोडतो जेणेकरून काही वानर हृदयाचे ठोके बंद पडून खाली पडतात.
 सांबर हा प्राणी  वाघांचे आवडते भक्ष्य आहेे .वाघाने शिकार केल्यावर राहिलेले मांस गिधाडे व कावळे यापासून लपवून ठेवतो. वाघा हा अति उच्च दर्जाचा शिकारी आहे. पण एक शिकार करायला वीस वेळा  प्रयत्न करावे लागतात. वाघ शिकार खाण्याचे बाबतीत फार स्वच्छ असतात. ते पहिल्यांदा शिकारीच्या पोटातली सर्व घाण काढून टाकतात आणि मगच तेे खातात. एकदा केलेली शिकार आकारमानुसार पाच ते सात दिवस घालवतात.पूर्वी ब्रिटिश काळी लोक हौशीसाठी किंवा पैसे मिळवण्याच्या हेतूने वाघांची शिकार करत असत.1970 च्या काळात वाघांची संख्या ही अठराशे पर्यंत होती. त्यानंतर लोकांनी यांच्यासाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली.1973 पासून प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प राबवण्यात आला. या अंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले. आता लोकांमध्ये वन्यजीवाबद्दल आस्था कुतूहल व त्यांना जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली आहे. वाघाला अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाघ हा गवतावर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करतो. जेणेकरून त्या प्राण्याची संख्या नियंत्रित राहते. पृथ्वीचा समतोल राहतो. जंगलामध्ये वाघ असेल तर जंगल सुरक्षित राहतात नाहीतर आज आपण जंगलतोडीमुळे तापमान वाढीमध्ये काय फरक पडला आहे ते पण जाणतो म्हणून वाघाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे


 वाचा -चॅट जी पी टी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.