लाकडी घाणा शुद्ध तेलाचे फायदे

 पले पूर्वज लाकडी घाण्याचे तेल खात होते म्हणून ते दीर्घायुष्यी होते. 




लाकडी घाण्यावरचे तेलच सर्वोत्तम कारण तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे तेल बियांवर जास्त दाब दिला जात नाही. शिवाय हा घाणा एक मिनिटात चौदा वेळा फिरतो. त्यामुळे लाकडी घाण्यात तेल काढताना तेलातील एकही घटक कमी होत नाही. कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पूर्णपणे नैसर्गिक व शास्त्रोक्त पद्धतीने तेल निर्माण केले जाते.शुद्ध तेलाचा वास येतो.कारण त्या तेलात चार ते पाच प्रकारचे प्रोटीन्स असतात.

                   
 थंड दाबलेल्या तेलामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड नसतात.आणि ते नैसर्गिक रित्या कोलेस्ट्रॉल मुक्त असते.अशाप्रकारे बनवलेल्या तेलामध्ये रासायनिक घटक आणि रासायनिक पद्धतीचे तयार केलेल्या तेलांसारखे संरक्षक नसतात.
                       थंड दाबलेल्या तेलाला खरी चव असते.या तेलात बनवलेले अन्न अधिक रुचकर असते.थंड दाबलेल्या तेलांमुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी केले जाते.त्यामुळे तुमचे हृदय अधिक निरोगी आणि आरोग्यदायी राहते.

लाकडी घाण्याचे तेलाचे फायदे -

  1. शंभर टक्के शुद्ध व आरोग्यासाठी लाभदायी असणारे तेल
  2. कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नाही.
  3. शून्य कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाची व शरीराची कार्यक्षमता वाढते.
  4. हे तेल कमी प्रमाणात लागते.
  5. शरीरास उपयुक्त प्रथिने मिळतात.
  6. तेलाचा नैसर्गिक रंग, चव, सुगंध कायम राहतो.
     7 . त्वचा व सौंदर्यासाठी लाभदायक


रिफाईंड ऑइल खायला हानिकारक आहे, मग कुठलं तेल खाण्यात वापरायचे आणि तेच का खायचं ?*

कोल्ड कम्प्रेस् ऑइल म्हणजेच लाकडी घाण्याचे तेल. जुन्या पद्धतीत तेल काढण्याची पद्धत म्हणजे लकडी घान्यावरील तेल…

लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे 

१. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते .

२. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात . तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो .

३. शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात .

४. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही . शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो . थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM १४ असतो . त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही .

५. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H.D.L) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे .

६. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही .

७. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस,ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे .

८. भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते . १०० वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.

९. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही . हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात .

१०. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे, आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवणारे लाकडी घाण्याचेच शुद्ध तेल खावे . तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे की, शेंगदाण्याच्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते हे चुकीचे आहे . उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे H. D. L. वाढते आणि हेच H. D. L. आपल्या शरीरात अत्यंत आवश्यक असते .


वाचा-भारतीय वैज्ञानिकांना पृथ्वीवरील 15 घटक शोधण्यात यश


वाचा-समान नागरी कायदा( Uniform civil code) काय आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.