![]() |
भौगोलिक मानांकनाचे महत्त्व |
प्रत्येक प्रदेश हा एका खास गोष्टीसाठी प्रसिद्ध असतो. हे तर तुम्हाला माहित आहे .उदा. रत्नागिरीचा हापूस आंबा. भौगोलिक मानांकनाची गरज का? एखाद्या प्रसिद्ध उत्पादनाच्या नावाखाली दुसऱ्या जातीची उत्पादने विकली जात असतील तर प्रसिद्ध असलेल्या उत्पादनावरती अन्याय होणार की नाही.
एखादे उत्पादन एका विशिष्ट भागातच वर्षानुवर्षे घेतले जाते. आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला भौगोलिक मानांकन दिले जाते. भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे उत्पादनाचे उगम स्थान निश्चित होते
भौगोलिक मानांकन हे कृषी आणि औद्योगिक वस्तू यांना मिळते. दार्जीलिंग चहा हे भारतातील पहिले भौगोलिक मानांकन मिळवणारे उत्पादन आहे. भौगोलिक मानांकनामुळे त्या उत्पादनाची निर्यात वाढते. तेथील पर्यटनाला चालना मिळते. चुकीच्या गोष्टींना आळा बसतो. कायद्याचे कवच मिळते. एखादा व्यक्ती दुसऱ्या राज्यात आंब्याचे उत्पादन घेऊन जर ते महाराष्ट्राच्या रत्नागिरीमध्ये मिळणाऱ्या हापूस आंब्याच्या नावाने विकत असेल तर भारतामध्ये त्याला शिक्षा होऊ शकते.
भौगोलिक मानांकन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं काम करते. तर जगातील जवळजवळ सर्व देश हे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेला जोडलेले आहेत. ते सर्व देश एकमेकांच्या भौगोलिक मानांकनाचा आदर करतात. एखाद्या देशात दुसऱ्या देशाच्या भौगोलिक मानांकन मिळालेल्या उत्पादनाच्या नावावर जर दुसरे उत्पादन बनवून विकले जात असेल तर त्यावर तो देश बंदी आणतो. आपल्या भारतामध्ये एक अडचण आहे की एवढा मोठा देश एवढ्या वेगवेगळ्या संस्कृती पण आत्तापर्यंत आपल्याला तीनशे ते साडेतीनशे उत्पादनांना फक्त भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
कारण आपल्याकडे भौगोलिक मानांकनाविषयी असलेले ज्ञान याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे आणि जनजागृती देखील करायला हवी. काय होतं जर आपल्या उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाले तर त्या शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या उद्योगांना फायदा होतो. ह्याचं एक छोटसं उदाहरण म्हणजे कडकनाथ चिकन जे खाण्यासाठी चविष्ट आहे. हे चिकन भौगोलिक मानांकन मिळायच्या अगोदर पाचशे रुपये किलोग्राम होतं. आता तेच एक हजार किलोग्राम मिळते यावरून आपण भौगोलिक मानांकनाचे महत्त्व किती आहे हे समजू शकतो.
वाचा - वाघ संवर्धनाच्या उपक्रमाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत