आयुर्वेदातील पाच महत्त्वाच्या औषधाची माहिती जाणून घ्या


तुळस-                                                                                                      आयुर्वेदामध्ये तुळशीला रोग नाशक समजले जाते.
  तुळशीला वनस्पतींची राणी असे ही म्हणतात. तुळशीचे दोन प्रकार आहेत १) राम तुळस २) श्याम तुळस. तुळशीमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी, अँटी बॅक्टरियल, अँटी फंगल, अँटि व्हायरल, अँटी एलर्जी, प्रॉपर्टी आहे बऱ्याच आजारांपासून तुळस रक्षण करते. सर्दी, खोकला, ताप, हृदयविकार, रक्तदाब, पोटांचे विकार, त्वचेचे त्रास, किडनी स्टोन, टीबी, कॅन्सर, अशा अनेक आजारावर तुळस परिणामकारक ठरते. एक ग्लास ताकातून दोन थेंब तुळशीचा अर्क घालून ते प्यायल्याने कॅन्सर पासून देखील आराम मिळतो. तुळशीचा अर्क त्वचा विकारावर परिणामकारक ठरतो. सर्दी खोकला अस्थमा शिंका येणे डोकेदुखी ताप आला असेल तर तुळशीच्या रसाचे दोन थेंब मधात टाकून दिवसातून तीन-चार वेळा घेतल्याने आराम मिळतो. दररोज तुळशीची दोन-तीन पाने चावून खाल्ल्याने आरोग्यासाठी फार फायदेशीर असते.

लसुन-
                                आपल्या पुराणांमध्ये याला महा औषध मानले गेले आहे. छोट्या आजारांपासून ते मोठ्या आजारापर्यंत सगळ्या रोगांना नष्ट करण्याची शक्ती लसणात आहे. दररोज एक-दोन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आपले हृदय स्वस्थ राहते. सर्दी खोकला दमा व श्वासांच्या  विकारावर लसूण गुणकारी आहे. जुनाट सर्दी किंवा खोकला झाला असल्यास लसणाचा वापर केला जातो. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी देखील लसणाचा वापर करावा. लकवा व प्यारेलिसिस आला असेल किंवा तोंड वाकडे झाले असल्यास लसूण तिळाच्या तेलामध्ये तळून खाल्ल्याने फायदा होतो. दररोज लसूण खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका थांबवू शकतो. दररोज दोन-तीन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आपला रक्तदाब नियंत्रित राहतो.

हळद-
                                  हळदीला आयुर्वेदामध्ये हरिद्रा म्हणतात. हळद ही औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे. ती जंतुनाशक सुद्धा आहे. आपल्याला एखादी जखम झाली की आपण त्या जखमेवर हळद पूड लावतो. तसेच धार्मिक कार्यात सुद्धा हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक प्रकारच्या त्वचारोगांमध्ये हळकुंड चा वापर केला जातो. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. हळदीचे दूध नियमित प्यायल्याने अनेक आजारांशी लढणारी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच सर्दी खोकला कमी करण्यास देखील मदत होते. हळदी मधील अँटिऑक्सिडंट कॅन्सरच्या कोशिका मारण्याचे काम देखील करतात. हळद रोज खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. हळदीच्या नियमित वापरामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.                       

आले-
                                मसाल्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे आले.आले हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते. आल्याचे अनेक औषधी गुणधर्म असतात. आले हे पोट दुखी साठी अपचन अजीर्ण मळमळ यासाठी वापरतात. अर्धा इंच आले किसून त्यावर अर्धा लिंबू पिळून चिमूटभर सैंधव मीठ टाकून जेवणा अगोदर अर्धा तास खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते. सतत मळमळ होत असल्यास दररोज आल्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

कोथिंबीर-
                                आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये कोथिंबिरीचा वापर करतो. कोथिंबिरीमध्ये लोह, अँटी ऑक्सीडेंट, खनिजे, असतात. त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. कोथिंबीरीच्या औषधी गुणधर्मांचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. कोथिंबीर मधुमेही रुग्णांसाठी फारच फायदेशीर ठरते. कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते. कोथिंबीर ही मूत्रपिंडासाठी एक औषध म्हणून काम करते. मूत्रपिंडातील दगड, मूत्रपिंड डिटॉक्स करणे इत्यादी साठी कोथिंबिर ही रामबाण औषध आहे. कोथिंबीरीची एक जुडी घेऊन ती नीट करून मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यावी नंतर तीन ग्लास पाण्यात ही कोथिंबीर टाकून ती उकळावी व एक ग्लास शिल्लक राहिल्यावर कोमट करून सकाळी अनाशापोटी प्यावे असे केल्याने तुमचे मूत्रपिंड स्वच्छ होण्यास मदत होते आणि तुमचे मूत्रपिंडाचे काम व्यवस्थित राहते. कोथिंबिरीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
                        तरी अशा या औषधी गुणधर्म असलेल्या पाच वनस्पतीचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये वापर केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल आणि बऱ्याच रोगांपासून तुमचा बचाव होईल. 
टीप - वरील लेख हा माहितीसाठी लिहिला असून यामध्ये कोणताही दावा केला नाही तरी याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक                                    
                                     
                        
 वाचा - गुरूंचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया                

                

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.