अक्षय तृतीया
हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. अक्षय तृतीयेचे महत्त्व अन्यनसाधारण असे आहे. अक्षय तृतीया ही तिथी साडेतीन मुहूर्तातील एक तिथी मानली जाते. अक्षय याचा अर्थ क्षय न पावणारे, नाश न पावणारे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही शुभकार्याचा व नवीन कामाचा आरंभ केला जातो. अक्षय तृतीया हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी काही लोक सोने खरेदी करण्यासाठी विशेष भर देतात. या दिवशी नवीन संकल्प करणे. नवीन व्यवसायाला प्रारंभ करणे. नवीन वाहन खरेदी करणे. नवीन घर खरेदी करणे अशी बरीच शुभकार्य केली जातात. तसेच शेतकरी आपल्या शेतामध्ये या दिवशी कामाची सुरुवात करतात.अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान तसेच पितरांना उद्देशून केलेले काम यांचे फळ अक्षय असते.
अक्षय तृतीया या तिथीला देशात आखिती म्हणतात. या दिवशी नरनारायण व परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवशी बसवेश्वर जयंती देखील साजरी केली जाते. या तिथींला महाविष्णूंचे धार्मिक कार्य हे विशेष फलदायी ठरते. या दिवशी पित्तराचे स्मरणार्थ दानधर्म करावा. या दिवशी महर्षी वेद व्यासांनी महाभारत लिहिण्यास प्रारंभ केला. अक्षय तृतीया या दिवशी युधिष्ठराला अक्षय पात्राची भेट मिळाली त्याच्या साह्याने युधिष्ठिराने गरिबांना अन्नदान दिले या दिवशी विवाह केल्यामुळे वैवाहिक सुख कमी होत नाही. याच दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती देखील असते. गंगा स्नानाचे महत्त्व या दिवशी महत्त्वाचे मानले जाते.
दक्षिण भारतातील लोक असे मानतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीने कुबेराच्या तपाने प्रसन्न होऊन त्यांना धनाची देवता बनवले होते. त्यामुळे लक्ष्मीदेवी व कुबेराची या दिवशी पूजा करतात. अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णू व लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी कृष्ण व सुदामा यांची भेट देखील झाली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशी पवित्र गंगा पृथ्वीवर अवतरली होती. तर अशा या अक्षय तृतीयेला आपण अशी प्रार्थना करूया की आपण आपले कुटुंब आणि आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती ही सुखी होऊ दे. ही अक्षय तृतीया तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आनंदाची भरभराटीची व सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.
वाचा - उष्माघाताचे दुष्परिणाम जाणून घेऊया