आज मी दत्तगुरूंच्या मंदिरात गेलो होतो. आणि नेमका तो दिवस गुरुवारचा होता. लोकांची गर्दीही फार होती. म्हणून मला गुरु या विषयावर काहीतरी लिहावसं वाटलं ते मी लिहीत आहे.
गुरु
गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करणारा आयुष्यात येणाऱ्या संकटाशी सामना कसा करावा हे शिकवणारे म्हणजे गुरु असे म्हणू शकतो. आज हीच गुरूंची व्याख्या पूर्णता बदलल्यासारखी वाटते. पूर्वीच्या काळी गुरु विषयी फार आस्था होती. आपण जर आपला पूर्वीचा इतिहास बघितला तर राजा महाराजांच्या महालामध्ये गुरूला एक विशेष स्थान होते. कारण पूर्वीच्या लोकांना हे माहित होते की मनुष्याच्या आयुष्यात येणारे असे काही प्रसंग असतात त्याचे समाधान फक्त गुरुच करू शकतात. पण आजची परिस्थिती फार वेगळी झालेली आहे आज जर मला एखाद्या गोष्टीचे समाधान हवे असेल तर आपण डिजिटल माध्यमांचा वापर करून त्याचे समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. याचा अर्थ असा नाही की मी या माध्यमांना कमी समजतो पण आयुष्य कसे जगावे हे मात्र गुरु शिवाय कोणी शिकवू शकत नाही.
आयुष्य जगत असताना माणूस हा गोंधळलेला असतो. त्याला काही समजत नाही की कोणत्या वेळेला काय करावे आणि करू नये. अशावेळी आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती (गुरु) असावे असे वाटते. आज मला मंदिरात आल्यावर एक प्रश्न पडतो की येथे जमलेले लोक यांना गुरु महात्म बद्दल माहिती असेल का तसे मी पण या विषयात पारंगत नाही. मला असे वाटण्याचे कारण की हे जे लोक आहेत ती आमची आजची पिढी आहे. आणि आजच्या पिढीचा विचार करता ही पिढी निराश आहे. या पिढीला जगावं कसं हेच कळत नाही.
समाजात वावरत असताना आपण पाहतो की तरुणाई किती व्यसनाधीन झाली आहे. घटस्फोटांचे प्रमाण किती वाढले आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत. संत तुकाराम महाराज हे परमार्थात एवढे यशस्वी होते की त्यांना विठ्ठल दर्शन होत होतं. तरी पण त्यांना ह्या गोष्टींची उणीव का भासत होती की आपल्याला गुरूंची आवश्यकता आहे. मग आपण तर सर्वसामान्य माणूस आहोत मग आपली परिस्थिती काय असेल. गुरूंचे महात्मा संताना माहीत होतं. खरं सांगायचं तर असे वाटते की आयुष्यात गुरूला पर्याय नाही. मग आपल्याला हा प्रश्न पडत असेल की आजच्या घडीला कुठे आहेत असे गुरु जे आपल्या आयुष्याचे सोनं करतील.
आपले प्रथम गुरु हे आई व बाबा असतात. शाळा शिकत असते वेळी शिक्षक हे आपले गुरु ज्यावेळी आपण करिअरच्या पाटी असतो त्या वेळचे मार्गदर्शक हे पण आपले गुरु आणि आध्यात्मिक गुरु जे आपल्याला अध्यात्म विषयी ज्ञान देऊ शकतात एवढे सर्व आपले गुरु असताना आपल्या आयुष्याचे सोने का होणार नाही. इथे फक्त एकच असते की त्यांनी सांगितलेला मार्गावर चालत राहणे. करिअरच्या बाबतीत सांगायला गेले तर आजच्या पिढीतल्या सर्व तरुणाईचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी सांगितलेल्या मार्गावरून सचिन यांनी वाटचाल केली. म्हणून आज सचिनला सर्व जग ओळखते. म्हणून प्रत्येक क्षेत्रातल्या गुरूंचा आदर करा. संत ज्ञानेश्वरांनी पण म्हटलेलं आहे गुरुविण अनुभव कैसा कळे.
तात्पर्य
मनुष्याला गुरु शिवाय पर्याय नाही. आज समाजामध्ये एवढे तंटे अंधश्रद्धा वैवाहिक जीवन नशा असे कितीतरी गोष्टींनी समाज ग्रासलेला आहे. याच्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात मार्गदर्शक (गुरु) हे असलेच पाहिजे.
" गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः"
वाचा -भौगोलिक मानांकनाचे महत्त्व